Thursday 14 March 2013

CH:15 सहचारी

अंजली गाडी ड्राईव्ह करीत होती आणि गाडीत समोरच तिच्या शेजारच्या सीटवर विवेक बसला होता. गाडीत बराच वेळ दोघंही काही न बोलता जणू आपल्याच विचारात गढून गेले होते.

खरं विवेक तिने विचार केल्याप्रमाणे कितीतरी उत्साही, उमदा आणि देखणा आहे... आणि त्याचा स्वभाव किती साधा सरळ आहे...

पहिल्याच भेटीत त्याने लग्नाचा प्रश्न विचारुन आपल्या बद्दलच्या भावना सरळ सरळ व्यक्त केल्या ते एका दृष्टीने बरेच केले...

खरं म्हणजे तो प्रश्न विचारुन त्याने आपल्यालाही त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यास योग्य संधी आणि वाव दिला आहे...

तिला आता त्याच्याबद्दल एक आपलेपणा वाटत होता. तिने आता त्याच्यात तिच्या भावी आयुष्यातला एक सहचारी ... एक मित्र... एक सुख दु:खात नेहमी सोबत देणारा सोबती बघणे सुरु केले होते.

तिने विचार करता करता त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्यानेही तिच्याकडे पाहून एक मधूर स्मित केले.

पण तोही आता आपल्याबद्दलच विचार करीत असेल का?...

'' तू अभ्यास वैगेर केव्हा आणि कधी करीत असतो... नाही म्हणजे नेहमी तर चॅटींग आणि इंटरनेटवर बिझी असतोस'' अंजली काहीतरी बोलायचं आणि विवेकला थोडं छेडण्याच्या उद्देशाने म्हणाली.

विवेक तिच्या छेडण्याचा मुड ओळखून नुसता हसला.

'' मागच्या एका महिन्यात तुमच्या कंपनीचा प्रोग्रेस काय म्हणतो?'' विवेकने विचारले.

'' चांगला आहे ... का?... आमची कंपनी दिवसेदिवस प्रगतिशीलच आहे'' अंजली म्हणाली.

'' नाही म्हटलं... नेहमी चॅटींग आणि इंटरनेटवर बिझी असल्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामावर झाला असेल ... नाही?'' विवेकही तिच्या छेडण्यास प्रतिउत्तर देत म्हणाला.

तिही नुसती त्याच्याकडे पाहून हसली. तिला त्याच्या हजरजबाबीपणाचे नेहमीच कौतूक वाटत आले होते.


अंजलीची गाडी एका आलीशान हॉटेलसमोर - हॉटेल ओबेरायसमोर येवून थांबली. गाडी पार्कींगमधे नेवून पार्क करीत अंजली म्हणाली, '' एक मिनीट मी माझा मोबाईल हॉटेलमधे विसरली आहे... तो मी घेवून येते आणि मग आपण निघू... नाहीतर चल काही तरी थंड गरम घेवू आणि मग निघू '' अंजली गाडीच्या खाली उतरत म्हणाली.

अंजली उतरुन हॉटेलमधे जावू लागली आणि विवेकही उतरुन तिच्या सोबत हॉटेलमधे जावू लागला.


क्रमश:...  


Childen Stori ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment