Thursday 14 March 2013

CH-7 ब्लॅंक रिप्लाय

शरवरी अंजलीच्या कॅबिनमधे कॉम्प्यूटरवर बसलेली होती. अंजली तिची सकाळची मिटींग आटोपून तिच्या कॅबिनमधे परत आली. तिने घड्याळाकडे बघितले. जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते. खुर्ची मागे ओढून ती तिच्या खुर्चीवर बसली आणि मागे खुर्चीला रेलून आपला थकवा दूर करण्याचा प्रयत्न करु लागली. शरवरीने एकदा अंजलीकडे बघितले आणि ती पुन्हा आपल्या कॉम्प्यूटरच्या कामात व्यस्त झाली.

''कुणाची काही खास मेल?'' अंजलीने शरवरीकडे न बघताच विचारले.

'' नाही... काही खास नाही... पण एक त्या 'टॉमबॉय' ची मेल होती'' शरवरी म्हणाली.

'' टॉमबॉय ... काही लोक फारच चिकट असतात ... नाही?'' अंजली म्हणाली.

'' हो ना...'' शरवरीला अंजलीच्या बोलण्याचा रोख लक्षात आला होता.

कारण अंजलीने पुर्वी तिला एकदा त्या टॉमबॉयबद्दल सांगितले होते.

'' आणि हो ... एक अजून कुण्या विवेकची मेल होती'' शरवरी पुढे म्हणाली.

'' विवेक?... हो तो काल चॅटींगवर भेटलेला तोच असेल... मी सांगतेना त्याने काय लिहिले असेल.. तुझं वय काय?... तुझा पत्ता काय?... माझं वय फलाना फलाना आहे... माझा पत्ता फलाना फलाना आहे.. आणि मी फलाना फलाना काम करतो... आणि हळू हळू तो आपल्या खऱ्या जातिवर येणार... या माणसांची सर्व जातच अशी असते... लागट.. लोचट आणि चिकट...''

'' तू म्हणते तसं काहीही त्याने लिहिलेलं नाही आहे...'' शरवरी मधेच तिला तोडत म्हणाली.

'' नाही? ... तर मग एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टची सिफारस केली असणार त्याने... म्हणजे तो प्राडक्ट खरेदी आपण करायचं आणि त्याने फुकट कमिशन खायचं'' अंजली म्हणाली.

'' नाही तसंही त्याने काही लिहिलेलं नाही.'' शरवरी म्हणाली.

'' मग?... मग काय लिहिलेलं आहे त्याने?'' अंजलीने उत्सुकतेने मान वळवून शरवरीकडे पाहत विचारले.

'' त्याने मेलमधे काहीच लिहिलेलं नाही आहे.. त्याने ब्लॅंक मेल पाठवलेली आहे आणि खाली फक्त त्याचं नाव 'विवेक' असं लिहिलेलं आहे'' शरवरी म्हणाली.

अंजली एकदम उठून सरळ बसली.

'' बघू दे..'' अंजली शरवरीकडे वळून कॉम्प्यूटरकडे बघत म्हणाली.

शरवरीने अंजलीच्या मेलबॉक्समधील विवेकची मेल क्लीक करुन उघडली. खरंच ती मेल ब्लॅंक होती..

'' अंजली तू काहीही म्हण ... पण या मुलात 'स्टाईल' आहे... ऍटलिस्ट एवढं नक्की की आहे की हा मुलगा बाकी मुलांपेक्षा जरा हटके आहे...'' शरवरी अंजलीच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

'' तू जरा चूप बसतेस ... आणि काय मुलगा ... मुलगा लावलं आहे... तुला तो कोण कुठला... त्याचं वयं काय... काही माहित आहे?... तो एखादा रंगेल, खुसट बुढाही असू शकतो... तुला माहित आहेच आजकाल लोक इंटरनेटवर कसं पर्सनलायझेशन करतात...''

'' ... हो तेही आहे म्हणा... पण काळजी करु नकोस... हे घे मी आत्ताच त्याची सायबर तहकिकात करते'' शरवरी पटापट कॉम्प्यूटरच्या किबोर्डचे काही बटनं दाबत म्हणाली.

थोड्या वेळातच कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर जणू एक रिपोर्ट अवतरला.

'' इथे तर त्याचं नाव फक्त विवेक असं लिहिलेलं आहे... अडनाव लिहिलं नाही आहे... मुंबईला राहणारा आहे आणि पिएच डी करीत आहे... वय आहे...'' शरवरीने जणू एखाद्या गोष्टीचा क्लायमॅक्स उघड करावा तसा एक पॉज घेतला.

अंजलीचीही आता उत्सुकता जागृत झाली होती आणि ती शरवरी त्याचं वय काय सांगते याची वाट पाहू लागली.

'' पिएचडी? ... म्हणजे नक्कीच कुणीतरी बुढ्ढा खुसट असला पाहिजे... मी म्हटलं होतं ना?''

'' आणि त्याचं वय आहे 25 वर्ष...'' शरवरीने जणू क्लायमॅक्स उघड केला.

'' तो नूर ए जन्नत मिस अंजली अब क्या किया जाए? शरवरी तिला छेडीत म्हणाली.

अंजलीही प्रयत्नपुर्वक आपला चेहरा निर्वीकार ठेवीत म्हणाली, '' तर मग? ... आपल्याला त्याचे काय करायचे आहे?

'' देने वाले अपना पैगाम देकर चले गए

करने वाले तो अपना इशारा कर चले गए

उधर बडा बुरा हाल है दिलके गलियारोंका

अब उन्हे इंतजार है बस आपके इशारोंका ''

'' वा वा क्या बात है ...'' शरवरी आपल्याच शेरची तारीफ करीत म्हणाली, '' आता काय करायचं या मेलचं? ''

'' करायचं काय ... डिलीट करुन टाक'' अंजली बेफिकीरपणे... म्हणजे कमीत कमी तसा आव आणित म्हणाली.

'' डिलीट... नही इतना बडा सितम मत करो उसपर... एक काम करते है ... कोरे खत का जवाब कोरे खतसेही देते है ...''

शरवरीने पटापट कॉम्प्यूटरच्या किबोर्डची बटन्स दाबली आणि त्या ब्लॅंक मेलला ब्लॅंक रिप्लाय पाठूवन दिला.


क्रमश:...



Real Joke ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment