Thursday 14 March 2013

CH - 19 सॉलीडेअर

सायबर कॅफेमधे आपापल्या क्यूबीकल्स मधे लोक आपापल्या इंटरनेट सर्फींग मधे बिझी होते. काही कॉम्प्यूटर्स उघड्यावर होते तिथेसुध्दा एकही कॉम्प्यूटर रिकामा नव्हता. की बोर्डच्या बटनांचा एक विशीष्ट आवाज एका विशीष्ट लयीत संपूर्ण कॅफेत येत होता. सगळे जण, कुणी चाटींग, कुणी सर्फींग, कुणी गेम्स खेळण्यात तर कुणी मेल्स पाठविण्यात असे आपापल्या कामात गुंग होते. तेवढ्यात एक माणूस दरवाज्यातून आत आला. तो कावऱ्याबावऱ्या नजरेने आणि ज्या तऱ्हेने आत इकडे तिकडे पाहत होता त्यावरुन तरी तो प्रथमच इथे आला असावा असं जाणवत होतं. रिसेप्श्न काऊंटरवरील स्टाफ मेंबर त्याच्या समोर ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर पत्याचा गेम 'सॉलीडेअर' खेळत होता. त्या माणसाची चाहूल लागताच त्याने पटकन, मोठ्या सफाईने आपल्या मॉनीटरवरील तो गेम मिनीमाईझ केला आणि आलेला माणूस हा आपला बॉस किंवा बॉसच्या घरचं कुणी नाही हे लक्षात येताच तो पुन्हा तो गेम मॅक्सीमाईज करुन खेळू लागला. तो आत आलेला माणूस एक क्षण रिसेप्शन काऊंटरवर घूटमळला आणि थांबून स्टाफला विचारु लागला -

'' विवेक आला का?''

त्या स्टाफने निर्वीकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत विचारले -

'' कोण विवेक?''

'' विवेक सरकार ... खरं म्हणजे तो माझा मित्र ... आणि त्यानेच मला इथे बोलावले आहे..'' तो माणूस म्हणाला.

'' अच्छा तो विवेक... नाही तो दिसला नाही आज.. तसा तर तो रोज येत असतो पण कालपासून मी त्याला बघितलं नाही... '' काऊंटरवरील स्टाफने उत्तर दिले आणि तो आपल्या समोर ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर पुन्हा 'सॉलीडेअर' खेळण्यात मग्न झाला.

अंजली कॉन्फरंन्स रुममधे भिंतिवर लावलेल्या छोट्या पडद्यावर प्रोजेक्टरच्या सहाय्याने शरवरीला काहीतरी समजावून सांगत होती. आणि शरवरी ती जे सांगत होती ते लक्ष देवून ऐकत होती.

'' शरवरी जसं तु सांगितलं होतं तशी मी विवेकला समजावून बघण्यासाठी एक मेल पाठवली आहे... पण त्याला नूसती मेलच न पाठविता मी एक मोठा डाव खेळला आहे... '' शरवरी सांगत होती.

'' डाव? ... कसला?...'' शरवरीने काही न समजून आश्चर्याने विचारले.

'' त्याला पाठविलेल्या मेलसोबत मी एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अटॅच करुन पाठवला आहे'' अंजली म्हणाली.

'' कसला प्रोग्रॅम?'' शरवरीला अजूनही काही उमगलेले दिसत नव्हते.

'' त्या प्रोग्रॅमला 'स्निफर' म्हणतात... जशी विवेक त्याला पाठवलेली ती मेल उघडेल .. तो स्निफर प्रोग्रॅम रन होईल...'' अंजली सांगू लागली.

'' पण तो प्रोग्रॅम रन झाल्याने काय होणार आहे?'' शरवरीने विचारले.

'' त्या प्रोग्रॅमचे काम आहे ... विवेकच्या मेलचा पासवर्ड माहीत करणे... आणि तो पासवर्ड माहीत होताच तो प्रोग्रॅम आपल्याला तो पासवर्ड मेलद्वारा पाठवेल... '' अंजली सांगत होती.

'' अरे वा... '' शरवरी उत्साहाने म्हणाली पण दुसऱ्याच क्षणी काहीतरी विचार केल्यागत शरवरीने विचारले, '' पण त्याचा पासवर्ड माहीत करुन आपल्याला काय मिळणार आहे?''

'' ज्या तऱ्हेने विवेक मला ब्लॅकमेल करीत आहे... त्याच तऱ्हेन होवू शकतं की तो अजून बऱ्याच जणांना ब्लॅकमेलींग करत असेल...किंवा त्याच्या मेलबॉक्समधे आपल्याला त्याची काहीतरी कमजोरी... किंवा काहीतरी आपल्या उपयोगाचे माहित पडेल... तसं सध्या आपण अंधारात तीर मारतो आहोत... पण मला विश्वास आहे आपल्याला काहीना काही नक्कीच मिळेल''

'' हो ... शक्य आहे'' शरवरी म्हणाली '' मला काय वाटतं... आपल्याला आपला दुश्मन कोण आहे हे माहित आहे... तो कुठे राहातो हेही माहीत आहे... मग तो आपल्यावर वार करण्याआधी आपणच जर त्याच्यावर वार केला तर?''

'' ती शक्यताही मी पडताळून पाहाली आहे... पण तो सध्या त्याच्या होस्टेलमधून गायब आहे... वुई डोन्ट नो हिज व्हेअर अबाऊट्स''

तेवढ्यात कॉम्प्यूटरचा बझर वाजला. अंजलीने आणि शरवरीने पटकन वळून मॉनिटरकडे बघितले. मॉनिटरकडे बघताच दोघींच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य तरळले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अंजलीने विवेकच्या मेलला अटॅच करुन पाठविलेल्या सॉफ्टवेअरचीच ती मेल होती. आता दोघींनाही ती मेल उघडण्याची घाई झाली होती. केव्हा एकदा ती मेल उघडतो आणि केव्हा एकदा विवेकच्या आलेल्या पासवर्डने त्याचा मेल अकाऊंट उघडतो असं अंजलीला झालं होतं. तिने पटकन डबलक्लीक ती मेल उघडली.

'' यस्स!'' तिच्या तोंडून विजयी उद्गार निघाले.

तिने पाठविलेल्या स्निफरने आपले काम चोख बजावले होते.

तिने विजेच्या गतिने मेल सॉफ्टवेअर ओपन केले आणि ...

'' हा त्याचा मेल आयडी आणि हा त्याचा पासवर्ड'' म्हणत विवेकचा मेल ऍड्रेस टाईप करुन त्या प्रोग्रॅमला विवेकच्या मेलचा पासवर्ड पुरविला.

अंजलीने त्याचा मेल अकाऊंट उघडताच अजून की बोर्डची दोन चार बटन्स आणि दोन चार माऊस क्लीक्स केले. आणि दोघीही कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघायला लागल्या.

'' ओ माय गॉड ... आय जस्ट कान्ट बिलीव्ह'' अंजलीच्या उघड्या तोंडून उद्गार निघाले.

शरवरी आलटून पालटून एकदा मॉनिटरकडे तर दुसऱ्यांदा अंजलीच्या आश्चर्याने उघड्या राहलेल्या तोंडाकडे बघत होती.


क्रमश: 



Read Marathi News ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment