Friday 15 March 2013

ch-42 क्लूज


सकाळी सकाळी अंजली, विवेक, शरवरी आणि इन्स्पेक्टर कंवलजीत कॉन्फरंन्स रुममधे जमले होते.

'' मी या गोष्टीनेच समधानी आहे की शेवटी ब्लॅकमेलरने विवेकला काहीही इजा न करता सोडून दिले.'' अंजली बऱ्याच वेळ चाललेल्या चर्चेनंतर एक दिर्घ श्वास घेत म्हणाली.

'' पण एक मिनीट'' विवेकने हस्तक्षेप केला.

सर्व जण एकदम गंभीर होवून त्याच्याकडे पाहू लागले.

'' मला वाटतं .... ब्लकमेलरमुळे आपल्याला, मला तुम्हाला अंजलीला सगळ्यांनाच त्रास झालेला आहे... '' विवेक म्हणाला.

'' विवेक... माझे पैसे गेले त्याचं मला बिलकुल दु:ख नाही... तुला काही इजा झाली नाही हे सगळ्यात महत्वाचं'' अंजली मधेच हस्तक्षेप करीत म्हणाली.

इन्स्पेक्टर कंवलजीतही तिच्या समर्थनार्थ काही बोलतील या अपेक्षेने अंजलीने त्यांच्याकडे पाहाले. पण ते काहीच बोलले नाहीत.

'' अंजली गोष्ट फक्त पैशाची नाही आहे... मला तरी वाटतं आपण त्याला असंच सोडून देणं योग्य नाही ... तशी वेळ अजूनही गेलेली नाही... आताही जर आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर?...'' विवेकने प्रश्न उपस्थित केला आणि तो इन्सपेक्टरची प्रतिक्रिया आजमवण्यासाठी त्यांच्याकडे पहायला लागला. इन्स्पेक्टरने विचार केल्यागत रुमच्या छताकडे पाहाले आणि ते काही बोलणार एवढ्यात मधेच शरवरी बोलली.

'' पण आपल्याला ना त्यांचं नाव माहित आहे ... ना पता... तो काय करतो .. हेही आपल्याला माहित नाही ... मग आपण त्याला पकडण्याचं जरी ठरवलं तरी पकडणार तरी कसे...'' शरवरीने तिची शंका उपस्थित केली.

अंजलीने शरवरीकडे पाहून जणू तिच्या मुद्याला मुक संमती दर्शवली.

'' इतके दिवस आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो... ते सगळे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेले असं म्हणता येणार नाही... अजुनही आपल्याजवळ काही क्लूज आहेत... एक तर त्या ब्लॅकमेलरचं हॅंन्ड रायटींग जे आम्हाला सायबर कॅफेतील लॉगबुकमधून मिळालं... दुसरं त्याचे फिंगर प्रिन्टस जे आम्हाला सायबर कॅफेतूनच मिळाले आणि तिसरं... तिसरं म्हणजे हे फोटोग्राफस बघा... '' इन्स्पेक्टर कंवलजीत बोलत होते.

ब्लॅकमेलरला अजुनही पकडण्याची विवेकची मनिषा पाहून इन्स्पेक्टरच्या अंगात जणू स्फुर्ती संचारली होती. ते त्यांच्या जवळचे दोन फोटोग्राफ्स तिथे जमलेल्या लोकांना दाखवून पुढे म्हणाले,

'' हे फोटोग्राफ्स त्या सायबर कॅफेमधील कॉम्प्यूटरचे आहेत जिथे थोड्याच वेळापुर्वी ब्लकमेलर बसलेला होता.. या फोटोग्राफ्सकडे थोडं लक्ष देवून बघा... बघा काही लक्षात येतं का?'' इन्सपेक्टरने ते फोटो सगळ्यांना बघण्यासाठी समोर सरकवले.

सगळ्यांनी ते फोटोग्राफ्स एक एक करुन बघितले. पण कुणालाही त्या फोटोत वावगं असं काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात विवेक ते फोटोग्राफ्स बघता बघता गालातल्या गालात हसला.

'' काय झालं?'' अंजलीने विचारले.

'' बघ जरा काळजीपुर्वक बघ ... या फोटोग्राफ्समधे कॉम्प्यूटरचा माऊस कॉम्प्यूटरच्या डाव्या बाजुच्या ऐवजी उजव्या बाजुला दिसतो आहे ...'' विवेक म्हणाला.

'' यस यू आर ऍब्सुलेटली राईट'' इन्स्पेक्टर उत्साहाने म्हणाले.

आता अंजलीही गालातल्या गालात हसू लागली.

'' पण त्याचा अर्थ काय?'' शरवरी अजुनही संभ्रमाने म्हणाली.

''... याचा एकच अर्थ निघू शकतो की ब्लकमेलर हा डावखुरा आहे... '' इन्स्पेक्टर म्हणाले.

'' यस दॅट्स राईट '' आता कुठे शरवरीच्या गालावर हसु फुलले होते.

तेवढ्यात कॉन्फरंस रुममधील फोनची घंटी वाजली. फोन अंजलीच्या शेजारीच होता. तिने फोन उचलला,

'' हॅलो''

'' गुड मॉर्निंग अंजली ... '' तिकडून नेट सेक्यूराचे मॅनेजींग डायरेक्टर मि. भाटीयांचा आवाज आला.

'' गुड मॉर्निंग भाटीयाजी...'' अंजलीने तेवढ्याच उत्साहात त्यांचे स्वागत केले, '' बोला काय म्हणता''

'' आमच्या इथे आम्ही एक नेटवर्किंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॉन्टेस्ट ठेवली होती... कॉन्टेस्टचा टॉपीक आहे इथीकल हॅकींग... त्या कॉन्टेस्टचे बक्षिस वितरण तुझ्या हस्ते व्हावे अशी आमची इच्छा आहे... '' तिकडून भाटीयाजी जणू हक्काने म्हणाले.

'' तुम्ही बोलावलं आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल का भाटीयाजी... मी जरुर येईन... बक्षीस वितरण समारंभ कधी आहे?... '' अंजलीने विचारले.

'' पुर्ण प्रोग्रॅम अजून फायनल व्हायचा आहे... तसं तो समारंभ टेंटीटीव्हली समव्हेअर अराऊंड धीस मंथ असेल... पुर्ण प्रोग्रॅम फायनल होताच तुला तसं सविस्तर कळवलं जाईल ... '' तिकडून भाटीयाजी म्हणाले.

'' नो प्रॉब्लेम''

'' थॅंक्स''

'' मेन्शन नॉट''

'' ओके बाय... सीयू''

'' बाय''

अंजलीने फोन क्रॅडल परत ठेवला आणि तिने तिथे बसलेल्या सर्व लोकांवर एक नजर फिरवली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य झळकु लागले.

'' माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे... आत्ता नेट सेक्यूराचे मॅनेजींग डायरेक्टर मि. भाटीयाजींचा फोन होता... इथीकल हॅकींगवर ते एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रतियोतिता घेत आहेत... मला खात्री आहे की जर या प्रतियोगितेचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला गेला आणि या प्रतियोगितेच्या विजेत्यास मोठमोठे बक्षिस ठेवले ... तर तो ब्लॅकमेलर या प्रतियोगीतेत नक्कीच सहभागी होईल...'' अंजली म्हणाली.

'' पण तु हे सगळं एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस?'' विवेकने शंका उपस्थित केली.

'' पुर्णपणे खात्रीने जरी नाही तरी ... क्रिमीनल सायकॉलॉजीनुसार... तो ब्लॅकमेलर सध्या आत्वविश्वास आणि गर्वाच्या उत्यूच्च पातळीवर आहे ... त्याच्यापर्यंत जर ही प्रतियोगितेची गोष्ट पोहोचली तर तो यात नक्कीच भाग घेईल... '' इन्स्पेक्टरने आपला अंदाज वर्तविला.


क्रमश:..  


Read Udan Storis ( Pleas Add Skeep ) ............

No comments:

Post a Comment