Wednesday 31 December 2014

सेलिब्रिटी

सेलिब्रिटी हे काजव्या सारखे असतात
चमक संपली की दिसेनासे होतात
पुढील पिढी त्यांना ओळखत नाही
मागील पिढी त्यांची दखल घेत नाही
ज्ञानी व्यक्ति तळपत असते
कधी न विझणारा सूर्य असते.
-----नेने प्रभाकर

चेंज ??!!!


सार्वजनिक ठिकाणे आजकाल ओंगळवाणी झालीयत
गैरहजर अधिकार्याचे हक्क शिपायांना आलेत
इंदिरा गांधी एकेकाळी डोक्यावर पदर घ्यायच्या
पण आज झाडूवालीच्या साडीला सुद्धा पिन अप्स आलीयत 



                                                                                           
                                                                 By : shilpa jagtap   

तो दिड तास ! बसस्टॉपवर !

नाद

‘’जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय, नचूकता मी यायच्या वेळेवर रोज बस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढातोमी बस सोडली की तो ही सोडतोमाझ्या गोर्‍या रंगावर आणि मादक शरिरावर भुळ्लाय आणि काय मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजुला येऊनउभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळ्जी घेतो. बसमध्ये कोण भेटला तर बोलताना मला प्रभावित कराण्यासाठी लाखाच्या वार्ता करतो. कोणी तरी मोठा विद्वान व्यक्ती असल्याचा आव आणतो. एखाद्या चॉकलेट हिरो सारखा दिसणारा,जीन्स, टी-शर्ट परिधान कराणाराखांद्यापर्यंत केस वाढविलेलाचेर्‍यावर पावडर थापणारादाढी मिश्या न ठेवणारासडापातल बांधा असणारा आणि बोलताना अरेतूरे ! करणारा विद्वान कसा असू शकतो मुर्ख कुठ्ला ! त्याला वाटतय मी त्याच्या प्रेमात पडलेय ! त्याच्या सारखे ह्जार जण माझ्या मागे लागलेत ! मी त्यांना भिक नाही घातली तर हा किस खेत की मुळी आहे ?एक नंबर डरपोक आहे. तस नसत तर हिंमत करून मला काय ते एकदाच विचारून मोकळा झाला असता. रोज बसस्टॉपवर अस तासनतास माझी वाट पाह्त उभा राहिला नसता. बघ ! आता माझ्यापासून किती दूर उभा राहून माझ्याकडे एक टक पाहतोय वेड्यासारखा ! अशा भ्याड मुलाच्या मी प्रेमात पडणार शक्य तरी आहे का मला जर कोणी याच्या समोर छेडल तर हा मान खाली घालून चुपचाप निघून जाईल. मला कळत नाही माझ्यापेक्षाही सुंदर दिसणार्‍या मुलीस्वतःहून त्याला चिपकण्याचा प्रयत्न का करतात त्या बघ त्या दोघी कश्या त्याच्या जवळ उभ्या रहिल्यात एक उजविकडे आणि एक डाविकडे बाजूला जागा नाही म्हणून दुसर्‍या त्या दोघीएक पुढे आणि एक मागे उभी राहिलेय ! आता बघ ! मी बसमध्ये चढल्याखेरीज हा बसमध्ये चढणार नाही आणि तो चढल्याखेरीज त्या चौघी चढणार नाहीत, पाहिलस आज तू माझ्या सोबत आहेस म्हणून रिक्षाने गेला आणि बरोबर त्या दोघींनाही घेऊन गेला. मला नाही कधी म्हणाला रिक्षाने येतेस का चल ! कविता आता आपण पण रिक्षाने जाऊया !’’ कविताने रिक्षाला हात दाखाविला रिक्षा थांबताच दोघीही रिक्षात बसताच कविता म्ह्णाली,’’प्रतिभा तू मगापासून ज्याच्याबद्दल बोलत होतीस त्याच नाव तरी तुला माहीत आहे का तू ओळ्खतेस त्याला ?त्यावर प्रतिभा किंचित नाराजीच्या स्वरात म्हणाली,’’ नाही ना मला त्याच नावही माहीत नाही आणि मी त्याला ओळखतही नाही ! प्रतिभा तू त्याला ओळखत नसताना त्याच्याबद्दलच तुझ मत कस काय बनवू शकतेस मला खात्री आहे उद्या तू जर त्याच्या समोर तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडलास तर तो नाही म्हणेल ! त्यावर प्रतिभा काविताला म्हणाली तुला वेड लागलय ! अस कस होऊ शकत जो गेल्या वर्षभर माझ्या मागे लागलाय त्याच्यासमोर मी स्वतः हून प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही तो नाही म्हणेल हे कस शक्य आहे हे केवळ अशक्यच आहे ?त्यावर कविता आत्मविश्वासाने प्रतिभाला म्हणाली ,’’ लाव पैंज लाव तू उद्याच त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवायचा, त्याने जर तुझा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला तर तू त्याचा नाद सोडायचा आणि त्याने जर तुझ्या प्रेमाचा स्विकार केला तर मी आयुष्यभर मी तू बोललेल ऐकत राहिण! प्रतिभान कविताची पैंज मान्य केली आणि रिक्षामधून उतरताच दोघी दोन विरुध्द दिशांना निघून गेल्या.
दुसर्‍या दिवशी बसस्टॉपवर त्या दोघी एकत्रच आल्या, तो प्रतिभाची वाट पाह्त बसस्टॉपवर उभा होता. प्रतिभा हिंमत करून त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली,’’ मला जरा तुझ्याशी बोलायचय जरा बाजुला येता का त्याने मानेनेच होकार दिला. ती त्याला बसस्टॉपपासून दूर घेऊन जात म्हणाली,’’ मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तू माझी वाट पाह्त बसस्टॉपवर उभा असतो. मला ही तुंम्ही आवडता त्याचा हात हातात घेत ती ‘’ आय लव्ह यू’ म्ह्णताच तिचा हात हातातून झटकत तो म्हणाला,’’ बट ! आय हेट यू ! क्षणभर प्रतिभाला काय कराव आणि काय करू नये तेच कळ्त नव्ह्त. ती भानावर येईपर्यत तो रिक्षा पकडून निघूनही गेला. प्रतिभाच्या खांद्यावर कविताचा हात होता. तो हात न उचलताच कविता प्रतिभाला म्हणाली,’’प्रतिभा तू पैंज हारलेस आता तुला त्याचा नाद सोडावाच लागेल. आता तू म्हणशिल मला त्याचा नाद कधीही लागला नव्ह्ता ते खर ही आहे पण तो खर्‍या तूला आता लागेल ! त्यावर प्रतिभाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा विचार करत करतच ती तिच्या घरीही पोह्चली. काही केल्या तो तिच्या डोक्यातून जात नव्ह्ता. तो मला नाही म्हणूच कसा शकतो ?हा प्रश्न ती वारंवार स्वतःला विचारून त्रास करून घेत होती. मनातल्या मनात त्याला शिव्याही देत होती. साला ! दिड दमडीचा ! मला नाही म्ह्णाला ! गेले वर्षभर माझ्या मागे कुत्र्यासारखा शेपूट हालवत फिरत होता आणि आता ऐन वेळी धोका दिला साल्याने ! त्या कवितासमोर माझा पोपट केला. आता आयुष्यभर त्या कवितासमोर मान खाली घालून उभ राहवं लागणार आहे. पण ! आमच्या शुल्लक पैंजेसाठी कवितान आयुष्यभर माझं ऐकण्याच मान्य केल असल तरी ती जिंकणार याची तिला पूर्ण खात्री असल्याच तिच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट जाणवत होत. मीहारल्यास तिन माझ्याकडून त्याच्या नादाला न लागण्याच वचन घेतल. याचा अर्थ मी त्याच्यानादाला लागण कविताला मान्य नव्ह्तपण का कविता तर दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे श्रीमंतही आहे उच्चशिक्षीतही आहे आणि नोकरीलाही चांगली आहे. तिला या सडकछापमाणसामध्ये काय रस असणार सांगता येत नाही त्याच्या आजुबाजूला घुटमलणारया पैकी हीही एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी आणि तिची मैत्री चार – पाच महिन्यांची मी तरी तिला तशी नी कोठे ओळखते तिन माझ्या नकळ्त माझ्या सोबत राहूनच तर माझा काटा काढला नाही ना प्रतिभाच डोक काम करेनास झालयं ! कविता म्हणत होती ते बरोबरच होत वर्षभर मला त्याचा नाद लागला नव्ह्ता पण आता मला त्याचा नाद लागलाय !
यापुढे कवितासोबत त्याच्या बद्दल बोलण पूर्णपणे बंद ! आता तो काय करतो ते पाहू या ! दुसर्‍या दिवशी त्या दोघी एकत्रच बसस्टॉपवर आल्या पण ! तो दिसला नाही. तो न दिसल्यामुळेप्रतिभा किंचित कासाविस झाली. पण ! कविता समोर काहीच बोलली नाही. घरी गेल्यावर मात्र तिच मन अधिकच बेचैन झाल. त्याला पाह्ण्याची तिलाही किती सवय झाली होती हे तिच्या लक्षात आल. ती मनात पुटपुटली त्याचा एखादा फोटो जवळ असता तर किती बर झाल असत. फोटो सोडा आपल्याला तर त्याच साध नावही माहीत नाही. मी पण कीती मुर्ख आहे वर्षभरात त्याच साध नावही जाणून घेतल नाही. पण ! तसा प्रयत्न आता करावा लागेल. त्याच्या बाजूला ज्या कोंबडया उभ्या असतात त्यातीलच एखादीला पकडून बोलत कराव लागेल ! त्यानंतर काही दिवसांनी प्रतिभा आणि कविता सोबत असताना तो त्यांना सामोरा आला कविता आणि तो एकामेकांकडे ज्या नजरेने पाह्त होते ते पाह्ता प्रतिभाच्या मनात शंकेची पाल पुन्हा चुकचुकली ! त्या दोघांमध्ये काहीतरी मोठी भानगड आहे हे प्रतिभान अचूक हेरल आणि त्याच्या बाबतीत थोडा वेगळा मार्ग अवलंबण्याचा तिने निर्णय घेतला.
काही दिवसानंतर जेंव्हा तो प्रतिभाला बसस्टॉपवर एकटाच उभा असताना दिसला तेंव्हा त्याला पुन्हा बाजुला घेत प्रतिभा म्हणली,’’ मला माफ कर ! माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल,मला माफ करा प्लीज ! त्यावर तो किंचित हसत म्हणाला,’’ ठिक आहे प्रतिभा ! त्यावर प्रतिभा म्हणाली,’’तुला माझ नाव माहीत आहे त्यावर तो म्हणाला,’’तुझच काय तुझ्या घरातील सर्वांचीच नावे मला माहीत आहेत. तुझ्या मोठ्या भावाच, बहीणीच, आई- वडीलांची सर्वांची नावे मला माहीत आहेत. त्यावर प्रतिभा चटकण म्हणाली पण ! मला तुझ नाव माहीत नाही. माझ नाव विजय जाधव त्याने तिच्या हातात एक विझीटींग कार्ड दिलं ज्यावरून तो पत्रकार आणिलेखक असल्याच लक्षात येत होत. त्याच नाव कळताच त्याचे अनेक लेख तिने वर्तमानपत्रातवाचल्याचे प्रतिभाच्या लक्षात आले. तो तिच्याशी बोलत होता या संधीचा फायदा उचलत तिने त्याची शक्य तेवढी सर्व माहीती काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो निघून गेल्यावरही प्रतिभा बसस्टॉपवर थांबली कारण तिला कविताला गाटायच होत. कविता बसस्टॉपवर येताच प्रतिभा तिला म्हणाली,’’ त्याच नाव विजय जाधव आहे तो एक चांगला पत्रकार आणि लेखक आहे.चेहर्‍यावरून वाटत नाही ना तो लेखक असेल अस त्यावर रागावून कविता म्हणाली,’’चेहर्‍यावरून तो काहीच वाटत नसला तरी त्याच्या चेहर्‍यामागेच दडल असेल बरच काही कदाचित ! त्यादिवशी प्रतिभान विजयने तिला दिलेल्या कार्डवरील मोबाईल नंब आपल्या मोबाईलवरूनलावण्याचा प्रयत्न केला पण तो नंबर अस्तित्वातच नव्हता. आता त्याच निदान नाव तरी कळल्याचा आनंद प्रतिभाच्या चेहर्‍यावर झळकत होता. पण ! आता प्रतिभाच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला,’’ त्याच माझ्यावर प्रेम नव्हत तर तो माझ्या मागे का लागला होता ?प्रतिभाला आता या प्रश्नाच उत्तर शोधायच होत. पण कस आता तो पुन्हा भेटेल तेंव्हा त्याला स्पष्टच विचारू की !
त्यानंतर काही दिवसानी विजय एकटाच बसस्टॉपवर उभा होता. त्या संधीचा फायदा उचलत प्रतिभा हळूच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहीली आणि गोड आवाजात म्हणाली,’’ राग येणार नसेल तर एक विचारू त्यावर त्याने मानेनेच होकार देताच ती म्हणाली,’’ तुला माझ्यात काही रस नव्ह्ता तर मग माझ्या मागे का लागला होतात त्यावर विजय म्हणाला,’’ माझ्या कथेला एक नवीन नायिका ह्वी होती . तुझी मी माझ्या कथेची नवीन नायिका म्हणून निवड केली होती. तुझ चालणं, बोलणं, ह्सणं, रूसणं, लाजणं आणि रडणं ही सारच मला माझ्या नायिकेत उतरवावयाच होत म्हणून ! तुंम्ही कथा ही लिहता हो शाळेत असल्यापासून ! फक्त लिहता कीप्रकाशितही करता राज्यस्तरीय कथास्पर्धांमध्ये माझ्या कथांना अनेक बक्षीस मिळालेत. प्रतिभाला क्षणभर काय बोलाव आणि काय नाही तेच कळत नव्ह्त. पण स्वतःला सावरतप्रतिभा म्ह्णाली,’ मग ! भेटली का तुला तुझ्या कथेतील नायिका माझ्यात त्यावर विजयम्हणाला,’ जिला एक वर्षात एक माणूस ओळखता येत नाही तर ती लोकांच्या मनात काय चाललय हे कस काय ओळाखणार लोकांच्या वेदना ज्याला क्षणात ओळखता येतात तोच खरा माणूसएखाद्याची वेदना कळायला जर डॉक्टरला एक वर्ष लागला तर डॉक्टरला कदाचित त्याच्यावर उपचार करण्याची गरजच भासणार नाही. मी तुझ्या मागे वेडा झालोय हे पाहताना तुला आनंद होत होता ना एक असूरी आनंद ज्यामुळे तू मला खेळण समजून माझ्या भावनांशीखेळण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुझ्यासाठी रोज खर्च करत असलेल्या तासांची किंमत तुला माहीत नव्हती. ती जर तुला माहीत असती तर तुला कळल असत मी तुझ्यावर काय उधळलय ते ? इतक्यात बस येताच तो तिला बाय करून निघून गेल्यावर प्रतिभा स्वतःशिच म्हणाली,’’आता कळतय कविता का म्हणाली की त्याच्या नादाला लागू नकोस आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्‍या त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तोकित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता. 

                          लेखक – निलेश बामणे

भूमी

भुर्र भुर्र आवाज करणाऱ्या आणि भरपूर काळा धूर सोडणाऱ्या स्कुटीला किल्ल्याचं चढण चढता चढता चांगलाच दम लागला होता. ती मात्र एक्सिलेटरवर जोर देतच होती. आज तिला उशीर करून चालणार नव्हतं. ती चिडली होती. स्वतःवर कि स्कुटीवर याचा निर्णय मात्र होत नव्हता. मनातल्या मनात ज्ञात अज्ञात सर्व देवतांची आळवणी चाललेली. अन त्यात भान हरपलेला वारा. दिशा चुकून भरकटलेला. सभोवताली सळसळणारी झाडं पाहून तिला काही क्षण वाटलं जणू काही ती आपल्यालाच डिवचताहेत. ती पुन्हा पुन्हा स्कुटीच्या आरशात पाहत होती. वळणावळणाचा रस्ता तिला सतत नवी आव्हाने देत होता मनात विचारांची अनेक वादळे घेऊन ती त्या आव्हानांना चकवत होती. खरंतर अशा प्रकारचा प्रवास तिच्या खास आवडीचा. अरुंद निर्जन रस्त्यावर सावकाश गाडी चालवणे हा तर तिचा छंदच. पण आज तिला दिलेली वेळ पाळायची होतीवेळ तिच्यासाठी महत्त्वाची नव्हती पण वेळ ज्या व्यक्तीला दिलेली होती ती व्यक्ती महत्वाची होती.
उभी चढण चढून झाल्यावर तिने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. तिने आतुर नजरेने आजूबाजूला पाहिलं. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ तो उभा होतानेहमीप्रमाणेच हाताची घडी घालून वटारल्या डोळ्यांनी तिची प्रत्येक हालचाल निरखततिच्या चिडक्या चेहऱ्यावर आता प्रचंड तणाव. तिने गाडीची चावी काढली. डिक्की उघडली. त्यातलं देवीच्या ओटीच साहित्य बाहेर काढलं. यावेळी न विसरता आणलेलं. गेल्या वेळी याच ठिकाणी तो त्याच्या आईला घेऊन आला होता. तिची भेट घालून देण्यासाठी. आणि त्यावेळी ती रिकाम्या हातांनी मंदिरात आली म्हणून चिडलाही होता तो. आणि अखेर त्याने स्वतःमंदिराबाहेरच्या दुकानातून तिच्या साठी ओटीचं साहित्य विकत घेतलं होतं. आज तिनेठरवलंच होतं त्याला चिडण्याची संधीच द्यायची नाहीआपल्या तयारीवरखुश होऊन ती स्वतःशीच हसली. तिने पुन्हा गाडी बंद केल्याची खात्री केली. आणि तीकिल्ल्याच्या दिशेने वळलीतिने त्याच्याकडेपाहिलंतो हसला. तिच्या मनात प्रश्नतो आपल्याशी हसलाकि आपल्यावर हसला. काही पावलं चालल्यानंतर ती परत गाडीकडे वळलीतिने डिक्की बंद असल्याची पुन्हा खात्री केली. आणि संधीसाधून पुन्हा स्वतःचा चेहरा आरशात न्याहाळला. ती पुन्हा वळली आता मात्र तो तिथेनव्हता.
आता आला असेलनाकावर भला मोठा राग. येऊ दे आला तर. आज याला रिकामा वेळ असला म्हणजे आजच्या दिवशीसगळं जग रिकामटेकडं असतं असं नव्हे. एवढा राग येतो तर तो आवरायलाही शिकावंमाणसानं. प्रत्येकवेळी मीच काय म्हणून नसलेली चूक मान्य करत माफी मागायची. आजत्याला बोलायचं असेल तर बोलावं त्याने मी काही बाबा रे माझ्याशी बोल असा वायफळहट्ट करणार नाही. मी म्हणजे काही बाहुली नव्हे त्याने हातात घ्यावं मनात असेल तोवरखेळावं आणि मन भरलं कि बाजूला फेकावं.. आणि मी खरंच जर बाहुली असते तरतरी नसते गेले मी त्याच्याकडे. भातुकलीतल्या बाहुल्या तरीकधी स्वतःहून जातात आमच्याशी खेळा म्हणून सांगायला. त्याच्या गोंडसचेहऱ्याकडे पाहून लहान मुलाचं मन त्यांच्याकडे ओढ घेत. त्या स्वतःहून नाही जातकाही.” मनात उचंबळून येणाऱ्या असंख्य विचारांची असंबद्ध उच्चारणकरत ती किल्ल्याच्या पायऱ्या चढत होती. बाहुलीच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहूनच तिचीनिवड करणाऱ्या एका हट्टी मुलाकडे ती स्वतःहून चालली होती.
त्याला आणखी वाटपाहायला लागू नये म्हणून भराभर पायऱ्या चढल्याने तिला धाप लागली होती. पायऱ्यांवरलोळणारी ओढणी सावरत तिने डाव्या हाताला असणाऱ्या गणपतीला नमस्कार केला. गणपतीचंआणि तिचं फारसं काही सख्य नव्हतं. मात्र आज तिला त्याच्याशी बरंच काही बोलावसंवाटत होतं. ओटीच्या साहित्यातून आणलेल्या फुलांमधे ती एखादं लाल फुल मिळतं का तेशोधू लागली. अखेर एक जरा गडद रंगाचं गोंड्याचं फुल तिने निवडलं. आणि किमान आज तरीतो फटकून वागू नये अशी मनोमन इच्छा करत तिने ते फुल गणपतीच्या पायाशी वाहीलं.
जमेल तेवढा चेहरा केविलवाणा केलाय. आता तरी माझ्यावर दया कर गणराया...” ती तितक्याच केविलवाण्या स्वरात म्हणाली आणि स्वतःशीच खुदकनहसली.
मला वाटतंगणपतीशी जे बोलायचं होत ते एव्हाना बोलून झालं असावं.” काही अंतरावर उभा असलेला तो म्हणाला.
एवढी रे कसली घाईआल्यासारखं जरा देवांनाही भेटून घे. तुला भेटून जरा त्यांनाबर वाटेल.” ती तितक्याच मिश्किलपणे म्हणाली.
आज जरा उशीर नाहीकेलास यायलाघरूनच उशिरा निघाली असशील. आणि आता म्हणशीलरस्त्याला गर्दी होती. हे छान आहे तुझं.
साऱ्याप्रश्नांची उत्तरं जर याला माहितच असतात तर हा मला प्रश्न विचारतोच कशालातिच्या मनात आलं. कदाचित ओठावरही आलं असतं मात्र इतक्या दिवसात तिच्या लक्षात आलं होत कि आपल्या मनातयेणाऱ्या कोणत्याच गोष्टीला त्याच्या लेखी काहीच किंमत नाही. मग बोलून वाईट कशालाव्हायचंती काहीच बोलली नाही. तिने काही बोलावं अशी त्याची अपेक्षाहीनव्हती. तरीही तिचं काहीही न बोलणं सुद्धा त्याला असह्य झालं होतं.
तुला आज काहीबोलायचं नाही?”
तिने आश्चर्यानेत्याच्याकडे पाहिलं.
एरव्ही तुच मलाविचारतोस कि तुला जरा गप्प नाही का राहता येतआणि तूच सांगतोयसबोल म्हणूनतू तूच आहेस ना?”
त्याच्याचेहऱ्यावर एक सहज हास्य फुललं. तिच्या अशा निरागस प्रश्नांची त्याला सवय तर होती.पण त्या प्रश्नातले नित्यनाविन्य त्याला भुरळ घाली.
तुझं काहीही होणंशक्य नाही. तू जे दिवसभर स्वतःशी बोलत राहतेस ना त्याचा परीणाम आहे हा. कुठे कायबोलावं हेच कळत नाही तुला.
आता चुकीचं तेकाय बोलले मी?” तिने आवाजात शक्य तितका कठोरपणा आणत विचारलं.
काही नाही चुकलंतुझं.” तो हसत हसत म्हणाला.
मग हसतोयस का तेतर सांग?”तिने हट्टाने विचारलं. पण त्याने मात्रतिच्याकडे लक्ष दिलं नाही. खरंतर त्याला जे सांगायचं असतं तितकचं तो सांगतो आणित्याला काही विचारण्यात काहीच अर्थ नसतो हे माहित असूनही तिच्या अंगवळणी पडलेलंनव्हतं. तिला आपल्या चुकीची कल्पना आली. त्याला आग्रह न करता ती हातातल्यारुमालाशी चाळा करत मुकाट्याने चालत राहिली.
अगं फार काहीनाही इतक्या दिवसांनी आपण भेटतोय. तेही अशा निवांत ठिकाणी. आणि तू अशी अबोला धरून.म्हणून म्हटलं आज तुला काही बोलायचं नाही का?”
इतर वेळी तर मलासतत ओरडत असतोस किती बोलतेस म्हणून.
अगं तेव्हा एकतरमाझा बोलायचा मूड नसतो. डोक्यात वेगळं काहीतरी चाललेलं असतं नाहीतर मला खरंचतुझ्या रटाळ विषयांचा वीट आलेला असतो.
मग आज काय माझ्यारटाळ विषयांना अवीट गोडी येणार आहे वाटतं?” ती जरा तिरकसपणेम्हणाली. हातातला मोबाईल खिशात टाकत त्याने तिच्याकडे जरा रागानेच पाहिलं.
तुला दुखवायचंनव्हतं. पण तुला जे बोलायचं असतं ते तू थेट बोलतोस. मी माझं मन मोकळं करावं म्हटलंतर तो तुला रटाळ विषय वाटतो. तू रागावतोस मी गप्प बसते. तू बोल म्हणतोस. मी बोलूलागते. तक्रार नाही करत पण माझ्यासारखं वागणं तुला जमेल?”
त्याने तिच्याकडेएकटक पाहिलं. आणि न थांबणार हसू कसंबसं थांबवत तो म्हणाला, “That is one moredifference between you and me.
ती मात्रत्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं नव्हतंच पण त्याच्यावागण्याचं नव कोडं मात्र समोर आलं होतं. ती पुन्हा एकदा गप्प. त्याने पुन्हा एकदाखिशातला मोबाईल हातात घेतला. मावळतीची वेळ होत आलेली. पिवळसर प्रकाश सर्वत्र पसरलाहोता. समुद्राच्या पाण्यावर केशरी आकाशाचे रंग उतरले होते. तिला किल्ल्याच्यातटबंदीपलीकडल्या अथांग सागराची ओढ होती. त्यावर झुकलेल्या भगव्या आकाशाचीत्यातल्या रंगबेरंगी निरनिराळ्या आकारांच्या ढगांची ओढहोती. पण तो मात्र हातातल्या मोबाईलमधे डोकं खुपसूनच तिला म्हणाला,
त्यापश्चिमेकडच्या तटबंदीजवळ जाऊ. तिथे झाडाची जरा सावली आहे. शिवाय तिथली भिंतसुद्धाबसायला जरा बरी आहे.
अरे पण आधीदेवीचं दर्शन तरी घेऊया.
तू मला भेटायलाआली आहेस कि देवदर्शन करायला?”
आता मात्र तीचांगलीच बुचकळ्यात पडली. तिला नेमकं काय बोलावं सुचेना. तिने त्याच्या चेहऱ्याकडेपाहिलं. त्याचा चेहरा तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होता.
अरे म्हणजे मीआलीये तुलाच भेटायला पण आता किल्ल्यावर आलोच आहोत तर देवीचं दर्शन नको का घ्यायला?”
देवीने तुझ्याकानात येऊन सांगितलंय काकि माझं दर्शननाही घेतलंत तर मी कोपेन म्हणून.
तसं नव्हे पण...
तसं नव्हे पण मगकसं?” त्याने जरा आवाज चढवून विचारलं.
अरे मी... तूचिडतोस कशाला... माझं म्हणण फक्त इतकंच आहे कि आलोय इथवर तर दर्शन घेऊ. मी ओटीहीआणली आहे यावेळी...” ती अडखळतच म्हणाली.
हा नको तोशहाणपणा करायला तुला कुणी सांगितलं?” आता तो चांगलाचचिडला होता. आणि ती आणखीनच गोंधळली होती.
अरे पणगेल्यावेळी आपण आलो होतो तेव्हा तर तू किती भक्तिभावाने देवीचं दर्शन घेतलं होतंस.आणि तूच नाही का मला ओरडला होतास ओटी आणली नाही म्हणून. त्या दिवशी किती रागावलाहोतास तू. अरे म्हणून यावेळी न विसरता ओटी घेऊन आले रे मी.
मग काय उपकारकेलेस माझ्यावरगेल्यावेळी मी माझ्या आईला घेऊन आलो होतो. खासतुझी भेट घालून देण्यासाठी. आईला इम्प्रेस करण्यासाठी ते ओटीच नाटक होतं. एवढंसाधं कळत नाही का तुलाखरंच पुस्तकीकिडा आहेस तू.देवाने जे डोकं दिलंयत्याचा कधीतरी वापर कर.
आता मात्र तोचांगलाच चिडला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला वाईटही वाटत होतं आणिसंतापही येत होता. एरव्ही तू तुझं डोकं चालवत जाऊ नकोस असं सांगणारा आज तिला डोकंवापरण्याचा सल्ला देत होता. तो रागाच्या भरात सरळ तटबंदीकडे निघून गेला. देवळाच्याआवारात ती एकटीच उभी. तिचे डोळे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्थिरावले असतानातिची सावली त्याच्याविरुद्ध दिशेने धावत होती.
हातातल्याओटीच्या साहित्याकडे तिने एकक्षण पाहिलं. तिची नजर मंदिरात गेली. देवीच्या चेहऱ्यावर शांत स्मितहास्य होतं. तिने पुन्हा एकदात्याच्याकडे पाहिलं. त्याने वळून पहावंहलकेच हसावंआणि जवळ बोलवावं यापेक्षा अधिक तिची अपेक्षाही नव्हती. पणतो वळलाच नाही. तिनेही मग थोडं हट्टी व्हायचं ठरवलं. त्याला काय वाटेल आणि तो अजूनकिती रागवेल याचा विचार न करता तिने मंदिराच्या दिशेने पाऊल टाकले. त्या भव्यमंदिरात फारशी गर्दी नव्हती. तिने अपार भक्तिभावाने देवीची ओटी भरली. हात जोडूनत्याच्यासाठी प्रार्थना केली. मनोभावे प्रदक्षिणा घातल्या. पश्चिम दरवाज्यातूनएकक्षण त्याच्याकडेही नजर टाकली. तो कुणाशीतरी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. तीदर्शन घेऊन सभामंडपात आली. पंचधातूंनी बनवलेल्या सिंहाच्या प्रतिमेशेजारी ती बसली.त्याच्या अणकुचीदार दातांकडेनखांकडे ती एकटकपाहत राहिली. प्रतिकाराची आपली सारी शस्त्र म्यान झाल्याच्या जाणीवेसोबतच तिलायाचही भान आलं की तो आपली वाट पाहतोय.
तिने पुन्हा एकदादेवीसमोर हात जोडले. देवीकडे पाठ न करता ती उलट्या पावलांनी देवळाबाहेर पडली.रिकामी झालेली पिशवी तिने नीट घडी करून पर्समध्ये ठेवली. प्रसाद घेतला. तिची नजरत्याच्याकडे स्थिरावली होती. लगबगीने पावलं उचलत ती त्याच्याजवळ पोहोचली. त्यानेतिच्याकडे पाहिलं. तिने काहीही प्रतिक्रिया न देता हाताची बंद मूठ त्याच्यासमोरधरली.
प्रसाद आणलाअसशील.” तो किंचित हसत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरही हसू उमललं.
मी कितीही ठरवलंतरी फार काळ राग राहतच नाही तुझ्यावर. हे असं काहीतरी करतेस ना त्यावर काय बोलावंकळतच नाही.” त्याने प्रसादाचे फुटाणे तोंडात टाकले. अखेर आपलं तेच खरं केलंस ना.
आपलं तेच खरंकरण्याचा अधिकार काय फक्त तुलाच आहेहट्टी मलाही होतायेतं.
माहिती देतेयस कीचेतावणी?”
दोन्ही.” ती खळखळून हसत म्हणाली. आणि तोही मोकळेपणाने हसला.
आज कामावरून हाफडे का घेतलास?” तिने त्याच्याशेजारी बसत विचारलं.
तुला भेटायचंम्हणून.” त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिची नजर मावळत्या सूर्यालानिरखू लागली. एवढं काय काम काढलय ते विचारणार नाहीस?”
विचारलं नाही तरीतू सांगशीलच की.” ती म्हणाली.
आपलं ते साडीवेणीओटीचंद्रकोर सगळं नाटक अगदी व्यवस्थित वठलं हं. आई अगदी फुलऑंन इम्प्रेस आहे.” तो फारच खुश होता. पण त्याच्या बोलण्यानेतिच्या चेहऱ्यावरची रेषा यत्किंचितही हलली नाही. त्याचं त्याकडे लक्षही नव्हतं. तोबोलतच होता.
आई म्हणत होती.किती संस्कारी मुलगी आहे ना ती. म्हणजे तु गं. तिला अशा साध्या सरळ संस्कारी मुलीचआवडतात. बाकी माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे अगदीच मॉड. त्यातल्या त्यात तूच जराकाकूबाई टाईप. म्हणून तर एवढ्या सगळ्या मुलींत तुलाच choose केलं. आणि त्यात आणखी थोडी भर घालून आईसमोर प्रेझेंट केलं.बस्स. काम भागलं.” तिच्याच रुमालाला प्रसादाचे हात पुसत तोम्हणाला. ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पहात होती. त्याच्या चेहऱ्यावर फक्त आणिफक्त आनंद होता. जिंकण्याचा. नेमकं काय जिंकण्याचात्याचं त्यालाचठाऊक...
अशी काय पाहतेयसतुला आनंद नाही का झालामी मात्र खूप खुशआहे. आणि आईसुद्धा. तुही बोल आता तुझ्या घरी. मग आई येईलच रीतसर मागणी घालायला.
हो आता बोलायलाचहवं मला घरी.” शून्यात लागलेली नजर न हलवताच ती म्हणाली.
बोलून टाक. आताकाही हरकत नाही.
त्या दिवशीतुझ्या आईने मला रिजेक्ट केलं असतं तर मला माझ्या घरी हा विषय काढायची गरजच पडलीनसती ना?”
As obvious.
तिने त्याच्याकडे पाहिलं.किंचित भुवया उंचावून. त्याच्याही लक्षात आलं. बोलू नये ते बोलून गेल्याचं.
हे बघ मला अगदीचकाही तसं म्हणायचं नव्हतं. तू उगीच काही गैरसमज करून घेऊ नकोस. आई नको म्हणालीअसती तरी मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाच असता नाआणि मी माझ्या आईच्या शब्दाबाहेर नाही हे तुला माहित होतचकी. याला तू नाही म्हणूच शकत नाहीस.
तो त्याच प्रश्नार्थकचेहऱ्याने तिच्याकडे पहात राहिला. तिचा चेहरा पुन्हा निर्विकार. आता तिला समजावूनफारसं काहीच साध्य होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग नेहमीप्रमाणेचत्याने तो विषय तिथेच थांबवला.
तू तुझ्या घरी हाविषय काढ. बघ घरचे काय म्हणतात ते. मग मी आणि आई येऊ तुमच्या घरी. आता तरी खुश?”त्याने तिची कळी खुलावी म्हणून लाडात येत विचारलं. अन् मगतिनेही ओठांवर खोटं खोटंच का होईना हलकंसं हसू आणलं.
पण येशील तेव्हाया मानेवर लोंबणाऱ्या झिंझ्या कापून ये. माझ्या घरच्यांना आवडणार नाहीत.
तिच्या यावाक्यावर तोही किंचित हसला. आपल्या केसांवर हात फिरवत तो म्हणाला,
अगं पण मलातुझ्याशी लग्न करायचंय तुझ्या घरच्यांशी नाही.
अरे मग मलाहीतुझ्याशी लग्न करायचंय तुझ्या आईशी नाही.
तुला वाद घालायचाआहे का माझ्याशी?” त्याने गंभीर होत विचारलं.
नाही. मलाकुणाशीच कोणताच वाद घालायचा नाही. कारण मला सारंच मान्य आहे. तुझा रागतुझं प्रेमतुझं फटकारणंओरडणंचारचौघात फटकूनवागणं. मला सारंच मान्य आहे. आणि तक्रार करणं तर मी विसरूनच गेलेय तुलाभेटल्यापासून. असंचं वागायचं असतं ना आम्ही?”
जर तुला मी हवाअसेन तर तुला तरी किमान असंचं वागावं लागेल. माझा नाईलाज आहे.
आणि माझा कधीचअसा असा नाईलाज होऊ शकत नाही.” तिच्या आवाजातकमालीची अस्वस्थता होती. आणि त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा तणाव.
तू केव्हापासूनइतका विचार करायला लागलीस?” त्याने तिच्याखांद्यावर हात ठेवत विचारलं.
तुला हा प्रश्नविचारावासा वाटला?”
इतका विचार नकोकरूस. तुलाच त्रास होईल.” तो तिचा खांदाहलकेच दाबत म्हणाला.
तिने त्याच्याकडेपाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरडोळ्यांत तिलाअभिप्रेत असणारं काहीच नव्हतं. तो तितकाच निश्चल. तितकाच शांत. घास गिळूनसुस्तावलेल्या अजगरासारखा. तिला आता असे धक्के पचवण्याची सवय झाली होती.
हम्म. बरोबर आहेतुझं. मात्र विचार मनात येतातच ना. आज सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य उद्या उगवणारनाही असं नसतं ना.
हे बघ. मलातुझ्या इतकं गोलगोल बोलता येत नाही. पण हा समोरचा अथांग समुद्र पहातेयस ना. मीतसाच आहे. त्याच्या तळाशी काय असेल हे आपण नाही सांगू शकत. बरोबर नाअगदी तसंच आहे. माझ्या वागण्याचाबोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याची गरजहीनाही तुला.
हो बरोबर आहेतुझं. तु तसा नेहमीच बरोबर असतोस. तू आहेसच मुळी समुद्रासारखा. आणि मी भूमी.
तो हसला. काहीसंकुत्सितच हसला.
अखेर माझं म्हणणंपटलं तर तुला. पटायला हवंच. अगं आता तूच विषय काढलास म्हणून मी माझं मत मांडतो.आता भूमीचेच बघ किती प्रकार. ओसाडमाळराननापीकसुपीककातळाचीकुरणाची कितीतरीआहेतपण भाव कशाला मिळतो सुपीक भूमीला. आणि भूमीवर जे काही उपजतंतेही कुठे असतं तिच्या हक्काचंआता एवढे उंचपर्वत आहेतत्यात इतक्या नद्या आहेतभूमीचा प्रचंड प्रदेश व्यापून अखेर त्या धाव घेतात तरसमुद्राकडेच नाइतकंच कशाला आयुष्यभर या भूमीवर पोसलेल्या माणसाच्यामृत्युनंतर त्याच्या अस्थिसुद्धा आश्रय समुद्राचाच घेतात. भूमी प्रतीक आहेत्यागाचं,समर्पणाचंएकनिष्ठतेच.” तो ठामपणे म्हणाला.
त्याला तिच्याकडूनप्रत्युत्तराची अपेक्षा नव्हती. तरीही त्याने तिच्याकडे पाहिलं. तिची नजर जमिनीकडेरोखलेली होती. एका जुनाट झाडाचं सुकलेलं मूळ वर आलं होतं. बोटाच्या नखाने त्याच्याआजूबाजूची जागा उकरत ती शांतपणे म्हणाली.
मला पुन्हा एकदातुझं सारंच मान्य आहे. पण हे मूळ पाहतोयसया भूमीने त्यालाअजूनही उराशी कवटाळून धरलंय. झाड केव्हाच मरून गेलं असेल अथवा उन्मळून पडलं असेल. हेमूळही बघ ना कसं सुकून गेलंय. तरीही या भूमीने त्याचं अस्तित्व जपलंय. भूमीचा हाविशेष सांगायला विसरलास तू. आणि एक सांगू. अथांग समुद्राच्या तळाशी काय काय असूशकेल हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र तरीही एक सत्य नाकारता येणार नाही. अथांगसागराचा तळ म्हणजे शेवटी भूमीच असते. भूमीच्याच एका विशाल पोकळीत समुद्राचा जन्महोतो. भूमीच करते प्रसंगी स्वतःला अदृश्य पण ती असते. प्रत्येकाच्या तळाशी.प्रत्येकाच्या मुळाशी. ती जपते सारंच. साऱ्याचंच जीवन आणि मरणही. ती असतेच रे तीअसतेच.
तो तिच्याकडे अवाक् होऊनपहात राहिला. तिची नजर त्या सुकलेल्या मुळावर स्थिरावली होती. बोटं मातीने माखलीहोती. आणि चेहऱ्यावर काहीसं गूढ हास्य. आता तो बुचकळ्यात पडला होता. ती भूमीबद्दलबोलत होती की स्वतःबद्दल...

बील गेट्स यांनी ... एका शाळेमध्ये केलेल्या भाषण

बील गेट्स यांनी ...
एका शाळेमध्ये
केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१०
नियम) सांगीतल्या ....
ज्या कोणत्याही शाळेत 
शिकविल्या जात नाहीत.
नियम १ –
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
नियम २ –
जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही.
स्वत:बद्दल अभिमान
बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा.
स्वतःला सिध्द करा.
नियम ३ –
कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका.
एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही,
त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार
कष्ट करावे लागतात .
नियम ४ –
आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण
अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
नियम ५ –
तुम्ही केलेली चुक
ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि
तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका,
झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
🚨नियम ६ –
तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे
आणि
अरसिक नव्हते
जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन
करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच
आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
नियम ७ –
उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो.
काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात
हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
नियम ८ –
आयुष्याच्या शाळेत
इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते.
स्वतःचा शोध
घ्यायला, नविन
काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच
शोधायचा असतो
नियम ९ –
टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल
नसते.
खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त
काम आणि काम.
नियम १० –
सतत अभ्यास करणारया आणि अपार
मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका.
एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच
हाताखाली काम करावे लागेल .    
                                                                         MarathiKing.In

Tuesday 30 December 2014

आमच्या ब्रेकअपच्या १० महीन्या नंतर मी तीला Birthday Wish करण्यासाठी Call केला .....

आमच्या ब्रेकअपच्या १०
महीन्या नंतर
मी तीला Birthday Wish
करण्यासाठी Call केला .....
ती ; Hello .....
मी ; Happy Birthday
Shona.....
ती ; Thanx,
पण तू कोण ???
मी ; काय गं एवढ्या लवकर विसरलीस
का मला,
ओळखलं नाहीस का ???
ती ; अरे पन,
हा तुझा नविन नंबर आहे का ???
मी ; ये बावळट मी बोलतोय.....
ती - सुरेश तु,
तु नंबर Chenge केला का,कसा आहेस ???
मी ; तुला काय फरक पडतो,
मी कसा का असू दे ना .....
ती ; तसं नाही रे,
मला तुझी खुप आठवण येतेरे .....
मी ; हो माहीत आहे,
किती आठवण येते तुला माझी
म्हणुनचं १० महीन्यात एक पण Call
नाही केलास तू .....
ती ; तसं काही नाही रे,
पण शेवटी तू मलाचं
दोशी ठरवलसं ???
मी ; हो मग,
माझी चूक नसताना खोटे आरोप केलेस,
ईतर मुलांना प्रेमात फसवलसं तू,
मग दोश तूझा नाही तर माझा आहे
का ???
ती ; हा आता तू असेचं बोलणार,
बरं जाऊ दे स्वप्नीलला भेटलास कातू
आणि विलास कसा आहे ???
मी ; विलास ने आत्महत्या केली,
एका मुलीने धोका दिल्यामूळे,
काय करणार ख-या प्रेमाची किँमत
मुलीँना कळतचं नाही ना,
त्यांना टाईमपास करणारे मुले
आवडतात .....
ती ; हो का,
अरे वा मग तू अजून कसा काय जिवंत
आहेस ???
मी क्षणभर मुक झालो
आणि स्वतःलाचं विचारु लागलो ....
काय रे सुरेश ?????
हेचं का तूझे तिच्यावर केलेले खरे प्रेम,
एवढे तिच्यावर जिवापाड करुन ही,
शेवटी ती तू मरण्याची वाट
पाहतेय .....
नंतर मी थोडा सावरलो आणि फोन
ठेवण्या अगोदर फक्त एवढचं बोललो,
शोना तू माझं प्रेम जरीमान्य केलं
नाही,
तरी मी तुझ्यासाठी मी जीव देणार
नाही,
कारण तूला खोटे प्रेम
करायला दुसरा मुलगा जरुर मिळेल,
पण माझ्या आई-बाबांना
पुन्हा मी मिळणार नाही.....
एवढे बोलून आसंवे पुसत मी फोन ठेवून
दिला .....
तात्पर्य - मी
केलेल्या ख-या प्रेमाची तीने कदरचं
केली नाही ...                    



                                                            अय्या खरचं.