Friday 15 March 2013

ch-39 नो बडी वील मुव्ह


अंजली आपल्या खुर्चीवर बसून काही ऑफीशियल कागदपत्र चाळीत होती आणि तिच्या बाजुलाच शरवरी कॉम्प्यूटरवर बसून काहीतरी ऑफीशियल काम करीत होती. तेवढ्यात कॉम्प्यूटरचा बझर वाजला. अंजलीने वळून मॉनिटरकडे बघितले.

'' त्याचाच मेसेज आहे '' शरवरी म्हणाली.

अंजली उठून कॉम्प्यूटर जवळ गेली. ती जाताच कॉम्प्यूटरसमोरुन उठून तिने अंजलीसाठी जागा करुन दिली.

'' जा लवकर जा'' अंजली कॉम्प्यूटरसमोर बसत शरवरीला म्हणाली.

शरवरी ताबडतोब तिथून निघून कॅबिनच्या बाहेर पडली. अंजलीच्या कॅबिनमधून बाहेर पडून शरवरी सरळ तिच्या कॅबिनच्या शेजारी असलेल्या एका रुममधे गेली. तिथे इन्स्पेक्टर कंवलजित आणि ते दोघे कॉम्प्यूटर एक्स्पर्टस एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. शरवरी घाईघाईने त्यांच्याजवळ आली. तिची चाहूल लागताच तिघेही जण वळून तिच्याकडे पाहू लागले.

'' जसं तूम्ही सांगितलं होतं तसंच झालं ... ब्लॅकमेलरचा पुन्हा मेसेज आला आहे... '' शरवरी घाई घाईने आल्यामुळे दम लागलेल्या स्थितीत म्हणाली.

ते दोघे कॉम्प्यूटर एक्सपर्टस काहीही न बोलता आपल्या कामाला लागले.

'' सुरज... कम ऑन... यावेळी साला कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही... ''

'' सर ऍज बिफोर दिस टाईम ऑल्सो हि इज कॉलींग फ्रॉम मुंबई... आणि त्याचा आय पी ऍड्रेस बघा...''

तो बोलायच्या आधीच इन्सपेक्टरने मुंबईला इन्स्पेक्टर राजला फोन लावला होता,

'' हं राज ... पुन्हा आम्ही ब्लॅकमेलरला ट्रेस केलेलं आहे... अजुनही तो चॅटींग करीत आहे... तु त्याची एक्सॅक्ट लोकेशन शोध... ऍन्ड सी दॅट दिस टाईम द बास्टर्ड शुड नॉट एस्केप... हं त्याचा आय पी ऍड्रेस लिहून घे...''


अतूल सायबर कॅफेमधे एका कॉम्प्यूटर समोर बसून चॅटींगमधे मग्न होता.

'' मिस अंजली... हाय कशी आहेस?'' त्याने मेसेज टाईप करुन पाठविला.

बराच वेळ झाला तरी अजुन तिचं उत्तर यायला तयार नव्हतं. पण चॅटींगमधे तिचं नाव तर दिसत होतं.

कॉम्प्यूटर उघडं सोडून कुठे गेली तर नाही साली...

किंवा आपला अचानक, अनपेक्षित मेसेज आल्याने गोंधळली असेल...

त्याने विचार केला. अजूनही तिचा मेसेज यायला तयार नव्हता. रागाने आता त्याचे जबडे वळायला लागले होते. तेवढ्यात तिकडून मेसेज आला, '' ठिक आहे''

तेव्हा कुठे अतूलला हायसं वाटल. तो आता पुढील मेसेज, जो त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा होता टाईप करु लागला,

'' तुला पुन्हा त्रास देतांना मला वाईट वाटतं आहे... पण काय करणार ... पैसा ही साली गोष्टच वेगळी असते... कितीही जपून वापरली तरी संपून जाते... मला यावेळी 20 लाख रुपयाची नितांत गरज आहे...'' अतूलने मेसेज टाईप करुन पाठविला.

'' आत्ता तर तुला 50 लाख रुपए दिले होते... आता माझ्याजवळ पैसे नाही आहेत...'' तिकडून अंजलीचा मेसेज आला.

'' बस हे शेवटचं... कारण हे पैसे घेवून मी परदेशात जाण्याचा विचार करतोय'' अतूलने मेसेज पाठविला.

'' तु परदेशात जा... नाहीतर कुठेही जा ... मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही ... हे बघ... माझ्याजवळ काही पैशाचं झाड नाही आहे... '' तिकडून अंजलीचा मेसेज आला.

'' ठिक आहे... तुला आता मला कमीत कमी 10 लाख रुपए तरी द्यावे लागतील... पैसे केव्हा कुठे आणि कसे पाठवायचे ते मी तुला मेल करुन सांगीन...'' अतूलने पाठविले आणि चॅटींग सेशन बंद केला.

आता तो मेलबॉक्स उघडू लागला तेवढ्यात त्याचं अनायसेच खिडकीच्या बाहेर लक्ष गेलं आणि तो स्तब्ध होवून तिकडे बघू लागला. बाहेर एक पोलिस इन्स्पेक्टर आणि अजून एक पोलिस लगबगीने सायबर कॅफेकडेच येत होते. आता मात्र त्याच्या हालचालींना गती आली होती. त्याने पटापट आपला कॉम्प्यूटर ऑफ केला आणि काऊंटरवर पैसे देवून तो सायबर कॅफेच्या बाहेर पडला. तो बाहेर पडला त्यानंतर काही क्षणातच घाई घाईने पुलिस इन्स्पेक्टर आणि त्याचा सोबती पोलिस सायबर कॅफेमधे घुसले. सायबर कॅफेत जाताच इन्सपेक्टरने जाहिर केले,

'' नो बडी वील गो आऊट ऑफ दी कॅफे... ऑल ऑफ यू स्टे व्हेअर यू आर... नो बडी वील मुव्ह ''


अंजलीच्या कॅबिनच्या शेजारच्या खोलीत दोन कॉम्प्यूटर एक्सपर्टस, अंजली आणि शरवरी मोठ्या आशेने मोबाईलवर बोलनाऱ्या इन्स्पेक्टर कंवलजितकडे पाहत होते.

इन्स्पेक्टरने मोबाईल आपल्या कानावरु काढून बंद केला आणि निराशेने अंजलीकडे बघत ते म्हणाले,

'' द बास्टर्ड इस मॅनेज्ड टू एस्केप अगेन...''

अंजली आणि शरवरीने निराशेने एकदुसऱ्याकडे बघितले.


क्रमश:..  


Read Helth ( Please Add Skeep ) .................

No comments:

Post a Comment