Thursday 14 March 2013

CH-4 जेव्हा शब्द


इंटरनेट कॅफेत विवेक एका कॉम्प्यूटरच्या समोर बसून काहितरी करीत होता. एका त्याच्याच वयाच्या मुलाने, कदाचित त्याचा मित्रच असावा, जॉनीने मागून येवून त्याच्या दोन्ही खांद्यावर आपले हात ठेवले आणि त्याचे कांधे दाबल्यागत करीत म्हणाला, '' हाय विवेक... काय करतो आहेस ?''

आपल्या तंद्रीतून बाहेर येत विवेकने मागे वळून पाहाले आणि पुन्हा आपले कॉम्प्यूटरवरचे काम सुरु ठेवीत म्हणाला '' काही नाही यार... एका मुलीला मेल पाठविण्याचा प्रयत्न करतो आहे''

'' ओ हो... तो मामला इश्क का है'' जॉनी त्याला चिडवित म्हणाला.

'' अरे नाही यार... बस फक्त मित्र आहे...'' विवेक म्हणाला.

'' प्यारे ... मानो या ना मानो...

जब कभी लडकीसे बात करना हो और लब्ज ना सुझे...

और जब कभी लडकीको खत लिखना हो और शब्द ना सुझे...

तो समझो मामला इश्क का है ...''

जॉनी त्याला अजुन चिडविल्यागत करीत म्हणाला.

विवेक काही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला.

'' बघ बघ गाल कसे लाल लाल होताहेत...'' जॉनी म्हणाला.

विवेक पुन्हा काहीही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला.

'' जब कोई ना करे इन्कार ...

या ना करे इकरार ...

तो समझो वह प्यार है ''

जॉनी त्याला सोडायला तयार नव्हता.

आता मात्र विवेक चिडला, '' तू इथून जाणार आहेस की माझा मार खाणार आहेस?...''

'' तु समजतो तसं काही नाही आहे... मी फक्त माझ्या पिएचडीचे टॉपीक्स सर्च करतो आहे आणि मधून मधून विरंगुळा म्हणून काही मेल्स पाठवितो आहे बस्स...'' विवेक आपले चिडणे आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न करीत म्हणाला.

'' बस्स?'' जॉनी.

'' तु आता जाणार आहेस का?... की तुझी एवढ्या सगळ्या लोकांसमोर अपमानीत होण्याची इच्छा आहे?'' विवेक पुन्हा चिडून म्हणाला.

'' ओके .. ओके... काम डाऊन... बरं तुझ्या पिएचडीचा टॉपीक काय आहे?'' जॉनीने विचारले.

'' इट्स सिक्रीट टॉपीक डीयर... आय कान्ट डिस्क्लोज टू ऐनीवन...'' विवेक म्हणाला.

'' टू मी आल्सो ?...'' जॉनीने विचारले.

'' यस नॉट टू यू आल्सो'' विवेक जोर देवून म्हणाला.

'' तुझं हे बरं आहे... सिक्रसीच्या नावाखाली ... प्रेमाचे चाळेही चालवायचे...'' जॉनी म्हणाला.

'' तू ते काहीही समज...'' विवेक म्हणाला.

'' नाही आता मी समजण्या गिमजन्याच्या पलिकडे गेलो आहे...'' जॉनी म्हणाला.

'' म्हणजे?''

'' म्हणजे ... मला काहीएक समजण्याची गरज उरलेली नाही''

'' म्हणजे?''

'' म्हणजे माझी आता पक्की खात्री झाली आहे'' जॉनी म्हणाला.

विवेक पुन्हा चिडून मागे वळला. तोपर्यंत जॉनी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत तिथून दाराकडे निघून गेला होता.


क्रमश:...


Read MaraThi News ( Please Add Skeep ) ............

No comments:

Post a Comment