Sunday 17 March 2013

Ch-51 दवाखाना


मोबाईलमधून बंदूकीच्या गोळीचा आवाज आला आणि अंजली घेरी येवून खाली पडली. कंपनीच्या हॉलमधलं आनंदी वातावरण एकदम श्मशानवत शांत झालं. इन्स्पेक्टरने घाई करुन एकदोन जणांच्या मदतीने अंजलीला उचललं. कुणीतरी पटकन फोन करुन ऍम्बूलन्स बोलावली.


अंजली बेडवर पडलेली होती. तिच्या जवळ डॉक्टर उभे होते आणि तिचा बीपी चेक करीत होते. इन्स्पेक्टर, भाटीयाजी, शरवरी आणि अजून एकदोनजन तिच्या आजुबाजुला अस्वस्थतेने उभे होते.

'' डॉक्टर कशी आहे तब्येत?'' शरवरीने विचारले.

'' यांच्यावर मोठा अनपेक्षीत मानसिक आघात झालेला दिसतो आहे की जो त्या पेलू शकल्या नाहीत... अश्या वेळेस थोडा वेळ, थोडा अवधी जावू देणं फार महत्वाचं असतं... सध्या ह्यांना मी झोपेचं इन्जेक्शन दिलं आहे... तोपर्यंत तुम्ही लोक बाहेर बसा... पण यांना शुद्ध आल्याबरोबर यांच्याजवळ कुणीतरी असणं आवश्यक आहे... यांच्या जवळचं कोण आहे?'' डॉक्टरांनी विचारले.

'' मी'' शरवरी म्हणाले.

'' तुम्ही कोण त्यांच्या... बहिण?''

'' नाही मी त्यांची मैत्रीण'' शरवरी म्हणाली.

'' दुसरं कुणी नाही का ... आई वडील?''

शरवरीने इकडे तिकडे पाहालं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, '' डॉक्टर त्यांच्या जवळच्या नात्यातलं असं कुणीच नाही आहे''

'' बरं ठिक आहे ... असं करा तुम्ही यांच्याजवळच थांबा '' डॉक्टर शरवरीला म्हणाले.

तसंही शरवरीचं तिथून हलण्यास मन तयार नव्हतं. बाकीचे सर्व लोक खोलीतून बाहेर पडले आणि शरवरी तिथेच तिच्या उशाशी बसून राहाली. कितीही नाही म्हटलं तरी शरवरीला आपल्या मैत्रीणीबद्दल आपुलकी वाटत होती. ती जरी तिची बॉस असली तरी तिने कधी तिला बॉससारखी वागणूक दिली नव्हती. आणि खरं म्हणजे अंजलीने तिला एक मैत्रिण म्हणूनच तो तिच्या पीए चा जॉब जॉइन करायला सांगितला होता. शरवरी तिच्या उशाशी बसून तिची शुध्दीवर येण्याची वाट पाहू लागली.


अंजलीला इंजक्शन देवून जवळपास दोन-तिन तास होवून गेले होते. तिच्या रुमच्या बाहेर अजूनही इन्स्पेक्टर, भाटीयाजी आणि इतर बरेच लोक तिची शुध्दीवर येण्याची वाट पाहू लागले होते. शुद्धीवर आल्यावर तिची मानसिक परीस्थिती कशी राहाते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. खरं म्हणजे तिला आई वडिल असं जवळचं कुणीच नसल्यामुळे तिने विवेकवर आपला जीव पुर्णपणे झोकून दिला होता. आणि तोच या जगातून नाहीसा व्हावा हा तिच्यासाठी खुप मोठा आघात होता. तेवढ्यात एक नर्स लगबगीने बाहेर आली.

'' इन्स्पेक्टर त्यांना शुद्ध आली आहे'' नर्स म्हणाली आणि पुन्हा आत नाहीशी झाली.

सगळे लोक लगबगीने आत गेले.

आत अंजली शरवरीच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होती. आणि शरवरी तिच्या पाठीवर थोपटून आणि तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शक्य होईल तेवढा धीर देत होती. आधी तिला ती वाईट बातमी कळाल्यानंतर तिच्या भावना व्यक्त करण्यास वाव मिळाला नव्हता. ती आपल्या भावनांना व्यक्त करण्याच्या आधीच बेशुद्ध पडली होती. खोलीतलं ते हृदयविदारक दृष्य पाहून इन्स्पेक्टर तिला धीर देण्यासाठी पुढे सरसावू लागले तेव्हा बाजुला उभ्या असलेल्या डॉक्टरांनी त्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला. डॉक्टरांचही बरोबर होतं. तिच्या सर्व भावना बाहेर येणं फार आवश्यक होतं. सगळेजण, त्यांना जरी वाईट वाटत होतं तरी शांततेने ते दृष्य पाहत होते.

तेवढ्यात रुमच्या बऱ्याच दूरुन, बाहेरुन, कदाचित दवाखान्याच्या मुख्य दरवाजातून आवाज आला, '' अंजली...''


क्रमश:...   


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...

No comments:

Post a Comment