Thursday 14 March 2013

CH-2 चॅटींग

अंजलीने ऑफीसमध्ये आल्याबरोबर रोजची महत्वाची आणि आवश्यक कामे उरकून घेतली. जसे महत्वाची पत्र, महत्वाच्या ऑफीशियल मेल्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स इत्यादी. काही महत्वाच्या मेल्स होत्या त्यांना उत्तरं पाठवली. काही मेल्सचे प्रिट्स घेतले. सगळी महत्वाची कामे उरकल्यावर तिने तिच्या कॉम्प्यूटरवर चॅटींग सेशन ओपन केलं. कामाचा शिण जाणवायला लागला की किंवा वेळ असल्यास ती चॅटींग करायची. हा तिचा रोजचाच खाक्या होता. एवढ्या मोठ्या कंपनीला सांभाळायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कामाचा ताण, टेन्शन्स यांपासून विरंगुळा मिळविण्यासाठी तिने चॅटींग हा चांगला पर्याय शोधला होता. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. तिने चॅटींग विंडो मधील मेसेजेस वाचता वाचता फोन उचलला. अगदी कॉम्प्यूटरच्या पॅरेलल प्रोसेसिंग सारखी ती सगळी कामं एकाच वेळा हाताळू शकत असे.

'' यस मोना''

'' मॅडम .. नेट सेक्यूराज मॅनेजींग डायरेक्टर ... मि. भाटीया इज ऑन द लाईन...'' तिकडून मोनाचा आवाज आला.

'' कनेक्ट प्लीज''

'' हाय'' चॅटींगवर कुणाचा तरी मेसेज आला होता.

अंजलीने कुणाचा मेसेज आहे ते चेक केलं. 'टॉम बॉय' मेसेज पाठविणाऱ्याने धारण केलेलं नाव होतं.

' काय लागट माणूस आहे हा' अंजलीने विचार केला.

हा 'टॉम बॉय' नेहमी चॅटींगवर असायचाच असायचा. आणि अंजलीने चॅटींग सेशन ओपन केल्याबरोबर त्याचा मेसेज हमखास यायचा.

' याला काय काम धंदे आहेत की नाहीत... सदान कदा नुसता चॅटींगवर पडलेला असतो'

अंजलीने आजही त्याला इग्नोर करण्याचं ठरविलं. दोन तिन ऑफलाईन मेसेजेस होते.

अंजली कान आणि खांद्याच्या मधे फोनचं क्रेडल पकडून की बोर्डवर सफाईने तिची नाजुक बोटं चालवीत ते ऑफलाईन मेसेजेस चेक करु लागली.

'' गुड मॉर्निंम मि. भाटीया... हाऊ आर यू'' अंजलीने फोन कनेक्ट होताच मि. भाटीयाचं स्वागत केलं आणि ती भाटीयाचं बोलणं ऐकण्यासाठी मधे थांबली.

'' हे बघा भाटीयाजी... वुई आर द बेस्ट ऍट अवर क्वालीटी ऍन्ड डिलीवरी शेड्यूलस... यू डोन्ट वरी... वुई विल डिलीवर युवर प्रॉडक्ट ऑन टाईम... आमची डिलीवरी वेळेच्या नंतर झाली असं कधी झालं आहे का?... नाही ना?... देन डोंट वरी... तुम्ही एकदम निश्चिंत राहा... यस... ओके... बाय.. '' अंजलीने फोन ठेवून दिला आणि पुन्हा दोन डीजीट डायल करुन फोन उचलला, '' जरा शरवरीला आत पाठव''

फोनवरच्या संभाषनामुळे अंजलीचं कॉम्प्यूटरवर लक्ष राहालं नव्हतं. कारण महत्व म्हटलं तर आधी कामाला होतं आणि बाकिच्या गोष्टी नंतर.

तेवढ्यात कॉम्पूटरवर 'बिप' वाजली. चॅटींग विंडोत अंजलीला कुणाचा तरी मेसेज आला होता. अंजलीनं चिडून मॉनिटरवर बघितलं.

' पुन्हा त्या टॉम बॉयचाच मेसेज असणार' तिने विचार केला.

पण तो मेसेज टॉम बॉयचा नव्हता. म्हणून तो ती वाचायला लागली.

मेसेज होता - ' तुला माझा मित्र व्हायला आवडेल?'


क्रमश:..



Read agriculture ( Please Add Skeep ) .........

No comments:

Post a Comment