Friday 15 March 2013

CH-24 कॉम्पीटीशन

'इथीकल हॅकींग कॉम्पीटीशन - ऑर्गनायझर - नेट सेक्यूरा' असा मोठ्या अक्षरात लिहिलेला बॅनर स्टेजवर लावला होता. आज कॉम्पीटीशनची सांगता होती आणि विजेते जाहिर केले जाणार होते. पारीतोषीक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंजलीला बोलावण्यात आलं होतं. स्टेजवर त्या बॅनरच्या बाजुला अंजली प्रमुख पाहुण्यांसाठी राखून ठेवलेल्या खुर्चीवर बसली होती. आणि तिच्या बाजुला एक वयस्कर माणूस बसला होता. कदाचित तो 'नेट सेक्यूरा' चा हेड असावा. तेवढ्यात स्टेजच्या मागून ऍन्कर समोर माईकपाशी जावून बोलू लागला,

'' गुड मॉर्निंग लेडीज ऍंड जन्टलमन... जसे की तुम्ही सगळे लोक जाणता आहाच की आमची कंपनी '' नेट सेक्यूराचं हे सिल्वर जूबिली वर्ष आहे आणि त्या निमीत्ताने आम्ही इथीकल हॅकींग या प्रतियोगीतेचं आयोजन केलेलं होतं... आज आपण त्या प्रतियोगीतेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे पारितोषीक वितरणाच्या टप्प्यात पोहोचलो आहोत... या पारितोषीक वितरणासाठी आपण एका खास पाहूण्यांना प्राचारण केलेले आहे... ज्यांना एवढ्यातच आय टी वूमन ऑफ द ईयर हा मौल्यवान अवार्ड देवून सन्मानित करण्यात आलेलं आहे... ''

हॉलमधे बसलेल्या सर्वांच्या नजरा स्टेजवर बसलेल्या अंजलीवर खिळल्या होत्या. अंजलीनेही एक मंद स्मित आपल्या चेहऱ्यावर धारण करुन हॉलमधे बसलेल्या लोकांनवरुन एक नजर फिरवली.

'' आणि त्या प्रमुख पाहूण्यांच नाव आहे... मिस अंजली अंजुळकर .... त्यांच्या स्वागतासाठी मी स्टेजवर आमच्या एक्सीक्यूटीव मॅनेजर श्रीमती नगमा शेख यांना आमंत्रित करतो...''

श्रीमती नगमा शेख यांनी स्टेजवर येवून फुलांचा गुच्छ देवून अंजलीचं स्वागत केलं. अंजलीनेही उभं राहून त्या फुलाच्या गुच्छाचा नम्रपणे स्विकार करुन अभिवादन केलं. हॉलमधे टाळ्यांचा कडकडाट घूमला. जणू एका क्षणात हॉलमधे उपस्थित सर्व लोकांच्या अंगात एक उत्साह संचारला होता. टॉळ्यांचा गजर ओसरताच ऍन्कर पुढे बोलू लागला -

'' आता मी स्टेजवर उपस्थित आमचे मॅनेजींग डायरेक्टर श्री. भाटीयाजी यांच्या स्वागतासाठी आमचे मार्केटींग मॅनेजर श्री. सॅम्यूअल रेक्स यांना आमंत्रित करतो आहे...''

श्री. सॅम्यूअल रेक्स यांनी स्टेजवर जावून भाटीयाजींचं एक फुलांचा गुच्छ देवून स्वागत केलं. हॉलमधे पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

'' आता भाटीयाजींना मी विनंती करतो की त्यांनी इथे येवून दोन प्रोत्सानपर शब्द बोलावेत'' ऍन्करने माईकवर जाहिर केले आणि तो भाटीयाजींची माईकजवळ येण्याची वाट पाहत उभा राहाला.

भाटीयाजी खुर्चीवरुन उठून उभे राहाले. त्यांनी एक नजर अंजलीकडे टाकली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केलं. आणि स्थूल शरीर असल्यामुळे हळू हळू चालत भाटीयाजी माईकजवळ येवून पोहोचले.

'' आज इथीकल हॅकींग या स्पर्धेसाठी आमंत्रित केलेली ... जी.एच इन्फॉर्मॆटीक्स ची मॅनेजींग डायरेक्टर आणि आय टी वूमन ऑफ दिस इयर मिस अंजली अंजुळकर, इथे उपस्थित माझ्या कंपनीचे सिनीयर आणि जुनियर स्टाफ मेंबर्स, या प्रतिस्पर्थेत भाग घेतलेले देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले उत्साही युवक आणि युवती, आणि या स्पर्थेचा निकाल ऐकण्यास उत्सुक असलेले लेडीज ऍन्ड जन्टलमन... खरं म्हणजे... ही एक स्पर्धा म्हणून नव्हे तर प्रत्येकाच्या जिवनातली प्रत्येक गोष्ट ही एक स्पर्धाच असते... पण स्पर्धा ही खिलाडू वृत्तीने खेळली गेली पाहिजे हे महत्वाचे... आता बघा ... हा एवढा मोठा आमच्या कंपनीचा स्टाफ पाहून मला एक गोष्ट आठवली... की 1984 साली आम्ही ही कंपनी सुरु केली... तेव्हा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त 3 होती... मी आणि अजुन दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्स... आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक दिवस लढत झगडत... प्रत्येक दिवसाला एक स्पर्धा समजून आजच्या या स्थितीला पोहोचलो... मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आज आपल्या कंपनीने या देशातच नव्हे तर विदेशातही आपला झेडा फडकविला आहे आणि आज आपल्या कर्मच्याऱ्यांची संख्या... 30000 च्या वर आहे...''

हॉलमधे पुन्हा एकदा उत्स्फुर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा कडकडाट ओसरल्यावर भाटीयाजी पुन्हा पुढे बोलू लागले. पण स्टेजवर बसलेली अंजली त्यांचं भाषण एकता एकता केव्हा आपल्याच विचारात बुडून गेली हे तिला कळलेच नाही...


क्रमश:..  


Read Agrowan News ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment