Thursday 14 March 2013

CH -5 मिटींग

सकाळचे दहा वाजले असतील. अंजलीने घाईघाईने आपल्या कॅबिनमध्ये प्रवेश केला. अंजली कॅबिनमध्ये आली तेव्हा शरवरीची आपली आवरा आवर चाललेली होती. अंजलीच्या अनुपस्थितीत तिच्या कॅबिनची पुर्ण जबाबदारी शरवरीवर असायची.

अंजलीने कॅबिनमधे प्रवेश करताच शरवरी अदबीने उभी राहात म्हणाली, '' गुडमॉर्निंग...''

'मॅडम' तिच्या तोंडात येता येता राहालं होतं. अंजली तिला कितीही मैत्रिणीप्रमाणे वाटत असली आणि तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे वागत असली तरी शरवरीला तिच्या या कॅबिनमधे तरी तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे वागणं कठिणंच जायचं.

अंजलीने आत आल्या आल्या शरवरीच्या पाठीवर एक थाप मारली, '' हाय''

तिच्या मागून तिचा ड्रायव्हर तिची सुटकेस घेवून आत आला. जशी अंजली आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाली, तिच्या ड्रायव्हरने तिची सुटकेस तिच्या बाजुला टेबलवर ठेवली आणि तो तिच्या कॅबिनमधून बाहेर निघून गेला.

शरवरी अंजलीच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने तिच्या अपॉईंटमेंट्सची डायरी उघडून तिच्या समोर सरकवली. अंजलीने आपल्या कॉम्पूटरचा स्विच ऑन केला आणि ती डायरीमधील तिच्या अपॉईंटमेट्स वाचायला लागली.

'' सकाळी आल्याबरोबर मिटींग...'' अंजली कसस तोंड करीत म्हणाली, '' बरं या दूपारच्या सेमीनारला मी जावू शकणार नाही.. शर्माजींना पाठवून दे...''

'' ठिक आहे'' शरवरी त्या अपॉईंटच्या बाजुला स्टार मार्क करीत म्हणाली.

'' काय करणार या लोकांना तोंडावर नाहीही म्हणता येत नाही आणि वेळेच्या अभावी सेमीनारला जावूही शकत नाही... खरंच एखाद्या कंपनीच्या हेडचं काम काही सोपं नसतं.''

अंजली आपली सूटकेस उघडून त्यातले काही पेपर्स बाहेर काढू लागली. पेपर काढता काढता एका पेपरकडे बघून, तो पेपर बाजुला काढून ठेवत ती म्हणाली, '' आता हे बघ... या कंपनीच्या टेंडरचं काम अजून अर्धवटच पडलेलं आहे... हा पेपर जरा त्या कुळकर्णीकडे पाठवून दे...''

'' कुळकर्णी आज सूट्टीवर आहेत'' शरवरी म्हणाली.

'' पण त्यांची सूट्टी तर माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंतच होती...'' अंजली चिडून म्हणाली.

'' हो...पण आत्ताच थोड्या वेळापुर्वी त्यांचा फोन आला होता... ते येवू शकणार नाहित म्हणून'' शरवरी म्हणाली.

'' का येवू शकणार नाहीत?'' अंजलीने रागाने विचारले.

'' मी विचारलं तर त्यांनी काही न सांगताच फोन ठेवून दिला.''

'' हे कुळकर्णी म्हणजे अगदी इरिपॉन्सीबल माणूस...'' अंजली चिडून म्हणाली.

आणि मग जे अंजलीची बडबड चालू झाली ती थांबायला तयार नव्हती. शरवरीला पुरेपुर कल्पना होती की अंजली अशी बडबड करायला लागली की काय करायला पाहिजे. काही नाही चूपचाप बसून नुसती तिची बडबड ऐकून घ्यायची. मधे एकही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. अंजलीनेच तिला एकदा सांगितले होते की जेव्हा आपला बॉस असा बडबड करीत असतो, ती त्याची बडबड म्हणजे त्याचा एकप्रकारे स्ट्रेस बाहेर काढण्याचा प्रकार असतो. जेव्हा त्याची अशी बडबड चाललेली असते तेव्हा जी सेक्रेटरी त्याला अजून काही सांगून किंवा अजून काही विचारुन त्याचा अजून स्ट्रेस वाढवत असते ती मोस्ट अनसक्सेसफुल सेक्रेटरी म्हणायची. आणि जी सेक्रेटरी निमूटपणे आपल्या बॉसची बडबड ऐकत आपल्या बॉसची पुन्हा नॉर्मल होण्याची वाट पाहाते ती मोस्ट सक्सेसफुल सेक्रेटरी म्हणायची.

अंजलीची बडबड आता बंद होवून ती बऱ्यापैकी शांत झाली होती. ती हातात काही पेपर्स आणि फाईल्स घेवून मिटींगला जाण्यासाठी खुर्चीवरुन उठून उभी राहाली. शरवरीही उठून उभी राहाली.

बाजूला सुरु झालेल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघत ती शरवरीला म्हणाली, '' तू जरा माझ्या मेल्स चेक करुन घे... मी मिटींगला जावून येते...'' आणि अंजली तिच्या कॅबिनमधून बाहेर जायला निघाली.

'' पर्सनल मेल्ससुद्धा ?'' शरवरीने तिला छेडीत गालातल्या गालात हसत गमतीने विचारले.

'' यू नो... देअर इज नथींग पर्सनल... आणि जेही काही आहे... तुला सगळं माहित आहेच...'' अंजलीही तिच्याकडे पाहत, हसत म्हणाली आणि घाईघाईने मिटींगला निघून गेली.


क्रमश:




Read vigyan ( Please Skeep Add ) ............

No comments:

Post a Comment