Friday 15 March 2013

ch-46 इ-टेररीझम


कंपनीच्या त्या माणसाने कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या कानात काहीतरी सांगून पुर्ण सभेचा नुरच पालटून टाकला होता. डायसवरुन खाली उतरुन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भाटीयाची तडक आपल्या कॅबिनमधे गेले. भाटीयाजींना ते अंतर जणू फार फार दूर वाटत होते. डायसच्या पायऱ्या उतरुन आणि त्यांच्या ऑफीसच्या पायऱ्या चढून प्रथमच त्यांना थकल्यासारखे जाणवत होते. त्यांच्या मागे इन्स्पेक्टर कंवलजित आणि सर्वात मागे असमंजसपणे चालणारे अंजली आणि विवेक. सर्वजण जेव्हा भाटीयाजींच्या कॅबिनमधे शिरले तेव्हा तिथे आधीच काही लोकांनी एका कॉम्प्यूटरभोवती गर्दी केली होती. भाटीयाजीही त्या गर्दीत सामिल झाले आणि कॉम्प्यूटरच्या सुरु असलेल्या मॉनिटरकडे आश्चर्याने पाहू लागले. अंजली आणि विवेकने जेव्हा त्या गर्दीत घुसून मॉनिटरकडे बघितले. तेव्हा कुठे त्यांच्यासमोर पुर्ण चित्र स्पष्ट झाले होते. त्यांच्या मनात उठणाऱ्या नाना शंका क्षणात नाहीशा होवून ती जागा आता चिंता आणि काळजीने घेतली होती. मॉनिटरवर एक ब्लींक होणारा मेसेज दिसत होता - All the server data and computer Data has been deleted. To recover enter the password' आणि मॉनिटरवर एक उलटी मोजणी सुरु असलेली टाईम बॉम्बच्या घड्याळासारखी एक घड्याळ दिसत होती. - 5hrs... 10mins... 26secs

"" ओ माय गॉड... '' भाटीयाजींच्या आश्चर्याने उघड्या असलेल्या तोंडातून निघाले.

त्यांच्या सर्वांगभर घाम सुटला होता आणि चेहऱ्यावरही घामाचे थेंब दिसू लागले होते. सगळा डाटा जर डीलीट झाला तर होणाऱ्या नुकसानाच्या नुसत्या कल्पनेने आणि विचारानेच ते गांगारुन गेले होते.

'' सर हेच नाही तर कंपनीच्या सगळ्या कांम्प्यूटरवर हा मेसेज आला आहे... '' कंपनीचा एक माणूस म्हणाला आणि सर्वांना एका डॆव्हलपमेंट सेंटरमधे नेत म्हणाला, '' सर जरा इकडेही बघा..''

त्याच्या मागे सर्वजण काहीही न बोलता एखाद्या स्मशानात जावे तसे चालू लागले.

डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे एक मोठा हॉल होता आणि तिथे छोटे छोटे क्यूबिकल्स करुन प्रत्येक डेव्हलपर्सवर निगराणीही ठेवता यावी आणि प्रत्येकाला प्रायव्हसीही मिळावी अशी व्यवस्था केली होती. तिथे सर्व कॉम्प्यूटरचे मॉनिटर्स सुरु होते आणि सर्व मॉनिटरवर एकच मेसेज होता - All the server data and computer Data has been deleted. To recover enter the password'

आणि इथेही सर्व कॉम्प्यूटर्सवर उलटी गिनती सुरु होती.

5hrs... 3 mins... 2 secs

'' खरोखरचं गुन्हेगार जाता जाता आपला शेवटचा डाव खेळून गेला आहे'' विवेक म्हणाला.

'' इट्स अ टीपीकल एक्सांपल ऑफ ईटेररीझम'' अंजली म्हणाली.

'' आमच्या तर कंपनीचच अस्तित्व धोक्यात आलं आहे'' भाटीयाजी आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाले.

'' तुम्ही काळजी करु नका ... पासवर्ड गुन्हेगाराकडून कसा काढायचा ते आमचं काम'' इन्स्पेक्टर म्हणाले.

तेवढ्यात दोन पोलिस बेड्या घातलेल्या अतूलला तिथे घेवून आले. इन्स्पेक्टरने प्रकरणाची कल्पना येताच त्याला परत तिथे आणण्यासाठी त्यांच्या साथीदारांना आधीच वायरलेसवरुन सांगितलं होतं. अतूल हळू हळू मस्तावलेल्या चालीत चालत होता आणि गालातल्या गालात मंद मंद हसत होता.

'' पासवर्ड काय आहे?...'' इन्स्पेक्टरने त्याला करड्या आवाजात विचारले.

इन्स्पेक्टरने 'साम दाम दंड भेद' पैकी प्रथम दंड या प्रकाराचा वापर करण्याचे ठरविलेले दिसत होते.

'' घाई काय आहे... आधी माझी बेडी काढा... अजून 5 तास शिल्लक आहेत'' अतूल शांतपणे हसत हसत म्हणाला.

इन्स्पेक्टर रागाने त्याच्या अंगावर धावले तसा अतूल चहऱ्यावर कसलीही भिती न दाखविता तसाच तिथे उभा राहात शांतपणे म्हणाला, ' अं हं... इस्न्पेक्टर ही चूक करु नका... अशी चूक कराल तर मी पासवर्ड तर देईन पण तो पासवर्ड दिल्यानंतर ... तुमच्याजवळ 5 तास आहेत तेही राहणार नाहीत... सगळा डाटा तो पासवर्ड दिल्याबरोबर ताबडतोब नाहिसा होईल...''

इन्स्पेक्टरने त्याच्यावर उगारलेला आपला हात आवरता घेतला. त्यांना जाणवलंकी त्याच्या बोलण्यात तथ्य होतं.

'' काढा माझी बेडी'' अतूल पुन्हा म्हणाला.

इन्स्पेक्टरने त्याला घेवून आलेल्या पोलिसाला खुनावले. त्यांनी इशारा मिळताच चूपचाप त्याची बेडी उघडली. अतूलने आपली मोकळी झालेली मनगटं एका मागोमाग एक दुसऱ्या हातात घेवून फिरवली आणि तो आपले दोन्हीही हात मागे घेवून आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य व्यक्त करीत आळस देत म्हणाला.

'' हं आता कसं... आता कसं मोकळं मोकळं वाटतंय''

'' पासवर्ड काय आहे?'' पुन्हा इन्स्पेक्टरचा करडा आवाज घुमला.

'' इन्स्पेक्टर तुम्हाला वाटतं मी इतक्या सहजा सहजी आणि इतक्या लवकर तुम्हाला पासवर्ड सांगीन?'' अतूल शांततेने इन्स्पेक्टरच्या डोळ्याला डोळे भिडवित म्हणाला.

'' मग तुला काय पाहिजे आहे?'' इन्स्पेक्टरने आपला आवाज अजुनही कडक ठेवीत त्याला विचारले.

'' बस काही नाही ... फक्त माझ्या सुटकेची व्यवस्था.. '' अतूल म्हणाला.

'' म्हणजे?'' इतका वेळ शांत असलेला विवेक पहिल्यांदाच बोलला.

'' अरे हो... बरं झालं तु बोलला... तुला माझ्या बरोबर यावं लागेल... मला इथून दूर ... जिथे हे पुन्हा पोहोचू शकणार नाहीत याची जबाबदारी तुझी... आणि मग तिथून मी यांना मोबाईलवर तो पासवर्ड कळविन ... '' अतूल म्हणाला.

'' आम्हाला काय मुर्ख समजतोस की काय?'' इन्स्पेक्टर पुन्हा करड्या आवाजात म्हणाला.

'' इन्स्पेक्टर ही वेळ आता कोण मुर्ख आहे कींवा बनणार आहे हे ठरवण्याची नाही आहे... थोडक्यात यू डोन्ट हॅव चॉईस... तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करण्यावाचून दुसरा मार्ग नाही'' अतूल म्हणाला.

इन्स्पेक्टरने आलटून पालटून एकदा विवेककडे तर नंतर अतूलकडॆ बघितले.

'' ठिक आहे'' विवेक निश्चयाने म्हणाला.


क्रमश: ..  



Read Marathi News ( Please Add Skeep ) ..................

No comments:

Post a Comment