Friday 15 March 2013

ch-48 अब्जावधी रुपयाचं नुकसान


कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर भाटीयाजी, इन्स्पेक्टर कंवलजित आणि अंजली अजूनही अस्वस्थतेने कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघत होते. मॉनिटरवर अजूनही तोच मेसेज ब्लींक होत होता. - ' All the server data and computer Data has been deleted. To recover enter the password' पण मॉनिटरवर उलटी मोजणी सुरु असलेली टाईम बॉम्बच्या घड्याळासारखी घड्याळ मात्र दर्शवत होती - 0 hrs... 20mins... 20secs.

घड्याळामधे दिसणाऱ्या शुन्य तास या बाबीने सर्वांमधे एक अस्वस्थता, एक भिती पसरवलेली होती.

'' आता तर फक्त 20 मिनीटच शिल्लक आहेत... अजून पर्यंत त्याचा फोन कसा आला नाही'' अंजली म्हणाली.

ती उघडपण दाखवित नसली तरी अंजलीला त्या कंपनीच्या अस्तित्वापेक्षा विवेकची जास्त काळजी होती. इन्स्पेक्टर कंवलजितने अंजलीच्या खांद्यावर धीराचा हात ठेवीत म्हटले, '' धीर धर... फोन येईलच एवढ्यात''

'' पण त्याचा फोन जर आला नाही तर आमच्या कंपनीचं काय होईल?'' भाटीयाजी काळजीच्या सुरात म्हणाले. हा त्यांनी विचारलेला प्रश्न, प्रश्नापेक्षा त्यांची काळजी दर्शवित होता त्यामुळे त्यांच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या भानगडीत कुणी पडले नाही. आणि देणार तरी काय उत्तर देणार? तेवढ्यात कंपनीचे चार पाच कर्मचारी तिथे घाई घाईने आले.

'' काय झालं घेतला का बॅक अप'' भाटीयाजींनी त्यांन अधीरपणे विचारले.

'' नाही सर ... त्याने प्रोग्रॅम असा काही लिहिला आहे की सर्व नेटवर्कची वाहतूक बंद करुन टाकली आहे'' त्यातला एक कर्मचारी म्हणाला.

'' साला हे कॉम्प्यूटर म्हणजे जेवढं सोईचं आहे तेवढच घातकही आहे'' भाटीयाजी चिडून म्हणाले.

भाटीयांच्या चिडण्याचे कारणही तसेच होते. त्या नेटवर्कमधे सॉफ्टवेअरच्या स्वरुपात त्या कंपनीच्या क्लायंट्सचे अब्जावधी रुपए अडकलेले होते. आणि तो सर्व डाटा डीलीट झाला तर अब्जावधी रुपए पाण्यात जाणार. ती कंपनी ते सॉफ्टवेअर पुन्हा डेव्हलप करु शकत नव्हती असं नाही. पण ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारा वेळ आणि कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांची मेहनत पाण्यात जाणार होती. आणि डिलेव्हरी वेळेवर न दिल्यामुळे कंपनीचे नाव खराब होवून काही ऑर्डर्स कॅन्सलही झाल्या असत्या कदाचित. इन्स्पेक्टर कंवलजितची भाटीयाजींनाही धीर देण्याची इच्छा झाली पण हिंम्मत झाली नाही. कारण आता त्यांना स्वत:लाही अतूलचा फोन येईल की नाही याची शंका आणि काळजी वाटत होती.

'' कॅन समबडी ट्राय ऑन द मोबाईल'' एका कर्मचाऱ्याने सुचवले.

'' मी मघापासनं ट्राय करते आहे... पण 'स्विच्ड ऑफ'चाच मेसेज येतो आहे'' अंजली म्हणाली.

कारण तो विवेकने हल्लीच घेतलेला मोबाईल होता आणि त्याचा नंबर अंजलीजवळ होता.


अतूल गाडी चालवित होता आणि त्याच्या बाजुलाच विवेक बसला होता. इतका वेळ पासून दोघंही शांतच होते. अतूल वेडी वाकडी वळने घेत गाडी चालवत होता आणि विवेक नुसता रस्त्यावर तो कुठे गाडी घेतो आहे आणि त्याची कुठे पळून जायची मनिषा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होता. तसा मधे मधे अतूल विवेकला रस्ता विचारीत होता पण जेवढा अतूल अनभिज्ञ होता तेवढाच विवेकही होता. आणि जेव्हा त्याच्या हे लक्षात आले त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले आणि त्याने त्याला रस्ता विचारणेही बंद केले. विवेकला रस्ता माहित नसने ही अतूलसाठी फायद्याचीच बाब होती. तेवढ्यात अतूलने मुख्य रस्त्यावरुन आपली गाडी एका निर्जन भागात वळवली.

'' इकडे कुठे घेतो आहेस... तिथून मोबाईलचा सिग्नल मिळणार नाही कदाचित '' विवेक म्हणाला.

अतूल नुसता त्याच्याकडे पाहून गूढपणे हसला. बरीच आडवी तिडवी वळने घेतल्यानंतर अचानक अतूलने करकचून ब्रेक दाबून आपली गाडी थांबवली आणि तो गाडीतून उतरला. विवेकही गाडीतून उतरुन सरळ डीकीकडे गेला. डीकी उघडून प्रथम त्याने मोबाईल बाहेर काढून स्वीच ऑन करुन पाहाला. मोबाईलवर येणारे सिग्नल्स पाहून तो सुटकेचा एक सुस्कारा सोडत म्हणाला, '' सिग्नल्स तर येत आहेत''

अतूल चालत गाडीच्या दुसऱ्या बाजुकडून विवेकच्या जवळ आला.

'' हं आता त्यांना पासवर्ड सांग'' विवेक मोबाईल त्याच्याजवळ देत म्हणाला.

'' अरे सांगूकी ... एवढी घाई कसली'' अतूल खांदे उडवत बेफिकीरपणे म्हणाला.

'' नाही ,... आता फक्त दहा मिनिटे राहालेले आहेत''

विवेक अतूलवर जाम चिडला होता. पण तो मनावर नियंत्रण करीत जेवढं शक्य होईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करीत होता. कारण काम शांततेनेच पार पडणार होतं.

'' दहा मिनिटं ... कॉम्प्यूटर साठी खुप आहेत... तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो ... कॉम्प्यूटरमधे वेळ नॅनोसेकंदमधे मोजल्या जातो'' अतूल म्हणाला.

विवेकला त्याच्याकडून कॉम्प्यूटरबद्दल ज्ञान घेण्याची बिलकुल इच्छा नव्हती. आणि अशा वेळी त्याच्या अशा गोष्टी ऐकून विवेक पुरता चिडला होता.

'' कॉम्प्यूटसाठी दहा मिनीटं खुप असतील पण माझ्यासाठी नाहीत'' विवेक चिडून म्हणाला.

'' हो तेही आहे म्हणा'' अतूल त्याच्या जवळ येत म्हणाला.


क्रमश:...


Read Children Storis ( Please Add Skeep 0) ....

No comments:

Post a Comment