Sunday 17 March 2013

Ch -50 पासवर्ड


अतूल अजूनही त्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून तयार झालेली बंदूक हातात घेवून उलटून पुलटून पाहात विवेकच्या भोवती चालत होता. त्याने विवेककडे गालातल्या गालात हसत एक कटाक्ष टाकला. त्याचं हसनं ' अब कैसे आया उट पहाड के निचे' असल्या अर्थाचं होतं. विवेक मुकाट्याने जागच्या जागी उभा होता. त्याच्या भोवती फिरता फिरता अतूलने एक नजर त्याच्या मनगटावर बांधलेल्या घड्याळावर टाकली,

'' अजूनही एक मिनिट शिल्लक आहे''

अतूल आता बोनेटजवळ गेला आणि त्याने तिथे सुरु असलेला मोबाईल उचलून आपल्या कानाला लावला. तिकडून अजूनही, '' हॅलो... अतूल... हॅलो... पासवर्ड काय आहे... लवकर सांग... वेळ संपत आलेला आहे...'' असं ऐकू येत होतं.

'' इन्स्पेक्टर ... एवढी घाई कसली... सांगतो की पासवर्ड'' अतूल म्हणाला आणि त्याने त्याच्या हातातली बंदूक विवेकवर तानली.


इकडे अंजली, इन्स्पेक्टर, भाटीयाजी इन्स्पेक्टरच्या हातातल्या मोबाईलवरचं चालू असलेलं संभाषण कान लावून ऐकत समोर मॉनिटरकडे पाहत होते. मोबाईलवर येणाऱ्या अतूलच्या बोलण्याच्या आवाजावरुन तरी विवेक अडचणीत आल्याचं जाणवत होतं. आणि समोर मॉनीटरवरचा मेसेज -' All the server data and computer Data has been deleted. To recover enter the password' आणि मॉनिटरवर उलटी मोजणी सुरु असलेली टाईम बॉम्बच्या घड्याळासारखी घड्याळ दर्शवत होती - 0 hrs... 2mins... 10secs. आणि अजुनही तिकडून अतूल पासवर्ड सांगायला तयार नव्हता. प्रत्येकाला वेगवेगळी काळजी लागलेली होती. अंजलीला विवेकची. भाटीयाजींना कंपनीची आणि इन्स्पेक्टरांना विवेक आणि कंपनीची. शेवटी कॉम्प्यूटरवरचं घड्याळावर वेळ दिसू लागली - 0 hrs... 0mins... 50secs.

'' वेळ संपत आला आहे... लवकर पासवर्ड सांग'' इन्स्पेक्टर जवळ जवळ ओरडलेच.

'' सांगतो इन्स्पेक्टर... घाई करु नका''

hrs... 0mins... 40secs.

'' आता काय डाटा नष्ट झाल्यावर सांगतोस की काय? '' इन्स्क्टर चिडून म्हणाले.

भाटीयाजींनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. नाही तर अतूल चिडला तर तो पासवर्ड सांगण्यास नकार द्यायचा.

hrs... 0mins... 30secs.

'' प्लीज ... लवकरात लवकर सांग'' इन्स्पेक्टर जणू आता विणवणी करु लागले.

'' त्याला आधी विवेकला सोडून द्या म्हणावं'' अंजली न राहवून ओरडली.

'' आणि विवेकला आधी सोडून द्या''

hrs... 0mins... 20secs.

'' आधी विवेकला सोडून द्यायचं की आधी पासवर्ड सांगायचा? '' तिकडून अतूलने प्रश्न केला.

'' आधी विवेकला सोडून द्या'' अंजली म्हणाली.

तिकडून अतूलचा मोठ्याने हसण्याचा आवाज आला.

hrs... 0mins... 10secs.

'' नाही इन्स्पेक्टर आधी मी पासवर्ड सांगणार आहे...काय कसं?''

'' सांग लवकर ...'' इन्स्पेक्टर

'' हं घ्या पासवर्ड - इलव्ह... ऑल स्मॉल... नो स्पेस इन बिट्विन..''

hrs... 0mins... 3 secs.

समोर कॉम्प्यूटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याने ताबडतोब पासवर्ड टाईप केला.

hrs... 0mins... 1 secs.

आणि एंटर दाबला.

मॉनिटरवर सुरु असलेलं काऊंटर थांबला आणि मेसेज आला, '' password correct... recovery started''

सगळ्यांनी चहूबाजुला आपली नजर फिरवली. सगळ्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर तोच मेसेज आला होता - '' password correct... recovery started''

हॉलमधले अंजलीला सोडून सर्वजण एवढे खुश झाले की उस्फुर्तपणे टाळ्या वाजवू लागले. जणू एखादं यान सुखरुपपणे अवकाशात एखाद्या ग्रहावर उतरावं एवढ्या आनंदाने ते टाळ्या वाजवत होते. पण अचानक इन्स्पेक्टरच्या हातात अजुनही सुरु असलेल्या मोबाईलमधून आलेल्या बंदूकीच्या आवाजाने, सगळ्यांचं एकदम टाळ्या वाजवनं बंद झालं आणि हॉलमधे श्मशानवत शांतता पसरली. अंजली तर इतक्या वेळ पासून येणारा सारखा दबाव सहन न करु शकल्याने आणि तो बंदूकीचा आवाज ऐकून विवेकचं काय झालं असेल याच्या नुसत्या कल्पनेने चक्कर येवूनच खाली पडली होती.


एकीकडे अतूल मोबाईलवर बोलत होता आणि दुसऱ्या हातात त्याने विवेकवर बंदूक तानलेली होती. शेवटी त्याने जवळ जवळ 5 सेकंद शिल्लक असतील तेव्हा इन्स्पेक्टरांना पासवर्ड सांगितला होता - '' हं घ्या पासवर्ड - इलव्ह... ऑल स्मॉल... नो स्पेस इन बिट्विन..''

अतूलने आता सुरु असलेला मोबाईल पुन्हा गाडीच्या बोनेटवर ठेवला. आणि तो त्या विवेकडे तानलेल्या बंदूकीचा ट्रीगर दाबू लागला.

'' थांब ... तु फार मोठी चूक करतो आहेस...'' विवेक कसाबसा बोलला.

'' चूक... यानंतर तुझ्यामुळे... फक्त तुझ्या हट्टामुळे... मी ज्या गुन्हेगारी जगतात जाणार आहे ... त्यासाठी मला एक पात्रता लागणार आहे... विचार कोणती? ... कमीत कमी एक खुन... आणि ती मी आता पुर्ण करणार आहे'' अतूल म्हणाला आणि त्याने पटकन बंदूकीचे ट्रीगर दाबले.

एक मोठा आवाज आला आणि बाजुला उभ्या असलेल्या गाडीच्या काचांवर रक्तांचे मोठमोठे शिंतोडे उडाले होते.


क्रमश:...  



Read Kunadali ( Please Add Skeep ) .....

No comments:

Post a Comment