Thursday 14 March 2013

CH-3 मेलींग ऍड्रेस

मॉनिटरवर अजुनही ' तुला माझा मित्र व्हायला आवडेल?' हा चॅटींगवर आलेला मेसेज दिसत होता. आता याला काय प्रत्यूतर पाठवावे की जेणेकरुन हा आपला पिछा सोडेल असा विचार करीत अंजलीने मेसेज पाठविणाऱ्याचं नाव बघितलं. पण तो 'टॉम बॉय' नव्हता हे पाहून तिला हायसं वाटलं.

' का नाही? जरुर... मैत्री करण्यापेक्षा निभावनं महत्वाचं असतं' अंजलीने मेसेज टाईप केला.

तेवढ्यात शरवरी - अंजलीची सेक्रेटरी आत आली.

'' यस मॅडम''

'' शरवरी तुला मी कितीदा सांगितलं आहे ... की डोन्ट कॉल मी मॅडम... कॉल मी सिम्प्ली अंजली... तु जेव्हा मला मॅडम म्हणतेस मला एकदम 23 वर्षावरुन 50 वर्षाचं झाल्यासारखं वाटतं'' अंजली चिडून म्हणाली.

ती तिच्यावर रागावली तर खरं पण मग तिला तिचंच वाईट वाटायला लागलं.

अंजली अचानक एकदम गंभीर होवून म्हणाली, '' खरं म्हणजे पापा अचानक गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर येवून पडली आहे... नाहीतर हे माझे हसण्या खिदळण्याचे दिवस आहेत... खरं सांगू... मी तुला इथे मुद्दाम बोलावून घेतलं...की जेणेकरुन या अशा तणावपुर्ण कामाच्या वातावरणात माझं हसणं, खिदळणं कुठे हरपून ना जावं... कमीत कमी तू तर मला अंजली म्हणू शकतेस... लक्षात ठेव तू माझी मैत्रिण आधी आणि सेक्रेटरी नंतर आहेस... समजलं'' अंजली म्हणाली.

'' यस मॅडम ... आय मीन अंजली'' शरवरी म्हणाली.

अंजली शरवरीकडे बघुन गालातल्या गालात हसली. शरवरी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली तेवढ्यात पुन्हा कॉम्पूटरचा अलर्ट बझर वाजला. चाटींगच्या विंडोत पुन्हा मेसेज आला होता -

'तुझं नाव काय आहे?'

' माझं नाव अंजली ... तुझं ?' अंजलीने मेसेज टाइप केला.

अंजलीने एंन्टर की दाबली आणि बोलण्यासाठी शरवरी बसली होती तिकडे आपली चेअर फिरवली.

'' तर नेट सेक्यूराचा प्रोजेक्ट काय म्हणतो?...'' अंजलीने विचारले.

'' तसं सगळं तर ठिक आहे ... पण एक मॉड्यूल सिस्टीमला वारंवार क्रॅश करतो आहे ... बग काय आहे काही समजत नाही आहे... '' शरवरीने माहिती पुरवली.

तेवढ्यात चॅटींगवर पुन्हा मेसेज आला-

' माझं नाव विवेक आहे... बाय द वे... तुझ्या आवडी-निवडी काय आहेत... आय मीन हॉबीज?'

अंजलीने कॉम्पूटरकडे बघितले. आणि त्या मेसेजकडे दुर्लक्ष करीत ती चिंतायुक्त चेहऱ्याने शरवरीकडे बघायला लागली.

'' त्या मॉड्यूलवर कोण काम करतो आहे?'' अंजलीने विचारले.

'' दिनेश माहेश्वरी'' शरवरीने माहीती पुरवली.

'' तोच ना जो मागच्या महिण्यात जॉईन झाला तो?'' अंजलीने विचारले.

'' हो तोच''

'' त्याच्या सोबत ताबडतोब कुणीतरी सिनीयर असोशिएट कर आणि सी दॅट द मॅटर इज रिझॉल्वड '' अंजलीने क्षणातचं त्या प्रॉब्लेमचे मुळ हेरुन त्यावर उपायसुध्दा सुचवला होता.

'' यस मॅडम... आय मीन अंजली'' शरवरी अभिमानाने अंजलीकडे पाहत म्हणाली.

तिला तिच्या मॅनेजमेंट कौशल्याचे नेहमीच असे कौतूक वाटत असायचे.

अंजलीने पुन्हा आपला मोर्चा आपल्या कॉम्प्यूटरकडे वळवला.

शरवरी तिथून उठून बाहेर निघून गेली आणि अंजली कॉम्प्यूटरवर आलेल्या चॅटींग मेसेजला प्रतिउत्तर टाईप करु लागली.

' हॉबीज ... हो .. वाचन, पोहणे... कधी कधी लिहिणे आणि ऑफ कोर्स चॅटींग'

अंजलीन मेसेज टाईप करुन 'सेन्ड' की दाबून पाठवला आणि चॅटींगची विंडो मिनीमाईझ करुन तिने मायक्रोसॉफ्ट एक्सेलची दुसरी एक विंडो ओपन केली. ती त्या एक्सेल शिटमधिल आकडे वाचत त्यात गढून गेली. कदाचित ती तिच्या कंपनीच्या कुण्या प्रोजेक्टचे फायनांसिएल डिटेल्स चेक करीत होती.

तेवढ्यात पुन्हा एकदा चॅटींगचा मेसेज आला.

' अरे वा .. काय योगायोग आहे... माझ्या आवडीनिवडीसुध्दा तुझ्या आवडीनिवडीशी जुळताहेत... अगदी हुबेहुब .. एक कमी ना एक जास्त ...' तिकडून विवेकचा मेसेज होता.

' रिअली?' तिने उपाहासाने प्रतिउत्तर दिले.

फ्लर्टींगचा हा जुना नुस्का अंजलीच्या चांगलाच परिचयाचा होता.

तेवढ्यात पियून आत आला. त्याने काही कागदपत्र सह्या करण्यासाठी अंजलीच्या समोर ठेवले. अंजलीने त्या सगळ्या कागदपत्रांवर एक धावती नजर फिरवली आणि ती सह्या करु लागली.

' आय स्वीअर' मॉनिटरवर विवेकने तिकडून पाठवलेला मेसेज आला.

कदाचित त्याला तिच्या शब्दातला उपाहास आणि खोच लक्षात आली असावी.

' मला तुझा मेलींग ऍड्रेस मीळू शकेल काय ? ' तिकडून विवेकचा पुन्हा मेसेज आला.

' anjali5000@gmail.com' अंजलीने खास चॅटींगवरील अनोळखी लोकांना पाठविण्यासाठी ओपन केलेल्या मेलचा ऍड्रेस त्याला पाठवून दिला.

अंजलीने आता आपली चेअर फिरवून आपली डायरी शोधली आणि आपल्या घड्याळाकडे बघत ती खुर्चीवरुन उठून उभी राहाली.

आपली डायरी घेवून ती जाण्यासाठी वळली तेवढ्यात पुन्हा कॉम्प्यूटरवर चॅटींगचा बझर वाजला. तिने जाता जाता वळून मॉनिटरकडे बघितले.

मॉनिटरवर विवेकचा मेसेज होता, ' ओके थॅंक यू... बाय ... सी यू सम टाईम...'


क्रमश:...    


Read Childen Stori ( Please Add Skeeep ) ...............

No comments:

Post a Comment