Friday 15 March 2013

CH-25 टाळ्यांचा कडकडाट


अंजली आणि शरवरी कॉफी हाऊसमधे एकमेकांसमोर बसल्या होत्या आणि दोघीही आपापल्या विचारात मग्न हळू हळू कॉफीचे छोटे छोटे सिप घेत कॉफी पित होत्या. त्यांच्यामधे एक विचित्र शांतता पसरलेली दिसत होता. शेवटी अंजलीने त्या शांततेचा भंग केला -

'' बरोबर 2 दिवस झालेत त्याची पुढची मेल अजून कशी आली नाही ? ''

'' कदाचित त्याला शंका आली असावी '' शरवरी म्हणाली.

''असंच दिसतं तर... '' अंजली एक सुस्कारा सोडत म्हणाली.

'' मला वाटत होतं की यावेळी आपण त्याला जरुर पकडू शकू... पण आता मला काळजी वाटत आहे की आपण त्याला कधी पकडण्यात यशस्वी होवू की नाही'' अंजली म्हणाली.

'' आणि हो त्याला शंका येणही तेवढंच धोकादायक आहे... त्याने सगळे फोटो इंटरनेटवर टाकले तर सगळाच प्लान ओम फस्स होवून जायचा... आणि बदनामी व्हायची ती वेगळीच'' शरवरीने म्हटले.

अंजलीने विचारांच्या तंद्रीत फक्त मान हलवली.

'' एकाच वेळी त्याला चारी खाने चीत करणं आवश्यक आहे... नाहीतर आपला प्लान सपशेल फ्लॉप होवून जायचा'' अंजली म्हणाली....

हॉलमधे चाललेल्या टाळ्यांच्या कडकटामुळे अंजली आपल्या विचारांच्या तंद्रीतून जागी झाली. तिने चौफेर आपली नजर फिरवली. भाटीयाजींच स्पीच संपलं होतं आणि ते तिच्या बाजुलाच असलेल्या आपल्या सिटवर परत येत होते. तिने त्यांच्याकडे बघून एक स्मीत केले. तिकडे ऍन्कर पुन्हा माईकजवळ गेला होता आणि त्याने जाहिर केले - '' आता मी पारितोषीक वितरणासाठी जी. एच. इन्फॉरमेटीक्सची मॅनेजींग डायरेक्टर ... दि आय. टी वुमन ऑफ दिस इयर... मिस. अंजली अंजुळकरांना इथे माइकवर आमंत्रित करीत आहे...''

अंजली उठून समोर माइकजवळ गेली. पुन्हा हॉल टाळाच्या कडकडाटाने दणानला होता.

'' तर आता आपण पारितोषीक वितरणाकडे वळूया... '' एन्करने माइकवर जाहिर केले.

''... जसे तुम्हाला माहित आहेच... ह्या प्रतिस्पर्धेस प्रसिद्धी देण्यात आली तेव्हा आम्हाला सहभागी होण्यास इच्छूक असणाऱ्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला... देशभरातून जवळपास तिन हजार लोकांचे अप्लीकेशन फॉर्मस आम्हाला मिळाले.... पहिल्या चाळणीत त्यातली आम्ही फक्त 50 अप्लीकेशन्स निवडले... आणि आता फायनल मधे जे निवडले आहेत ते आहेत फक्त तिन... पण त्या तिन लोकांची नावे जाणण्यापुर्वी आपल्याला थोडं थांबावं लागेल कारण प्रथम आपण काही जणाना प्रोत्साहनपर बक्षीसे देणार आहोत....''

प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात जास्त वेळ न दवडता ऍन्कर एक एकांना स्टॆजवर बोलवत होता आणि अंजली त्यांना बक्षीसे देवून त्यांना शाबासकी देवून त्यांची रवानगी करीत होती. प्रोत्साहनपर बक्षीसं संपले तसे पुन्हा प्रेक्षकांत उत्साह वाढलेला दिसू लागला.

'' आता ज्या तिघांची नावं जाणण्यास आपण उत्सुक आहात ती वेळ आलेली आहे... प्रथम मी तिसरं बक्षीस पटकावलेल्या प्रतिस्पर्ध्याचे नाव जाहिर करणार आहे... '' एन्करने सगळ्याची उत्कंठा अजूनच वाढवीत एक मोठा पॉज घेतला, '' तिसरं पारितोषीक पटकावणाऱ्यास बक्षीस आहे 1 लाख रुपये रोख आणि मोमेंटो... तर थर्ड प्राईज... मि. अमोल राठोड फ्रॉम जयपूर... प्लीज कम ऑन द स्टेज... ''

हॉलमधे टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागला. एक सडपातळ सावळा 20 -22 वर्षाचा तरुण समोरच्या दहापैकी एका रांगेतून उठून स्टेजकडे येवू लागला. त्या प्रतिस्पर्ध्याकडे पाहिल्यावर कुणाला वाटणार नाही की तो तिसरं बक्षीस पटकावण्याच्या लायकीचा असावा... पण त्याच्या चालण्यात एक जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता. अमोल राठोड स्टेजवर आला. त्याच्या चालीप्रमाणे आत्मविश्वासानेच त्याने पुरस्काराचा स्विकार करुन अंजलीला हस्तांदोलन केले. हॉलमधे मेडीयाचीही बऱ्याच प्रमाणात उपस्थिती होती. पुरस्कार स्विकार करतांना विजा चमकाव्या तसे फोटोंचे फ्लॅश दोघांवर चमकत होते.

पुन्हा हॉलमधे जणू पावसाच्या सरीप्रमाणे टाळ्यांची एक सर आली. अमोल राठोड स्टेजवरुन उतरुन पुन्हा आपल्या खुर्चीकडे निघाला तसा ऍन्कर दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्याचं नाव जाहिर करण्यास समोर आला,

'' दुसरं पारितोषीक पटकावणाऱ्यास बक्षीस आहे 1.5 लाख रुपये रोख आणि मोमेंटो... तर थर्ड प्राईज गोज टू... मिस. अनघा देशपांडे फ्रॉम पुणे ... प्लीज कम ऑन द स्टेज... ''

हॉलमधे पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. एक गोरी उंच सडपातळ नाजूकशी साधारणत: 20-21 वर्षाची तरुणी स्टेजवर येवू लागली. अंजली कदाचित ती स्वत:ही एक स्त्री असल्यामुळे त्या मुलीकडे डोळेभरुन कौतूकाने पाहत होती. अनघा स्टेजवर अंजलीजवळ आली. पुरस्कार देवून अंजलीने तिला अगदी मिठीच मारली. पुन्हा कॅमेऱ्यांच्या फ्लॅशच्या विजा चमकू लागल्या.


क्रमश:  


Read Love ( Please Add Skeep ) ................

No comments:

Post a Comment