Sunday 17 March 2013

Ch-52 पुन्हा मेसेज? (समाप्त)


तो आवाज एकताच अंजलीलाच नाही तर सर्वांना एक क्षण भास झाल्यासारखे झाले. अंजलीचं रडणं थांबलं होतं. सगळे जण स्तब्ध उभे राहून दरवाजाकडे पाहत होते.

'' अंजली '' पुन्हा आवाज आला.

यावेळी फारच जवळून आल्यासारखा. अगदी दरवाजाच्या बाहेरुन. आता अंजली उठून उभी राहाली आणि दरवाजाकडे जावू लागली. रुममधील इतर लोकही दरवाजाकडे जावू लागले. अंजली दरवाजापर्यत पोहोचली असेल तेव्हा रुमचा दरवाजा उघडला आणि दरवाजात विवेक उभा होता. त्याचे कपडे आणि सर्व शरीर रक्ताने मागलेलं होतं. दोघंही आवेगाने एकमेकांकडे झेपावले आणि त्यांनी एकमेकांना आगोशात घेतले.


अतूलने इन्स्पेक्टरला पासवर्ड सांगितल्यानंतर सुरु असलेला मोबाईल गाडीच्या बोनेटवर ठेवला. आणि तो त्या विवेकडे तानलेल्या बंदूकीचा ट्रीगर दाबू लागला.

'' थांब ... तु फार मोठी चूक करतो आहेस...'' विवेक कसाबसा बोलला.

'' चूक... यानंतर तुझ्यामुळे... फक्त तुझ्या हट्टामुळे... मी ज्या गुन्हेगारी जगतात जाणार आहे ... त्यासाठी मला एक पात्रता लागणार आहे... विचार कोणती? ... कमीत कमी एक खुन... आणि ती मी आता पुर्ण करणार आहे'' अतूल म्हणाला आणि त्याने पटकन बंदूकीचा ट्रीगर दाबला.

एक मोठा आवाज आला आणि अतूलच्या हातात असलेल्या बंदूकीचा एखाद्या बॉम्बप्रमाणे विस्फोट झाला. अतुलच्या शरीराचे चिथडे चिथडे होवून चारी बाजुस उडाले होते. विवेक आपला बचाव करीत मागे झेपावला होता. तरीही अतूलच्या शरीरातल्या रक्ताचे शिंतोडे कारवर, आणि आजुबाजुला उडून विवेकच्या अंगावरही उडाले होते. त्याचे सर्व कपडे आणि शरीर अतूलच्या रक्ताने माखलं होतं.

थोड्या वेळाने विवेक उठून उभा राहाला. त्याने एक नजर अतूलच्या खाली पडलेल्या छिन्नविछिन्न मृत देहाकडे टाकली.

तरीही मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता की ती बंदूक नसून बॉम्ब आहे...

पण तो मानलाच नाही ... त्यात माझा काय दोष...

विवेक आपल्या मनाची समजूत घालत होता.

शेवटी काय... की पराई नार ... और पराये हथीयारसे आदमीको बचना चाहिए...

विवेकच्या मनात येवून गेले.


अंजली आपल्या ऑफीसमधे आपल्या कामात व्यस्त होती. तिने नेहमीप्रमाने आल्या आल्या आपला कॉम्प्यूटर ऑन करुन ठेवला होता. तेवढ्यात कॉम्प्यूटरवर चाटींगचा बझर वाजला. तिने मॉनिटरवर बघितले. एक मेसेज होता -

'' मिस अंजली ... 50 लाख रुपयांची माझ्यासाठी व्यवस्था कर नाहीतर परिणाम तर तु जाणतेस...'' अंजलीने तो मेसेज वाचला आणि तिच्या अंगावर काटे उभे राहाले.

तेवढ्यात विवेक आणि शरवरी तिच्या कॅबिनमधे शिरले.

'' अंजली चल आज पिक्चरला जावूया...मॉर्निंग शो''

'' विवेक ... इकडे तर बघ... ब्लॅकमेलरचा पुन्हा मेसेज आला आहे'' अंजली त्याचं लक्ष मॉनिटरकडे आकर्षीत करीत म्हणाली.

विवेक कॉम्प्यूटरच्या जवळ जावून बघू लागला. पण शरवरी आपलं हसणं लपवू शकली नाही. ती जोरजोराने हसायला लागली.

'' ए काय झालं?'' अंजली.

'' अगं तो मेसेज आत्ता विवेकने शेजारच्या कॅबिनमधून पाठवला आहे'' शरवरी हसत हसत म्हणाली.

'' पण तो तर आत्ताच इथे आला'' अंजली.

'' अगं नाही ... आम्ही शेजारच्या कॅबिनमधून तो मेसेज पाठवून लागलीच इकडे आलो.

'' यू नॉटी बॉय'' अंजली विवेकवर पेपरवेट उगारत म्हणाली.

आणि मग पेपरवेट टेबलवर ठेवत ती उठली आणि त्याच्यापाशी जावून त्याच्या छातीवर प्रेमाने मारु लागली. विवेकने प्रेमाने तिला आपल्या आगोशात ओढून घेतले.


समाप्त


THE END   





Read Udan ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment