Thursday 14 March 2013

CH - 10 : स्माईल प्लीज


विवेक कॉम्प्यूटच्या समोर बसून काहीतरी वाचत होता. तेवढ्यात त्याचा मित्र हळूच पावलाचा आवाज न होवू देता त्याच्या मागे येवून उभा राहाला. बराच वेळ जॉनी विवेकचं काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करु लागला.

'' क्या गुरु... कहां तक पहूँची है प्रेम कहानी? '' जॉनीने अनपेक्षीतरित्या त्याला प्रश्न विचारला.

विवेक एकदम दचकून मॉनीटरवरील विंडो मिनीमाईझ करायला लागला.

'' लपवून काही उपयोग नाही ... मी सगळं वाचलं आहे'' जॉनी म्हणाला.

विवेक आपल्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव लपविण्याचा प्रयत्न करीत पुन्हा मॉनीटरवरील विंडोज उघडीत म्हणाला, '' बघ तर .. तिने मेलसोबत काय अटॅचमेंट पाठवलेली आहे''

'' मतलब आग बराबर दोनो तरफ लगी हूई है .... वैसे उस चिडीयाका कुछ नाम तो होगा... जिसने हमारे विवेक का दिल उडाया है'' जॉनीने विचारले.

'' अंजली'' विवेकचा चेहरा सांगताना लाजेने लाल लाल झाला होता.

'' बघ बघ किती लाजतोयस'' जॉनी त्याला छेडीत म्हणाला.

'' बघू ... काय पाठविले आहे तिने?...'' जॉनीने त्याला पुढे विचारले.

जॉनी बाजुच्याच स्टूलवर बसून वाचू लागला तर विवेक त्याला त्या अंजलीने अटॅच करुन पाठविलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमबद्दल माहिती देवू लागला -

'' हा एक जॅपनीज सॉफ्टवेअर इंजीनिअरने लिहिलेला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे... या प्रोग्रॅमसाठी रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजीजचा वापर करण्यात आलेला आहे. जेव्हा आपण कॉम्प्यूटरच्या मॉनिटरसमोर बसलेलो असू तेव्हा जो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतो तो वेगवेगळ्या रंगात विभागल्या जावून मॉनिटरवर परावर्तीत होतो. या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारा परावर्तीत झालेल्या किरणांची तिव्रता एकत्रीत करुन त्याला या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने फोटोमध्ये परिवर्तीत केलं जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही या प्रोग्रॅमला रन कराल तर मॉनिटरवर पडलेल्या परिवर्तनाच्या तिव्रतेला एकत्रित करुन हा प्रोग्रॅम तुमचा फोटो तयार करु शकतो. पण फोटो काढतांना फक्त एवढं लक्ष ठेवावं लागतं की तुम्ही बरोबर मॉनिटरच्या अगदी समोर, समांतर आणि समानांतर बसलेले आहात. मॉनीटर आणि तुमच्या चेहऱ्यात जर तिरपा कोण झाला तर फोटो बरोबर येणार नाही.''

'' म्हणजे हे सॉफ्टवेअर फोटो काढते तर?'' जॉनीने विचारले.

'' हो ... हे बघ आत्ताच थोड्या वेळापुर्वी मी माझा फोटो काढलेला आहे'' विवेकने कॉम्प्यूटरवर त्याचा फोटो उघडून दाखवला.

'' अरे वा... एकदम बढीया ... जर असं असेल तर कॅमेरा विकत घ्यायची गरजच पडणार नाही..'' जॉनी आनंदाने म्हणाला.

'' तेच तर..'' विवेकने दुजोरा दिला.

'' थांब... मला जरा बघू दे... मी माझा फोटो काढतो..'' जॉनी मॉनीटरच्या समोरच्या स्टूलवरुन विवेकला उठवीत तिथे स्वत: जावून बसत म्हणाला.

जॉनीने स्टूलवर बसून माऊस कर्सर मॉनीटरवर इकडेतिकडे फिरवीत विचारले, '' हं आता काय करायचं?''

'' काही नाही ... फक्त ते स्नॅपचं बटन दाबायचं... पण थांब आधी थोडं व्यवस्थीत सरळ बस'' विवेक म्हणाला.

जॉनी सरळ बसून माऊसचा कर्सर 'स्नॅप' बटन जवळ नेवून ते बटन दाबू लागला.

'' स्माईल प्लीज '' विवेक म्हणाला.

जॉनीने आपला चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न केला.

'' रेडी ... नाऊ प्रेस द बटन'' विवेक

जॉनीने 'स्नॅप' बटनवर माऊस क्लीक केला. मॉनीटरवर एक-दोन सेकंदासाठी 'प्रोसेसींग' म्हणून एक मेसेज आला आणि मॉनीटरवर फोटो अवतरला. जसा मॉनीटरवर फोटो आला विवेक जोर जोराने हसायला लागला आणि जॉनीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मॉनीटरवर एका हसणाऱ्या माकडाचा फोटो अवतरला होता.


क्रमश:...   


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...

No comments:

Post a Comment