Saturday 16 March 2013

ch - 49 हत्यार


अतूल आता विवेकच्या एकदम पुढ्यात उभा राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला,

'' तुला पासवर्डच पाहिजे ना?''

'' हो ... आणि तो डाटा नष्ट व्हायच्या आधी'' विवेक पुन्हा चिडून त्याला टोमणा मारत म्हणाला.

'' अरे हो... तो डाटा डिलीट झाल्यावर पासवर्डचा काय उपयोग?'' अतूल स्वत:शीच जोरात हसला.

आणि एकदम हसण्याचे थांबून म्हणाला, '' पण आधी तुझ्याजवळचे हत्यार माझ्या स्वाधीन कर''

विवेकने त्याच्याकडे चमकून बघत विचारले, '' हत्यार?... माझ्याजवळ कोणतेच हत्यार नाही .. तुच तर निघतांना माझी झडती घेतली होतीस''

'' मि. विवेक ... मला काय एवढं आंडू पाडूं समजतोस काय रे?... '' अतूल मोबाईल लावत म्हणाला

विवेक काहीच बोलला नाही.

अतूलचा मोबाईल लागला होता आणि तिकडून इन्स्पेक्टर मोबाईलवर होते. '' अतूल पासवर्ड काय आहे?''

'' इन्स्पेक्टर जरा थांबा ... आधी इकडचं एक काम निपटतो आणि मग तुम्हाला पासवर्ड सांगतो'' अतूल फोनमधे म्हणाला आणि त्याने मोबाईल चालू स्थितीमधेच गाडीच्या बोनेटवर ठेवून दिला

'' मी ऐकलं आहे आजकाल तुझी पी एच डी चालली आहे म्हणे'' अतूलने विवेकला विचारले.

तरीही विवेक काहीच बोलला नाही.

'' मला एक समजत नाही, एवढ्या श्रीमंत पोरीला आपल्या जाळ्यात फासल्यानंतर तुला पिएचडी ची गरजच काय उरते?'' अतूलने पुढे विचारले.

विवेक काहीच बोलायला तयार नव्हता, किंबहूना तो बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

'' तुझ्या पी एच डी चा विषय काय आहे?'' अतूलने एकदम गंभिर होवून विचारले.

विवेक त्याच्या या असबंध प्रश्नास काहीच उत्तर देण्यास तयार नव्हता.

'' तुझ्या पी एच डी चा विषय काय आहे?'' अतूलने आता करड्या आवाजात विचारले.

विवेकने आधी त्याच्या डोळ्यात बघितले. तो या प्रश्नाबद्दल सिरीयस दिसत होता.

'' अनकन्व्हेन्शनल वेपन्स'' विवेकने उडवित उत्तर दिल्यासारखे दिले.

'' अनकन्व्हेन्शनल वेपन्स ... हूं ... तुझे जोडे खालून दाखव'' अतूलने मागणी केली.

विवेकला त्याच्या प्रश्नाचा उद्देश आता कळला होता. त्याला अजुनही त्याच्याजवळ काहीतरी हत्यार आहे याची शाश्वती दिसत होती. विवेकने आपला उजवा जोडा तसाच पायात असतांनाच उलटा करु दाखविला. अतूलने निरखून बघितले. तिथे काही असल्याची चिन्ह दिसत नव्हती.

'' आता डावा '' अतूलने पुन्हा फरमान सोडले.

विवेकने थोडी अनिच्छा दाखवली.

'' कम ऑन क्वीक'' अतूल ओरडला.

विवेकने डावा जोडाही उलटा करुन दाखविला. अतूलने निरखून बघितले. तिथेही काहीच नव्हते. आतामात्र अतूल विचारात पडला. त्याला विवेकजवळ काहीतरी हत्यार आहे याची पुर्ण खात्री होती.

'' थांब ... हात वर कर...'' अतूल त्त्याच्या जवळ जात म्हणाला.

विवेकने दोन्ही हात वर केले. आणि अतूल त्याच्या खिशातलं सामान काढून बोनेटवर ठेवू लागला. आधी पॅन्टच्या खिशातलं आणि मग शर्टच्या खिशातलं सगळं सामान काढून अतूलने गाडीच्या बोनेटवर ठेवलं.

त्या सामानात काही लोखंडाचे छर्र्याच्या आकाराचे बारीक बारीक तुकडे होते. अतूल त्या तुकड्यांकडे बारकाईने पाहत म्हणाला, '' हे काय आहे?''

'' काही नाही .. माझ्या रिसर्चचं सामान आहे'' विवेक म्हणाला.

'' अच्छा!'' अतूल अविश्वासाने म्हणाला.

अतूल आता ते सगळे तूकडे एक एक करत निरखून पाहू लागला. त्या सगळ्या तुकड्यात त्याला एक तुकडा जरा वेगळा वाटला. तो त्याने उचलला आणि तो त्याला अजुन काळजीपुर्वक निरखून पाहू लागला. त्या तुकड्याच्या एका बाजुला लाल बटनासारखं काहीतरी होतं. त्याकडे विवेकचं लक्ष आकर्षीत अतूल म्हणाला,

'' हे काय आहे असं?''

विवेक काहीच बोलला नाही. अतूलने तो तूकडा आलटून पालटून पाहत ते लाल बटन दाबलं. आणि काय आश्चर्य गाडीच्या बोनेटवर ठेवलेल्या सर्व तूकड्यांमधे आता हालचाल दिसू लागली. आणि ते एखाद्या चुंबकासारखे एकमेकांना चिकटाला लागले. जेव्हा सगळे तुकडे चुंबकाप्रमाणे एक दुसऱ्यांना चिकटले. त्यातून एक बंदूकीसारख्या आकाराची वस्तू तयार झाली.

'' अच्छा तर हे असं आहे?...'' अतूल अविश्वासाने म्हणाला, "' माझा अंदाज कधीच चुकत नाही... मला माहित होतं तुझ्याजवळ काही ना काही हत्यार असायलाच पाहिजे ''

अतूलने ती बंदूक उचलून उलटून पुलटून बघितली.

'' स्मार्ट व्हेरी स्मार्ट... विवेक यू आर जिनियस ... बट ओन्ली इंटॆलेक्चूअली ... नॉट प्रोफेशन्ली'' अतूल गालातल्या गालात हसत म्हणाला.


क्रमश:...



Read Love Stori ( Please Add Skeep )...........

No comments:

Post a Comment