Friday 15 March 2013

35 विवेकचं काय होईल?


कॉन्फरंस रुममधे अंजली, इन्स्पेक्टर कंवलजीत आणि शरवरी बसलेले होते. अंजली इन्स्पेक्टर आणि शरवरीला काहीतरी सांगत होती. सगळं सांगून झाल्यावर अंजलीने एक लांब श्वास घेतला आणि पुढे म्हणाली,

'' तर पुर्ण हकिकत या प्रकारे आहे...''

अंजलीने पुन्हा आलटून पालटून तिच्या समोर बसलेल्या इन्स्पेक्टर कंवलजीत आणि शरवरीकडे पाहाले.

'' कंवलजीत अंकल... आता मला भिती... तो ब्लॅकमेलर फोटो इंटरनेटवर टाकेल का या गोष्टीची नाही ... भिती आहे ती ही की ... कदाचित विवेक त्याच्या ताब्यात आहे... त्याच्या जिवाला धोका तर नाही?'' अंजलीने आपल्या मनातील भिती व्यक्त केली.

'' त्याची जी मेल आली होती त्याला आमच्या एक्स्पर्टसनी ट्रेस करण्याचा प्रयत्न केला होता... एक्सॅक्ट लोकेशन आणि कॉम्प्यूटरचा तर काही पत्ता लागला नाही ... पण एवढं मात्र कळलं की मेल मुंबईवरुन कुठून तरी केली गेली असावी.''

'' याचा अर्थ पैसे कुठे द्यायचे आणि कसे द्यायचे ही सांगणारी मेलही मुंबईवरुनच येणार'' इतका वेळ शांततेने सगळा प्रकार ऐकत असलेली शरवरी प्रथमच बोलली.

'' कदाचित हो... किंवा कदाचित नाहीही... हे तो क्रिमीनल किती मुरलेला आहे यावरुन ठरेल... परंतू यावेळी आपण आधीपासूनच तयार असल्यामुळे, मेल कोणत्या गावावरुन, त्या गावातून कुठल्या जागेवरून आणि कोणत्या कॉम्प्यूटरवरुन आली हे आपल्याला माहित पडू शकेल... '' इन्सपेक्टर म्हणाले.

'' याचा अर्थ आपल्या जवळ त्याच्या पुढच्या मेलची वाट पाहण्यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही ... '' अंजली निराश होवून म्हणाला.

'' हो ... असंच वाटतं तर.. '' इन्स्पेक्टरही विचार करीत शुन्यात बघत सगळ्या बाबी पडताळून पाहत म्हणाले.


एक जंगून जिर्ण झालेली जुनाट कार एका सायबर कॅफेजवळ येवून थांबली. गाडीच्या ड्रायव्हींग सिटवर अलेक्स बसला होता अणि त्याच्या बाजु च्या सिटवर अतूल बसला होता. कदाचित कुणाला शंका येवू नये म्हणून त्यांनी तिथे येण्यासाठी आणि पुढील सगळ्या कामांसाठी त्या जुन्या जिर्ण झालेल्या गाडीची निवड केली असावी. गाडी थांबताच गाडीतून अतूल खाली उतरला.

'' तू आता पैसे आणण्यासाठी निघ... मी मेलवर तिला जागेची माहिती देतो... आणि ऐक ... जरा सांभाळून... तुला बरच अंतर कापायचं आहे'' अतूल उतरतांना अलेक्सला म्हणाला.

'' यू डोन्ट वरी... तू एकदम बिनधास्त रहा '' अलेक्स गाडीच्या ड्रायव्हींग सिटवर बसल्या बसल्या म्हणाला.

'' बरं पैसे मिळाल्यावर त्या पंटरचं काय करायचं'' अलेक्स विचार केल्यागत म्हणाला. त्याचा इशारा विवेककडे होता.

'' त्याचं काय करायचं आहे .. ते पुढचं पुढे पाहू.... पण तो आपल्या महबुबासाठी शहीद होईल ही शक्यता जास्त आहे हे गृहीत धरुन चाल... कारण रस्त्याने चालतांना झालेले गड्डे बुजवित जाणं फार आवश्यक असतं... नाही तर परत येतांना त्याच गड्ड्यात अडखळून आपण पडण्याची शक्यता असते.'' अतूल उतरता उतरता गुढपणे हसत अलेक्सकडे पाहत म्हणाला.

अलेक्सही त्याच्याकडे पाहात गुढपणे हसला.

अतूल गाडीतून उतरला आणि सायबर कॅफेच्या दिशेने निघाला. अलेक्सने गाडी समोर नेली आणि पुढच्या चौकात वळवून तो भरधाव वेगाने पुढे निघून गेला.


क्रमश:...  


Read Udan Storis ( Please Add Skeep )

No comments:

Post a Comment