Friday 15 March 2013

CH-27 हकिकत

कॉन्स्टेबल जेव्हा अतूलला तिथून घेवून गेला आणि अतूल सगळ्यांच्या नजरेआड झाला तेव्हा कुठे हॉलमधे लोकांमधे कुजबुज सुरु झाली. काही लोक अजूनही भिलेल्या अवस्थेत होते तर कुणाला हे काय होत आहे हे काहीही कळत नव्हते. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावणारा एक हुशार मुलगा त्याला अचानक अंजलीने मारले काय आणि इन्स्पेक्टर डायसवर येवून त्याला अरेस्ट करतात काय. लोकांना काहीएक कळत नव्हते. लोकांचा गोंधळ आणि कुजबुज पाहून इन्स्पेक्टरने ताडले होते की लोकांना संपूर्ण केस आणि तिचं गांभीर्य समजावून सांगणे आवशक आहे नाहीतर लोक हातापायीवर उतरतील. कारण अतूल जो काही क्षणापूर्वी सर्वांचा हिरो होता त्याला अंजलीने पुढच्या क्षणीच व्हिलन करुन टाकले होते. लोकांना तो खरा की ती खरी हेही जाणण्याची नैसर्गीक उत्कंठा असणं साहजीक होतं.

'' शांत व्हा ... शांत व्हा प्लीज...'' इन्स्पेक्टर हात वर करुन, जे काहीजण उठले होते त्यांना बसवित म्हणत होते, '' कुणी काही भिण्याचं किंवा घाबरुन जाण्याचं कारण नाही... दिस इज अ केस ऑफ ब्लॅकमेलींग ऍन्ड सायबर क्राईम... मी स्वत: या केसवर काम केलेलं आहे ... आणि दोषी म्हणून आत्ताच तुमच्या समोर या अतूल सरकारला पकडण्यात आलं आहे...''

तरीही लोक शांत व्हायला तयार होत नव्हते तेव्हा ऍन्करने पुन्हा माईकचा ताबा घेतला, '' लोकहो शांत व्हा... प्लीज शांत व्हा... आपली प्रतिस्पर्धासुद्धा इथीकल हॅकींग ... म्हणजे.. हॅकिंगच्या संदर्भात होती... आणि इन्स्पेक्टरांनी आता आपल्यासमोर हॅन्डल केलेली केस सुद्धा हॅकींग आणि क्रॅकींगचीच होती .. म्हणून इन्स्पेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी .. ही केस कशी हाताळली ... ही केस हाताळातांना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणीना सामोरं जावं लागलं ... आणि शेवटी ते गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचले हे इथे सभागृहात जमलेल्या लोकांना थोडक्यात सांगावे ...''

आता कुठे लोक पुन्हा शांत झाले होते. आणि ही केस कशाची आहे... आणि कशी हाताळल्या गेली आहे हे जाणण्याची त्यांना उत्सुकता लागून राहाली होती. एन्करने एकदा पुन्हा इन्स्पेक्टरकडे पाहाले आणि त्यांना पुढे होवून पुर्ण हकिकत सांगण्याची विनंती केली. इन्स्पेक्टरने अंजलीकडे पाहाले. अंजलीने डोळ्यानेच त्यांना ती हकिकत सांगण्याची मुक संमत्ती दिली. इन्स्पेक्टर समोर आले आणि त्यांनी माईक ऍन्करच्या हातातून स्वत:च्या हातात घेतला.

इन्स्पेक्टर हकिकत सांगू लागले -

'' सायबर क्राईम हे आता भारतात आपल्याला नविन राहालेलं नाही ... आजकाल देशभरात जवळपास रोज काहीना काही सायबर क्राईमच्या घटना होत असतात.... पण तपास करतांना मला नेहमीच जाणवतं की लोकांचे सायबर क्राइमबद्दल बरेच गैरसमज आहेत ... जितके त्यांचे सायबर क्राईमबद्दल गैरसमज आहेत तेवढाच त्यांचा त्या क्राईमच्या बाबतीत भारतीय पोलिसांवर अविश्वास आहे... त्यांना नेहमी शंका असते की हे टोपी आणि दांडे घेवून फिरणारे पोलीस हे एवढं ऍडव्हान्स... हे एवढं टेक्नीकल असलेलं क्राईम कसे हाताळू शकतील... त्यांना सायबर क्राईमच्या बाबतीत आपले पोलीस सक्षम आहेत की नाहीत या बाबत नाना प्रकारच्या शंका असतात... पण आता या नुकत्याच हाताळलेल्या केसच्या माध्यमातून लोकांना मी विश्वास देवू इच्छीतो की ... सायबर क्राईमच्या बाबतीत आपलं पोलीस डीपार्टमेंट नुसतंच सक्षम नाही तर पुर्णपणे तयार आहे... असला किंवा कसलाही सायबर गुन्हा झाल्यास आम्ही ज्या तऱ्हेने दुसरे गुन्हेगार पकडू शकतो तेवढ्याच शिताफीने हे सायबर क्रिमीनल्ससुद्धा पकडू शकतो... पण तरीही काही बाबतीत सायबर गुन्हा हाताळतांना आम्ही तोकडे पडतो... विषेशत: जेव्हा तो क्रिमीनल दुसऱ्या देशातून आपले सुत्र हालवित असतो तेव्हा... त्या केसमधे तो गुन्हेगार दुसऱ्या देशाच्या कायदेक्षेत्रात असतो ... आणि मग तो देश आम्हाला त्या गुन्ह्याबाबत त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी कसे सहकार्य करतो यावर सगळे अवलंबून असते... सायबर गुन्ह्यामधे अजून एक महत्वाची बाब म्हणजे यात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना काही बाबतीत जागरुक असणे आवश्यक आहे... जसे कुणाला, त्या समोरच्या पार्टीची संपूर्ण माहिती असल्याशिवाय स्वत:ची माहिती... पासवर्ड .. फोन ... मोबाईल पुरवणे धोकादायक असते... तसे अनसेफ, अनप्रोटेक्टेड, अनसेक्यूअर कनेक्शनवर फायनांसीयल ट्रान्झेक्शन करणे... स्वत:चे प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर पाठवणे ... इत्यादी... आता मी ही जी केस सविस्तर सांगणार आहे त्यावरुन तुम्हाला कसे जागरुक रहावे लागेल याचाही अंदाज येईल...''

एवढी प्रस्तावना करुन इन्स्पेक्टर प्रत्यक्ष केसच्या संदर्भात हकिकत सांगू लागले...


क्रमश: ...  



Read devotional ( Please Add Skeep ) ...............

No comments:

Post a Comment