Thursday 14 March 2013

CH-20 पर्याय

अंजली आपल्या ऑफीसमधे खुर्चीवर बसून काहीतरी विचार करीत होती. तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. कदाचित तिला तिच्या जिवनात एकदम अशी कलाटणी येईल अशी अपेक्षा नसावी. तिने तिचा कॉम्प्यूतर सुरु तर करुन ठेवला होता पण तिला ना चाटींग करण्याची इच्छा होत होती ना कुणा मित्राला मेल पाठविण्याची. तिने आपल्या ऑफीशियल मेल्स चेक करुन घेतल्या आणि पुन्हा ती विचार करीत बसली. तेवढ्यात तिच्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. तिने आपली चेअर फिरवून कॉम्प्यूटरकडे आपले तोंड केले-

' हाय ... मिस अंजली'

विवेकचा चॅटींग मेसेज होता.

तिला जाणवलं की तिच्या हृदयाची स्पंदनं वाढत आहेत. पण यावेळी स्पंदनं वाढण्याचं कारण वेगळं होतं. अंजली नुसती त्या मेसेजकडे बघत राहाली. तिला आता काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात शरवरी आत आली. अंजलीने शरवरीला विवेकचा मेसेज आल्याचा इशारा केला. शरवरी पटकन त्यांनी काहीतरी आधी ठरविल्याप्रमाणे बाहेर निघून गेली. अंजली अजूनही त्या मेसेजकडे पाहत होती.

' अंजली कम ऑन एकनॉलेज यूवर प्रेझेन्स' विवेकचा पुन्हा मेसेज आला.

' यस' अंजलीने टाईप केले आणि सेंड बटनवर क्लीक केले.

अंजलीला कॉम्प्यूटर ऑपरेट करतांना तिच्या हातात आणि बोटांत प्रथमच कंपनं जाणवत होती.

' मी आता मेलमधे सगळी डीटेल्स पाठवित आहे' विवेकचा मेसेज आला.

' पण 50 लाख रुपए दिल्यानंतरही पुन्हा तू ब्लॅकमेल करणार नाहीस याची काय शास्वती?' अंजलीने मेसेज पाठवला.

विवेकने तिकडून एक हसणारा छोटा चेहरा पाठविला.

यावेळी अंजलीला त्या चेहऱ्याच्या हसण्यात साधेपणापेक्षा गुढपणा जास्त जाणवत होता.

' हे बघ... जग विश्वासावर चालतं ... तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल... आणि तुझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा काय पर्याय आहे?' तिकडून विवेकचा खोचक प्रश्न विचारणारा मेसेज आला.

आणि तेही खरंच होतं... तिच्याजवळ त्याच्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा काहीही पर्याय नव्हता...

अंजली आता त्याने पाठविलेल्या मेसेजला काय उत्तर पाठवावे याचा विचार करु लागली. तेवढ्यात त्याचा पुढील मेसेज आला -

' ओके देन बाय... दिस इज अवर लास्ट कन्व्हरसेशन... टेक केअर... तुझा ... आणि फक्त तुझा विवेक...'

अंजली त्या मेसेजकडे बराच वेळ पाहत राहाली. नंतर तिला काय सुचले काय माहीत तिने पटापट किबोर्डवर काही बटनं दाबली आणि माऊसवर काही क्लीक्स केले. तिच्या समोर तिचा मेलबॉक्स अवतरला होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे आणि विवेकने चाटींगवर सांगितल्या प्रमाणे त्याची मेल तिच्या मेलबॉक्समधे येवून पडलेली होती. तिने क्षणाचाही विलंब न लावता ती मेल उघडली.

मेलमधे 50 लाख रुपए कुठे कसे आणि केव्हा नेवून ठेवायचे याची तपशिलवार माहिती दिली होती. सोबतच पोलिसांच्या भानगडीत न पडण्याबद्दल ताकिद दिली होती. अंजलीने आपल्या घडाळाकडे बघितले. अजूनही पैसे मेलमधे नमुद केलेल्या जागी पोहोचविण्यास 4 तासांचा अवधी शिल्लक होता. तिने एक दिर्घ श्वास घेवून एक सुस्कारा सोडला. ती तसे करुन तिच्या मनावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. तसे चार तास म्हणजे तिच्यासाठी पुरेसा अवधी होता. आणि पैशाची व्यवस्थाही तिने आधीच करुन ठेवली होती - अगदी पैसे सुटकेसमधे पॅक करुन. मेलकडे पाहता पाहता तिच्या अचानक लक्षात आले की मेलसोबत काहीतरी अटॅचमेंट पाठवलेली आहे. तिने ती अटॅचमेंट उघडून बघितली. तो एक JPG फॉरमॅटमधील एक फोटो होता. तिने क्लीक करुन तो फोटो उघडला.

तो त्यांचा हॉटेलच्या रुम मधील दिर्घ चूंबन घेत असतांनाचा फोटो होता.


क्रमश: 


Read vigyan( Please Add Skeep ) .............

No comments:

Post a Comment