Friday 15 March 2013

Ch-41 तीच चूक पुन्हा?


अंजली आणि विवेक आल्यापासून नुसते तिच्या बेडरुममधे एकमेकांना बाहुपाशात घेवून पडून होते. त्यांना ना खान्याची शुध्द नव्हती ना पिण्याची.

'' त्याची जेव्हा पहली मेल आली तेव्हा तुला काय वाटले होते?'' विवेकने विचारले.

'' खरं सांगु ... माझ्या तर पायाखालची जमिन आणि डोक्यावरचं जणू आकाश नाहीसं व्हावं असं वाटलं होतं... मी तर तुला मनापासून पुर्णपणे स्विकारलं होतं आणि त्या मनाच्या स्थितीत असं काही व्हावं असा काही मी स्वप्नातही विचार केला नव्हता...'' अंजली म्हणाली.

'' म्हणजे तुला खरं वाटलं होतं तर '' विवेकने गमतीने विचारले.

'' अरे..म्हणजे?... जरी मनाला पटत नव्हतं तरी वस्तूस्थितीतर तेच दर्शवित होती'' अंजली आपला बचाव करीत म्हणाली.

'' आणि तुला काय वाटलं होतं?'' अंजलीने विचारले.

'' नाही बरोबर आहे तुझं... माझीही तशीच काहीतरी अवस्था होती... जरी मनाला पटत नसलं तरी वस्तूस्थिती तेच सांगत होती'' विवेक तिला थोपटत म्हणाला.

'' असा प्रसंग पुन्हा कधी आपल्या जिवनात न येवो'' अंजली म्हणाली.

'' खरंच प्रथम तर मला आपल्या प्रेमाला कुणाची तरी दृष्ट लागावी असंच वाटलं होतं'' विवेक तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.

तो तिच्या कपाळाचे चुंबन घेवून तिच्या तोंडाजवळ आपले तोंड नेवून मोठमोठे श्वास तसाच थांबला. आणि आपसूकच ते एकमेकांच्या ओठांना आपल्या तोंडात घेवून चुंबनबध्द झाले.

अचानक अंजलीला त्यांचा आधीचा हॉटेलमधील प्रणय आठवला आणि त्याचबरोबर कुणीतरी त्यांच्या प्रणयाचे फोटो काढीत आहे असा भास झाला.

ती पटकन आपले ओठ त्याच्या ओठांपासून वेगळे करीत मागे सरकली.

'' काय झालं?'' विवेकने विचारले.

'' आपण तीच चूक पुन्हा तर करीत नाही आहोत'' अंजलीने जणू स्वत:ला विचारले.

'' म्हणजे?'' विवेकने विचारले.

'' हे सगळं लग्नाच्या आधी ... तू माझ्याबद्दल काय विचार करीत असशील'' अंजलीने तिच्या मनात घोळणारा दुसरा प्रश्नही विचारला.

'' डोन्ट बी सिली'' तो पुन्हा पुढाकार घेत म्हणाला.

पण तिचे हातपाय जणू थंडे पडलेले होते. ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती.

'' तुला जर त्यात वावगं वाटत असेल आणि .. तुझ्या मनाची तयारी नसेल तर काही हरकत नाही... '' तो तिच्यावरुन उठत बाजुला सरकत म्हणाला.

'' तसं नाही हनी ... डोन्ट मिसअंडरस्टॅंड मी'' ती त्याला पुन्हा जवळ ओढीत म्हणाली.

त्याने पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला पण आता ती त्याला सोडायला तयार नव्हती. विवेकला काहीच समजत नव्हते की कसे प्रतिउत्तर द्यावे. तो नुसता शिथील होवून पडून राहाला. पण आता जणू अंजलीच्या अंगात काहीतरी संचारले होते. ती कॉटवर त्याला एका बाजूने आडवे पाडून त्याच्यावर चढली आणि त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करायला लागली. आणि नंतर त्यांच्यात निर्माण झालेली ती तात्पुरती दरी केव्हा दुर झाली आणि ते केव्हा एकमेकांत पुर्णपणे सामाऊन गेले त्यांना काही कळलंच नाही.


अंजलीला सकाळी सकाळी जाग आली होती तेव्हा ती तिच्या शेजारी झोपलेल्या विवेकच्या निरागस चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. तिने बाहेर खिडकीतून डोकावून पाहाले. बाहेर अजुनही उजाडले नव्हते. ती पुन्हा विवेकच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. अचानक तिच्या लक्षात आले की त्याचा निरागस गोंडस आणि हसरा चेहरा आता लाल लाल होवून उग्र रुप धारण करीत आहे.

कदाचित तो काहीतरी वाईट स्वप्न बघत असेल...

तिने त्याच्या चेहऱ्यावरुन हात फिरवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हाताचा स्पर्ष होताच तो दचकून उठून बसला आणि तो रागाने म्हणाला, '' मी तुला सोडणार नाही... मी तुला सोडणार नाही''

काही क्षण तर अंजलीही दचकून गोंधळून गेली.

'' काय झालं?'' अंजलीने विचारलं.

पण काही क्षणातच त्याचा राग निवळलेला दिसला. आणि तो इकडे तिकडे बघत पुन्हा झोपत म्हणाला,

'' काही नाही''


क्रमश:..  


Read Agrowon News ( Please ADD sKeep ) .............

No comments:

Post a Comment