Thursday 14 March 2013

CH-11 : मिटींग


दिवसागणीक अंजली आणि विवेकचं चॅटींग, मेल करणं वाढतच होतं. मेलची लांबी रुंदी वाढत होती. एकमेकांचे फोटो पाठविणे, जोक्स पाठविणे, पझल्स पाठविणे... मेल पाठविण्याचे किती तरी निमित्तं त्यांच्याजवळ होती. हळू-हळू अंजलीला जाणवायला लागलं की आपण त्याच्या प्रेमात पडलो आहोत. पण प्रेमाची कबुली तिनं त्याच्याजवळ किंवा त्यानं तिच्याजवळ कधीही दिली नव्हती. त्याच्या मेलगणिक... मेलमधल्या प्रत्येक वाक्यागणिक... त्याच्या प्रत्येक फोटोगणिक, त्याच्या व्यक्तीमत्वाचा एक एक पैलू तिला उलगडत होता. आणि तितकीच ती त्याच्यामधे गुंतत होती असं तिला जाणवत होतं. तिनं सुध्दा स्वत:ला रोखलं नाही, किंबहूना स्वत:ला आवरण्यापेक्षा स्वत:ला झोकून देण्यात तिला आनंद वाटत असावा. पण प्रेमाच्या कबुलीबाबत ती फार जपून पावले टाकीत होती. तिच्याजवळ निमित्त होतं की तिनं अजून त्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. तसं त्याचं प्रेम तिला जाणवत नव्हतं असं नाही. परंतु तो सुध्दा कदाचित तेवढाच जपून वागत होता. कदाचित त्यानंही तिला अजून प्रत्यक्ष न भेटल्यामुळे. तो आपल्याला भेटल्यानंतर टाळणार तर नाही ना? याबद्दल ती एकदम बेफिकीर होती. विश्वामित्रालासुध्दा भूरळ पडावी असं तिचं सौंदर्य होतं.

अंजली आपल्या कॉम्प्यूटरवर चाटींग करीत होती आणि तिच्या टेबल समोर खुर्चीवर शरवरी बसलेली होती. कॉम्प्यूटरवर आलेली एक मेल वाचता वाचता अंजली म्हणाली,

'' शरवरी बघ तर विवेकने मेलवर काय पाठवले आहे''

शरवरी खुर्चीवरुन उठून अंजलीच्या मागे जावून उभी राहून काम्प्यूटरच्या मॉनीटरकडे पाहू लागली. एवढ्यात या दोघांचं एकमेकांना काही तरी पाठवणं सुरुच असायचं. आणि शरवरीलाही त्या दोघांची प्रेमयूक्त देवाणघेवाण पहायला आणि वाचायला मजा वाटायची. मॉनीटरवर एक छोटं चायनीज बाळ गमतीदार प्रकारे डांस करीत होतं. डांस करता करता ते बाळ एकदम शू करायला लागलं. ते पाहून दोघीही हसायला लागल्या.

'' कुठून हा काही काही शोधतो'' अंजली म्हणाली.

'' हो ना मी तर कीती इंटरनेटवर सर्फ करते पण माझ्या पाहण्यात हे ऍनीमेशन कधीच कसं आलं नाही'' शरवरीने दुजोरा दिला.

तेवढ्यात एक वयस्कर माणूस दरवाज्यावर नॉक करुन आत आला. तो माणूस येताच अंजलीने आपली चाकाची खुर्ची फिरवून आपले लक्ष त्या माणसाकडे केंद्रीत केलं. शरवरी तिथून निघून घेली. तो वयस्कर माणूस तिच्या टेबलच्या समोर खुर्चीवर बसताच अंजली म्हणाली,

'' बोला आंनंदजी..''

'' मॅडम ... इंटेल कंपनीने आपल्या सगळ्या कोलॅबरेटर्स सोबत एक मिटींग ठेवलेली आहे. आत्ताच थोड्यावेळापूर्वी त्यांचा फॅक्स आला आहे... त्यांनी मिटींगची तारीख आणि व्हेन्यू आपल्याला पाठविला आहे... आणि सोबतच मिटींगचा अजेंडाही पाठविलेला आहे...'' आनंदजीने माहिती पुरवली.

'' कुठे ठेवली आहे मिटींग ?'' अंजलीने विचारले.

'' मुंबईला ... 25 तारखेला ... म्हणजे .. येणाऱ्या सोमवारी'' आनंदजी कॅलेडरकडे बघत म्हणाले.

अंजलीही विचार केल्यासारखे करीत कॅलेंडरकडे बघत म्हणाली,

'' ठिक आहे कन्फर्मेशन फॅक्स पाठवून द्या... आणि मोनाला माझे सर्व फ्लाईट आणि होटल बुकींग डिटेल्स द्या''

'' ठिक आहे मॅडम'' आनंदजी उठून उभे राहत म्हणाले.

आनंदजी तिथून निघून गेले तसं अंजलीने आपली चाकाची खुर्ची गर्रकन फिरवून आपले लक्ष कॉम्प्यूटरकडे केंद्रीत केलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. पटकन तिने मेल प्रोग्रॅम उघडला आणि घाईघाईने ती मेल टाईप करायला लागली-

'' विवेक ... असं वाटतं की लवकरचं आपल्या नशिबात भेटणं लिहिलेलं आहे...विचार कसं? काहीतरी क्लायमॅक्स रहायला पाहिजे ना? पुढच्या मेलमधे सगळे डिटेल्स पाठविन... बाय फॉर नाऊ... टेक केअर .. ---अंजली...''

अंजलीने पटापट कॉम्प्यूटरचे दोन चार बटन्स दाबून शेवटी ऐंन्टर दाबला. कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवर मेसेज अवतरला - 'मेल सेन्ट'


क्रमश:..  




Read Udan stori ( Please Add Skeep ) ..................

No comments:

Post a Comment