Friday 15 March 2013

CH-28 रुम पार्टनर्स

एका खोलीत अतूल आणि अलेक्स राहात होते. खोलीच्या स्थितीवरुन त्यांनी ती खोली भाड्याने घेतली असावी असे जाणवत होते. खोलीत एका कोपऱ्यात अतूल त्याच्या कॉम्प्यूटरवर बसून चॅटींग करीत होता आणि खोलीच्या मध्यभागी अलेक्स डीप्स मारीत व्यायाम करीत होता. अतूल त्याच्या कॉम्प्यूटरवर दिसणाऱ्या चॅटींग विंडोत वर वर सरकणारे एक एक मेसेज वाचत होता. तो चाटींग करण्यासाठी योग्य पार्टनर निवडण्याचा प्रयत्न करीत होता. चॅटींग हा प्रकार त्याला जेव्हापासून कळला तेव्हापासूनच आवडत आला होता. फावल्या वेळात गप्पा करुन टाईप पास करण्याचे यापेक्षा तरी दुसरे कोणते साधन नसावे असे त्याचे मत होते. आणि काही अनोळखी, काही ओळखी लोंकाशी अशा गप्पा मारणे त्याला फार मजेचे वाटत होते. अनोळखी लोकांना प्रत्यक्ष भेटल्यावर कसे प्रथम आपल्या कंफर्टेबल झोन मधे आणावे लागते आणि मगच गप्पा सुरु होवू शकतात. आणि त्या गोष्टीला समोरचा माणूस कसा आहे यावरुन कधी तास तर कधी कितीतरी दिवस लागू शकतात. चॅटींगवर तसे नसते. कुणी ओळखी असो की अनोळखी धडाल द्यायचा मेसेज पाठवून. समोरच्याने एंटरटेन केलेच तर ठीक नाही तर दुसऱ्या कुणाला गाठायचे. काही न समजणारे तर काही घाणेरड्यातले घाणेरडे संवाद त्याला चॅटींग विंडोत वर वर सरकतांना दिसत होते.

तेवढ्यात त्याला त्यातल्या त्यात वेगळा आणि सोज्वळ एक मेसेज दिसला, '' बरं तू काय करतेस?... म्हणजे शिक्षण की जॉब?'' कुणी विवेकने पाठविलेला मेसेज होता.

ते त्याचं खरंही नाव असू शकतं किंवा धारण केलेलं...

'' मी बी. ई. कॉम्प्यूटर केले आहे... आणि जी. एच. इन्फॉरमॅटीक्स या स्वत:च्या कंपनीची मी सध्या मॅनेजींग डायरेक्टर आहे'' विवेकच्या मेसेजला पाठवलेली प्रतिक्रिया चॅटींग विंडोत अवतरली.

पाठविणाऱ्याचे नाव अंजली होते.

अचानक मेसेज वाचता वाचता अतूलच्या मनात विचार येवुन गेला.

या मेसेजचा आपण काही उपयोग घेवू शकतो का?...

तो मनातल्या मनात पडताळून पाहू लागला. तो विचार करु लागला. विचार करता करता अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.

तो पटकन अलेक्सकडे वळून म्हणाला, '' अलेक्स पटकन इकडे ये''

त्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह ओसांडत होता.

अलेक्स एक्सरसाईज करायचं थांबला आणि काहीही उत्साह न दाखविता जड पावलाने त्याच्या जवळ येत म्हणाला, '' काय आहे... आता मला शांततेने एक्सरसाईजही करु देणार आहेस का नाही?''

'' अरे इकडे मॉनिटरवर तर बघ... एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी भेटू शकते आपल्याला...'' अतूल पुन्हा त्याचा उत्साह जागृत करण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

आता अलेक्स थोडा इंटरेस्ट घेवून मॉनिटरकडे बघू लागला.

तेवढ्यात चॅटींग विंडोमधे अवतरलेला आणि वर सरकत असलेला विवेकचा अजून एक मेसेज त्यांना दिसला,

'' अरे .. बापरे!.. '' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना?... नाही ... म्हणजे मी कुठेतरी वाचलं आहे की स्त्रियांना त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही म्हणून ... ''

आणि त्याच्या पाठोपाठ लागलीच अंजलीने पाठविलेल्या उत्तराचा मेसेज अवतरला,

'' 23 वर्ष''

'' बघ हा हंस आणि हंसिनी चा जोडा... यातली हंसीने एका सॉफ्टवेअर कंपनीची मालक आहे... म्हणजे मल्टी मिलीयन डॉलर्स...'' अतूल आपल्या चेहऱ्यावर तरळलेले लालचीपणाचे भाव लपविण्याच्या प्रयत्नात म्हणाला.

तेवढ्यात पुन्हा चॅटींग विंडोत विवेकचा मेसेज अवतरला, '' अगं हे तर मला आधीच माहित होतं... मी तुझ्या मेल आयडी वरुन बघितलं होतं ... खरं सांगू? तू जेव्हा सांगितलंस की तू मॅनेजींग डायरेक्टर आहेस ... तर माझ्या समोर 45-50 वयाच्या एका वयस्कर बाईचं चित्र उभं राहालं होतं ...''

अलेक्सने त्या दोघांचे त्या विंडोतले सगळे मेसेज वाचले आणि म्हणाला, '' पण आपल्याला काय करावे लागेल?''

'' काय करायचं ते सगळं तू माझ्यावर सोडून दे ... फक्त मला तूझी साथ पाहिजे'' अतूल आपला हात समोर करीत म्हणाला.

'' किती पैसे मिळतील?'' अलेक्सने मुळ मुद्द्याला हात घालीत प्रश्न विचारला.

'' अरे लाखो करोडो मधे खेळू शकतो आपण'' अतूल अलेक्सचा लालचीपणा जागृत करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.

'' लाखो करोडो?'' अलेक्स अतूलचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, '' तर मग मी हा जिव ओवाळण्यासही तयार आहे''

तेवढ्यात पुन्हा चॅटींग विंडोत अंजलीचा मेसेज अवतरला, '' तू तुझं वय नाही सांगितलंस?...''

लागलीच विवेकचं उत्तरही चॅटींग विंडोत अवतरलं '' मी माझ्या मेल ऍड्रेसच्या माहितीत ... माझं खरं वय लिहिलं आहे...''

'' 23 वर्ष म्हणजे फार नाजुक वय असतं... मासा प्रेमाच्या जाळ्यात अडकून काहीही करु शकतो'' अतूल गुढपणे गालातल्या गालात हसत म्हणाला.


क्रमश:




Read Joke ( Please Add Skeep ) ............................ 

No comments:

Post a Comment