Friday 15 March 2013

ch-40 गुड न्यूज


अंजली आपल्या कॅबिनमधे कामात व्यस्त होती. तेवढ्यात फोनची घंटी वाजली.

'' हॅलो '' अंजलीने फोन उचलला.

'' अंजली देअर इज गुड न्यूज फॉर यू..."" तिकडून इन्स्पेक्टर कंवलजित बोलत होते.

'' यस अंकल''

'' ब्लॅकमेलरने विवेकला सोडून दिले आहे...'' इन्स्पेक्टरने अंजलीला खुशखबरी दिली.

'' ओ.. थॅंक गॉड ... आय कान्ट एक्सप्लेन ... आय ऍम सो हॅपी...''


अंजलीला विवेकच्या सुटकेची न्यूज मिळाल्यापासून तिचा सगळा गोंधळ उडाला होता. तिला त्याला आता कधी आणि कसे भेटतो असे झाले होते. ती ऑफीसची सगळी कामे तसेच सोडून तडक एअरपोर्टकडे निघाली.

... त्याला आधी कळवावं का?

नाही नको... त्याला सरप्राईज द्यावं...

आणि त्याला डायरेक्ट कळविण्याचा काही मार्गही तर नाही...

इमेल होती. पण आजकाल अंजलीला इमेल, चॅटींग या सगळ्या प्रकाराची एक प्रकारे भितीच वाटत होती.

एअरपोर्ट आलं तसं ड्रायव्हरला गाडी परत घेवून जायला सांगून ती जवळ जवळ धावतच तिकीटाच्या काऊंटरकडे गेली.

'' मुंबईसाठी... आता कोणती फ्लाईट आहे?'' तिने विचारले.

'' वन फ्लाईट इज देअर .. जस्ट रेडी टू टेक ऑफ...'' काऊंटरवरील मुलीने सांगितले.

'' वन टीकट प्लीज'' अंजली तिचं क्रेडीट कार्ड समोर सरकवीत म्हणाली.

तिने काऊंटरवरुन तिकीट घेतलं आणि जवळ जवळ धावतच ती फ्लाईटकडे निघाली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने मोबाईलचा डिस्प्ले बघितला. डिस्प्लेवर तिच्या ऑफिसचा नंबर होता. तिने काहीही विचार न करता फोन बंद केला आणि धावतच जाऊन फ्लाईटमधे जावून बसली. सिटवर बसताच पुन्हा तिचा मोबाईल वाजायला लागला. तिने मोबाईलचा डिस्प्ले बघितला. तोच ऑफीसचा नंबर

ऑफीसचा नंबर... काय काम असावं... शरवरी साधं कामही साभाळू शकत नाही..

तिने फोन बंद केला. पण तो पुन्हा वाजायला लागला.

शरवरी सामान्यत: असा वारंवार फोन करत नाही...

काहीतरी महत्वाचं काम असावं...

तिने फोन उचलला आणि तिकडे फ्लाईटचा लास्ट कॉल झाला.

'' काय शरवरी?... '' ती जवळ जवळ चिडून म्हणाली.

पण हे काय तिकडून आवाज एका पुरुषाचा - विवेकचा होता.

'' विवेक तू... '' ती ताडकन उभी राहात म्हणाली, '' ऑफीसमधे तू कसा. केव्हा.. आणि काय करीत आहेस...?'' तिला काय बोलावे काही समजत नव्हते.

ती बोलता बोलता प्लेनच्या दरवाजाकडे घाई घाई जात होती.

'' तुला भेटायला आलो होतो'' तिकडून विवेकचा आर्त स्वर आला.

ती जेव्हा प्लेनच्या दरवाजाजवळ पोहोचली तेव्हा प्लेनचं दार बंद केलं जात होतं.

'' थांबा मला उतरायचं आहे... ''

'' काय झालं?'' अटेंडंट्ने विचारले.

'' आय ऍम नॉट फीलींग वेल'' तीला आता पुर्ण त्याला समजावून सांगणे जिवावर आले होतॆ.

तो दार बंद करायचं थांबला. आणि ती ताड ताड प्लेनमधून उतरली.

तो अटेंडंट तिच्याकडे आश्चर्याने पाहातच राहाला

'या बाईची तब्येत ठिक नाही... मग ही कशी ताड ताड उतरत आहे' त्याच्या मनात येवून गेले असावे.

तिची टॅक्सी जवळ जवळ आता तिच्या घरापर्यंत पोहोचली होती. टॅक्सी जशी घरापर्यंत येवून पोहोचली तिच्या हृदयाची स्पंदनं वाढू लागली होती. प्लेनमधून बाहेर पडताच ती तडक एअरपोर्टच्या बाहेर पडली होती आणि एका टॅक्सीला हात करुन तिने तडक त्याला टॅक्सी आपल्या घराकडे घ्यायला सांगितले होते. आणि प्लेनमधे जेव्हा विवेकचा फोन आला होता तेव्हाच तिने त्याला घरी बोलावून घेतले होते. तिला ऑफीसमधे सिन नको होता. एव्हाना टॅक्सी तिच्या घराच्या आवारात येवून पोहोचली. तिला पोर्चमधेच विवेक तिची अधिरतेने वाट पाहत असलेला दिसला. तिची टॅक्सी येताच तो पोर्चमधून उतरून तिच्या टॅक्सीजवळ आला. तिलाही आता राहवल्या जात नव्हते. टॅक्सीचे दार उघडून सरळ ती त्याच्या बाहुपाशात शिरली. किती दिवसांच्या दोघांच्याही भावना उचंबळून आल्या होत्या. अनायसेच तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग ते थांबता थांबेनात.

'' अगं वेडी आहेस का?'' विवेक तिला थोपटत म्हणाला.

'' बघ बघ मी आता पुर्णच्या पुर्ण तुझ्या पाशी सहीसलामत पोहोचलो आहे'' तो तिची गंमत करुन वातावरण सैल करण्याचा प्रयन्त करीत म्हणाला.

पण ती इतकी घट्ट बिलगली होती की ती त्याला सोडायला तयार नव्हती.


क्रमश: 


Read Kundali ( Please Add Skeep ) .................

No comments:

Post a Comment