Friday 15 March 2013

ch-34 तिसरा

संध्याकाळची वेळ होती. अतूल एका खोलीत कॉम्प्यूटरवर बसलेला होता. त्या खोलीतून बाजुच्याच खोलीत बंद केलेला विवेक दिसत होता. पण विवेकला त्याच्या खोलीतून अतूलच्या खोलीतील काहीच दिसत नव्हते. अतूलला दिवसरात्र कॉम्प्यूटरशिवाय काही सुचतच नव्हते. अलेक्स आपला व्यायाम वैगेरे आटोपून घाम पुसतच अतूल जवळ जावून बसला.

'' काय पोरगी काय म्हणते... तिला पैसा प्यारा आहे की इज्जत? '' अलेक्सने विचारले.

अलेक्सला आपल्या जवळ येवून बसलेलं पाहताच अतूल विवेकचा मेलबॉक्स उघडत म्हणाला,

'' बघ तूला एक गंम्मत दाखवतो''

अतूलने विवेकच्या मेलबॉक्समधली एक मेल उघडली.

'' बघ तर या मेलमधे अंजलीने काय लिहिले आहे.''

दोघंही वाचू लागले. मेल वाचून झाल्यावर दोघंही त्यांच्या खोलीत आणि विवेकच्या खोलीच्या मधे असलेल्या काचातून विवेककडे बघायला लागले.

''बघ या मेलमधे ही अंजली ...

विवेकको समझानेकी कोशीश कर रही है...

वह सोच रही होगी..

कबूतरकी एकदमसे कैसे मर सारी वफाए...

अब इसको क्या बताएं, कैसे समझाए

कि बेचारा इधर पिंजरेमे बंधा तडप रहा है ''

पुन्हा विवेककडे बघत त्यांनी एकमेकांची टाळी घेतली आणि ते जोरात हसायला लागले. दोघांच हसणं ओसरल्यानंतर अलेक्सने एक शंका काढली,

'' हा विवेक आपल्या होस्टेलवरुन अचानक गायब झाल्यामुळे तिथे काही हंगामा तर नाही ना होणार?''

'' अरे हो... बरं झालं तू आठवण दिली... त्याच्या होस्टेलवरच्या एखाद्या मित्राला मेल करुन तेथील बंदोबस्त करतो'' अतूल म्हणाला.

अतूल मेल टाईप करु लागला. आणि टाईप करता करता म्हणाला, '' पण अलेक्स लक्षात ठेव... येथून पुढे खरा धोका आहे... येथुन पुढे आपल्याला सगळी मेल्स वेगवेगळ्या सायबर कॅफेवर जावून करावी लागतील ... नाही तर ट्रेस होण्याचा मोठा धोका आहे... ''


.... कॉम्प्यूटरवर मेल आल्याचा बझर वाजताच अंजलीने आपला मेलबॉक्स उघडला. तिला एक नविन मेल आलेली दिसली. ती मेल तिने पाठविलेल्या स्निफर प्रोग्रॅमचीच होती. तिने पटकन ती मेल उघडली आणि

'' यस्स!'' तिच्या तोंडून विजयी उद्गार निघाले.

तिने पाठविलेल्या स्निफरने आपले काम चोख बजावले होते.

तिने विजेच्या गतिने मेल सॉफ्टवेअर ओपन केले आणि ...

'' हा त्याचा मेल आयडी आणि हा त्याचा पासवर्ड'' म्हणत विवेकचा मेल ऍड्रेस टाईप करुन त्या प्रोग्रॅमला विवेकच्या मेलचा पासवर्ड पुरविला.

अंजलीने त्याचा मेल अकाऊंट उघडताच अजून की बोर्डची दोन चार बटन्स आणि दोन चार माऊस क्लीक्स केले. आणि दोघीही कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघायला लागल्या.

'' ओ माय गॉड ... आय जस्ट कान्ट बिलीव्ह'' अंजलीच्या उघड्या तोंडून उद्गार निघाले.

शरवरी आलटून पालटून एकदा मॉनिटरकडे तर दुसऱ्यांदा अंजलीच्या आश्चर्याने उघड्या राहलेल्या तोंडाकडे बघत होती.

'' शरवरी हे बघ विवेकच्या मेलबॉक्समधे... बघ ही मेल... जी माझ्या नावाची आहे पण मी पाठवलेली नाही ... '' म्हणजे?'' शरवरीने विचारले.

'' म्हणजे मी आणि विवेकच्या व्यतिरीक्त तिसरा कुणीतरी आहे जो हे मेल अकाऊंटस उघडतो आहे... आणि होवू शकतं तो हा तिसराच असावा जो आपल्याला ब्लॅकमेल करतो आहे... पण तो तिसरा आहे तरी कोण?''


क्रमश:...


Read Agrowan News ( Please Add Skeep ) .......................................

No comments:

Post a Comment