Thursday 14 March 2013

CH-18 काय झालं?

शरवरीला आनंदजींचा निरोप मिळाल्याबरोबर ती ताबडतोब अंजलीच्या कॅबिनमधे हजर झाली. पाहाते तर अंजली हताश, निराश दोन्ही हाताच्या मधे टेबलवर आपलं डोकं ठेवून बसली होती.

"" अंजली काय झालं?'' अंजलीला त्या अवस्थेत बसलेलं पाहून शरवरी काळजीने तिच्या जवळ जात, तिच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली.

तिने तिला इतकं हताश आणि निराश, आणि तेही ऑफीसमधे कधीच बघितलं नव्हतं.

असं काय अचानक झालं असावं?...

अंजलीने हळूच आपलं डोकं वर उचललं. तिच्या हालचालीत एक शिथीलता, एक जडपणा जाणवत होता. तिचा चेहराही एकदम काळवंडलेला दिसत होता.

हो तीचे वडील अचानक हृदयविकाराने वारले तेव्हाही ती अशीच दिसत होती...

जडपणे आपला चेहरा कॉम्प्यूटरच्या मॉनीटर कडे करीत अंजली म्हणाली, "" शरवरी... सगळं काही संपलेलं आहे''

कॉम्प्यूटरचा मॉनीटर सुरुच होता. शरवरीने पटकन जवळ जावून कॉम्प्यूटरवर काय आहे हे बघितले. तिला मॉनीटरवर विवेकची अंजलीने उघडलेली मेल दिसली. शरवरी ती मेल वाचू लागली -

"" मिस अंजली... हाय... वुई हॅड अ नाईस टाईम ... आय रिअली ऍन्जॉइड इट.. आनंदाने ओथंबून भरलेले आणि तुझ्या आणि माझ्या प्रेमाने भिजलेले ते क्षण मी माझ्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कैद करुन ठेवलेले आहेत... मी तुझी माफी मांगतो की ते क्षण मी तुझ्या परवानगी शिवाय कॅमेऱ्यात कैद केले... ते क्षण होतेच असे की मी माझा मोह आवरु शकलो नाही... तुला खोटं वाटतं... बघ... त्या क्षंणापैकी एका क्षणाचा फोटो मी या मेलसोबत पाठवित आहे... असे बरेच क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात आणि माझ्या हृदयात कैद करुन ठेवलेले आहेत... विचार आहे या क्षणांना .. या फोटोंना इंटरनेटवर पब्लीश करावं म्हणत होतो... काय कशी अफलातून आयडिया आहे? नाही? ... पण ते तुला आवडणार नाही... नाही तुझी जर तशी इच्छा नसेल त्या क्षणांना मी कायमचं माझ्या हृदयात डांबून ठेवू शकतो... पण त्यासाठी तुला त्याची एक किरकोळ किंमत मोजावी लागेल... काय करणार प्रत्येक गोष्टीची एक ठराविक निर्धारीत केलेली किंमत असते ... नाही?...काही नाही बस फक्त 50 लाख रुपए... तुझ्यासाठी अगदी किरकोळच आहेत... आणि हो... पैशाचा बंदोबस्त लवकरात लवकर कर... पैसे कुठे कसे पोहोचवायचे आहेत ... हे नंतरच्या मेलमधे कळविन...

मी या मेलसाठी तुझी हृदयापासून माफी मागू इच्छीतो... पण काय करणार काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं... पुढच्या मेलची प्रतिक्षा कर... आणि हो... मला पोलिसांची फार भिती वाटते बरंका... आणि जेव्हा मला भिती वाटते तेव्हा मी काहीही करु शकतो .... अगदी खुनसुद्धा...

--- तुझा ... फक्त तुझा ... विवेक ''

मेल वाचून शरवरीला जणू तिच्या पायाखालची जमीन सरकावी असा भास होत होता. ती एकदम सुन्न झाली होती. असंही होवू शकतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने विवेकबद्दल काय विचार, काय ग्रह केला होता आणि तो काय निघाला.

'' ओ माय गॉड ही इज अ बिग फ्रॉड... आय कांट बिलीव्ह इट...'' शरवरीच्या विस्मयाने उघड्या राहालेल्या तोंडातून निघाले.

शरवरीने मेलसोबत अटॅच केलेल्या फोटोच्या लिंकवर क्लीक करुन बघितले. तो अंजलीचा आणि विवेकचा हॉटेलच्या सुईटमधला एकमेकांना आगोशात घेतलेला नग्न फोटो होता.

'' पण त्याने हा फोटो घेतला तरी कसा?'' शरवरीने शंका उपस्थित केली.

"" मी मुंबईला कधी जाणार ... कुठे थांबणार... याची त्याला पुर्ण पुर्वकल्पना होती '' अंजली म्हणाली.

'' हे तर सरळसरळ ब्लॅकमेलींग आहे. '' शरवरी आवेशात येवून चिडून म्हणाली.

'' त्याच्या निरागस चेहऱ्यामागे एवढा भयानक चेहराही लपलेला असू शकतो ... मला तर अजूनही विश्वासच होत नाही आहे'' अंजली दु:खाने म्हणाली.

'' कमीत कमी लग्नाच्या आधी आपल्याला त्याचे हे भयानक रुप कळले... नाही तर देव जाणे काय झाले असते...'' शरवरी म्हणाली.

'' मला दु:ख पैशाचे नाही आहे... दु:ख त्याने माझा एवढा मोठा विश्वासघात करावा या गोष्टीचे आहे. '' अंजली म्हणाली.

'' समजा ... एक क्षण गृहीत धरु की आपण त्याला 50 लाख रुपए दिले... पण पैसे घेतल्यानंतर तो पुन्हा आपल्याला ब्लॅकमेलींग करणार नाही या गोष्टीची काय शाश्वती... मला वाटते तू त्याला एकदा मेल पाठवुन समजावण्याचा प्रयत्न कर ... जर तरीही तो अडून राहाला तर आपण यातून काही तरी दुसरा मार्ग काढूया'' शरवरी तिला धीर देत म्हणाली.


क्रमश:


Read Children Stori ( Please Add Skeep )..................

No comments:

Post a Comment