Thursday 14 March 2013

CH-17 माशी कुठे शिंकली?

अंजली चिंताग्रस्त तिच्या खुर्चीवर बसली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर शरवरी बसली होती. विवेकसोबत घालविलेला एक एक क्षण आठवत मागचे तिन दिवस कसे गेले अंजजीला काहीच कळले नव्हते. पण आज तिला काळजी वाटायला लागली होती.

"" आज तिन दिवस झालेत ... ना तो चाटींगवर भेटतो आहे ना त्याची मेल आली आहे.'' अंजली शरवरीला काळजीच्या सुरात म्हणाली.

एका दिवसात कितीतरी वेळ चॅटींगवर चॅट करणारा आणि एका दिवसात कितीतरी मेल्स पाठविणारा विवेक आज तिन दिवस झाले तरी एकदाही चॅटींगवर भेटत नाही आणि त्याची एकही मेल येत नाही ही खरोखर एक काळजीची आणि चिंतेची बाब होती.

"" त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल ना?'' शरवरीने विचारले.

"" हो कॉलेजचा नंबर आहे ... पण त्याला तिथे फोन करने योग्य होईल का?'' अंजली म्हणाली.

"" हो तेही आहे म्हणा'' शरवरी म्हणाली.

"" मला काळजी वाटते की त्याला माझ्याबद्दल काही गैरसमज तर झाला नसेल ना... तो माझ्याबद्दल काही चुकीचा विचार तर करीत नसेल ना... '' अंजलीने जणू स्वत:लाच विचारले.

हॉटेलमधे जे झालं ते योग्य झालं नाही...

त्यामुळे विवेक कदाचित आपल्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करीत असेल कदाचित...

पण जे झालं ते कसं ... अचानक... दोघांच्याही ध्यानीमनी नसतांना घडलं...

आपण त्याला हॉटेलमधे बोलवायलाच नको होतं...

त्याला हॉटेलमधे बोलावलं नसतं तर हा प्रसंग कदाचित टळला असता...

अंजलीच्या डोक्यात विचारांच थैमान चाललेलं होतं.

"" मला नाही वाटत तो चुकीचा विचार करीत असेल... तो दुसऱ्याच काही कारणांमुळे तुझ्या संपर्कात नसेल... जसं की तो काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल...'' शरवरी अंजलीच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होती.

अंजलीने शरवरीला हॉटेलमधे घडलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर सांगितलेलं दिसत होतं. तसं ती तिला खुप जवळची आणि जिवाभावाची मैत्रिण समजत होती आणि तिच्यापासून काहीही लपवित नव्हती.

"" त्याला हॉटेलच्या आत बोलावलं नसतं तर कदाचित ही वेळ आली नसती '' अंजली म्हणाली.

"" नाही गं तसं काही नसावं... त्याचं तु उगीच वाईट वाटून घेवू नकोस.'' शरवरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती.

मोनाने घाईघाईने तिच्या समोरुन जाणाऱ्या आनंदजींना थांबविले.

""आनंदजी तुम्ही शरवरीला बघितलं का?'' मोनाने विचारले.

"" हो .. ती वर तिकडे विकासकडे आहे... का काय झाल?'' आनंदजीने मोनाचा काळजीयूक्त चेहरा बघून विचारले.

"" नाही अंजली मॅमने तिला ताबडतोब बोलावलं आहे... तुम्ही तिकडेच जात आहात ना ... तर तिला अंजली मॅमकडे ताबडतोब पाठवून देता का प्लीज... काहीतरी महत्वाचं काम दिसतं'' मोना आनंदजींना म्हणाली.

"" ठिक आहे ... मी आत्ता पाठवून देतो ..'' आनंदजी पायऱ्या चढत वर जात म्हणाले.


क्रमश:... 


Read agriculture ( Please Add Skeep ) ........................

No comments:

Post a Comment