Friday 15 March 2013

ch-38 काळी बॅग


जंगलात सर्वत्र सुकलेली पानं पसरलेली होती. त्या सुकलेल्या पानांना चिरडत एक काळे काच चढवलेली कार हळू हळू त्या जंगलातून चालायला लागली. ती कार जेव्हा जंगलातून चालत होती तेव्हा त्या सुकलेल्या पानांच्या चिरडण्यामुळे एक विचित्र आवाज त्या जंगलातल्या शांततेचा भंग करीत होता. शेवटी एका झाडाजवळ ती कार थांबली. त्या कारच्या ड्रायव्हरच्या सिटचा काच हळू हळू वर सरकायला लागला आणि आता तिथे ड्रायव्हीग सिटवर बसलेली काळा चष्मा चढवलेली अंजली दिसू लागली. तिने एका झाडावर लावलेली लाल निशानी बघितली आणि तिने तिच्या बाजुच्या सिटवर ठेवलेली एक ब्रिफकेस उचलून खिडकीतून त्या निशान लावलेल्या झाडाकडे भिरकाऊन दिली. ब्रिफकेसचा धप्प असा आवाज झाला. तिने पुन्हा चहूकडे आपली नजर फिरवली आणि आपली कार स्टार्ट करुन ती तिथून निघून गेली.

जंगलातून बाहेर पडून अंजलीची कार आता हम रस्त्यावर आली होती. तेवढ्यात अंजलीचा मोबाईल वाजला.

अंजलीने डिस्प्ले न बघताच तो अटेंड केला, '' हॅलो...''

'' हॅलो... मी इन्स्पेक्टर कंवलजीत बोलतोय...'' तिकडून आवाज आला.

'' यस अंकल..''

'' पैसे केव्हा आणि कुठे पाठवायचे आहेत यासंदर्भात ब्लॅकमेलरची तुला मेल आलीच असेल'' इन्स्पेक्टर कंवलजीतने विचारले.

'' हो आली होती... खरं म्हणजे मी आता तिथे पैसे पोहोचवूनच परत येत आहे'' अंजली म्हणाली.

'' व्हॉट... '' इन्स्पेक्टरच्या आवाजात आश्चर्य स्पष्ट जाणवत होतं.

''आय जस्ट कांन्ट बिलीव्ह धीस... तु मला सांगितलं नाहिस... आम्ही नक्कीच काहीतरी करु शकलो असतो'' इन्स्पेक्टर पुढे म्हणाले.

'' नाही अंकल आता इथे मला पोलिसांचा सहभाग नको होता. ... एक वेळ तर पोलिस सपशेल फेल ठरलेली आहे... इथे मी चान्स घेवू इच्छीत नव्हते... आणि मला काळजी फक्त विवेकची आहे... पैसे गेल्याचं मला दु:ख नाही ... बस ब्लकमेलरला पैसे मिळाले आणि तो आता विवेकला सोडून देईल... तर पुर्ण प्रकरणावरच पडदा पडेल'' अंजली म्हणाली.

'' मी प्रार्थाना करतो की तू जसा विचार करतेस सगळं तसंच होवो... पण मला काळजी वाटते ती या गोष्टीची की जर तसं झालं नाही तर?'' इन्स्पेक्टर म्हणाले.

'' म्हणजे?'' अंजलीने विचारले.

'' म्हणजे ... तु पैसे देवूनही त्याने विवेकला जर सोडले नाही तर?'' इन्स्पेक्टरने आपली भिती व्यक्त केली.

अंजली एकदम विचारात पडली होती.


अतूल आणि अलेक्स त्या काळ्या बॅगसमोर बसलेले होते. त्यांच्या तोंडावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. शेवटी अतूलने न राहवून ती बॅग उघडली. दोघंही डोळे फाडून त्या पैशाकडे बघत होते. अतूलने त्या बॅगमधलं एक पैशाचं बंडल उचललं, नाकाजवळ नेलं आणि तो त्या बंडलातून बोट फिरवीत त्या नोटांचा सुगंध घ्यायला लागला.

'' बघ तर किती चांगला सुगंध येतो आहे... '' अतूल म्हणाला.

अतूलनेही एक बंडल उचलून त्याचा सुगंध घेत तो म्हणाला,

'' आणि बघ तर आपल्या मेहनतीच्या पैशाचा सुगंध काही औरच असतो... नाही?''

दोघांनीही हसत जोरात टाळी दिली.

'' एवढे मोठे पैसे तेही एकाच वेळी मी तर प्रथमच बघत आहे'' अलेक्स म्हणाला.

दोघंही त्या बंडलाच्या थैलीत हात घालून सगळे बंडल्स उलटून पुलटून पाहू लागले.

'' नोटाचे बंडल्स हाताळता हाताळता अलेक्स मधेच थांबून म्हणाला, '' आता त्या पंटरचं काय करायचं... सोडून द्यायचं''

'' सोडून द्यायचं? ... काय वेड लागलयं का? ... अरे आता तर सुरवात झाली आहे... कोंबडीने अंडे देण्यास आता तर सुरवात केली आहे'' अतूल बिभत्स हास्य धारण करीत म्हणाला.


क्रमश: ..  


Read Joke ( Please Add Skeep ) ...................

No comments:

Post a Comment