Friday 15 March 2013

ch-47 गुड मूव्ह


एवढ्या मोठ्या कंपनीचं भवितव्य धोक्यात होतं त्यामुळे इन्स्पेक्टरांना अतूलचं सगळंकाही ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि भवितव्य म्हणजे किती नुकसान किती तोटा हे भाटीयाजींच्या घामाजलेल्या चेहऱ्यावर दिसत होतं. तसे भाटीयाजी म्हणजे जाडजूड आणि गेंड्याच्या कातडीचे इसम. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आणि सर्वांगावर घाम सुटावा म्हणजे कंपनीचं अस्तित्वचं पणाला लागलं होतं हे स्पष्ट होतं. अतूलने सांगितल्याप्रमाणे विवेकही त्याच्यासोबत त्याला या जागेपासून खुप दूर सोडून देण्यास तयार झाला होता. त्यामुळे त्याच्यासोबत कोण जाणार हा एक मोठा प्रश्न सुटला होता. कारण त्याच्यासोबत एकटं जाणं म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालण्याइतपत रिस्की होतं आणि तो कुणाला त्याच्यासोबत एखांद हत्यार घेवून येवू देईल एवढा मुर्ख नव्हता. पण विवेकला त्याच्यासोबत एकटं पाठविण्यास अंजलीचा जिव तयार होईना. ती तशी म्हणाली काही नाही पण तिच्या चेहऱ्यावर सर्वकाही दिसत होतं. एकीकडे भाटीयाजींची कंपनी तिच्यामुळेच धोक्यात आली होती आणि तिनेच विवेकला पाठविण्यास नकार द्यावा हे तिला बरं दिसत नव्हतं. अतुलला फास लावून पकडण्याच्या सर्व नियोजनात भाटीयाजींचा सिंहाचा वाटा होता. आणि त्यांना त्या गोष्टीच्या धोक्याची कल्पना असूनही तिला पुरेपुर सहकार्य केलं होतं. मग आता त्यांची कंपनी धोक्यात आली असतांना पाठ फिरवणं तिला पटण्यासारखं नव्हतं.

विवेकनें अंजलीला मिठीत घेवून थोपटून म्हटले.

'' डोन्ट वरी... आय वुल बी फाईन''

अंजली काहीच बोलली नाही, पण शेवटी हृदयावर दगड ठेवून ती त्याला जावू देण्यास तयार झाली.

इन्स्पेक्टर कंवलजितनेही अंजलीला धीर देण्याचा प्रयत्न केला.

भाटीयाजी, अंजली, विवेक आणि इन्स्पेक्टर कंवलजित स्टेजवरुन निघून गेल्यानंतर हॉलमधे जमलेल्या सर्व लोकांना शांततेने बाहेर काढण्याचे काम ऍन्करने काही पोलिसांच्या मदतीने चोख बजावले होते. आता कंपनीच्या आवारात पुलिस, कंपनीचे लोक, विवेक, अंजली आणि तो गुन्हेगार यांच्याव्यतिरिक्त कुणी नव्हते. काही लोकांना या प्रकाराची थोडीबहूत कुणकुण लागली होती ते पोलिसांच्या भितीमुळे आवाराच्या बाहेरुन इकडे तिकडे दडून कंपनीच्या आवाराकडे पाहत होते. आणि तेही लोक बोटावर मोजण्याइतकेच होते. म्हणून आता गुन्हेगाराला किंवा त्याच्या मागण्या हाताळतांना इन्स्पेक्टर कंवलजितला फारसा त्रास होत नव्हता. जर लोक अजुनही आवारात किंवा हॉलमधे असते तर कदाचित या गुन्हेगारापेक्षा त्या लोकांना आवाक्यात ठेवणं फार कठीन गेलं असतं.

शेवटी अतूलला त्याच्या मागणीनुसार कुठेतरी दुर नेऊन सोडण्याचे ठरले. सगळेजण कंपनीच्या बिल्डींगच्या बाहेर आवारात आले. आवारात पोलिसांच्या आणि बऱ्याच इतर गाड्या होत्या. अतूलने तिथे ठेवलेल्या पाच सहा गाड्यांकडे न्याहाळून पाहाले. आणि त्यातली एक गाडी पक्की करीत तो त्या गाडीजवळ गेला.

'' ही गाडी कुणाची आहे?'' अतूलने विचारले.

ती एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची गाडी होती. तो कर्मचारी भितभीतच समोर येत म्हणाला, '' माझी आहे''

'' चाबी दे '' अतूलने फरमान सोडले.

भाटीयाजींनी त्या कर्मचाऱ्याकडे पाहात डोळ्यानेच त्याला तसे करण्यास सांगितले. त्या कर्मचाऱ्याने चूपचाप आपल्या पॅन्टच्या खिशातून चाबी काढत अतूलच्या हातावर ठेवली.

'' आम्ही या गाडीने जाणार'' अतूलने जाहिर केले.

विवेकने एक करडी नजर अतूलवर टाकीत म्हटले, '' आधी तुझा मोबाईल इकडे आण''

अतूलने काही वेळ विचार केला आणि आपला मोबाईल काढून विवेकजवळ देत म्हणाला, '' गुड मुव्ह''

विवेकने तो मोबाईल घेवून इन्स्पेक्टर जवळ दिला.

'' आता तुझा मोबाईल आण इकडे'' अतूल म्हणाला.

विवेकने आपला मोबाईल काढून अतूलजवळ दिला. अतूलने गाडीची डीक्की उघडली आणि तो मोबाईल डिक्कीत टाकला. पण नंतर त्याला काय वाटले कुणास ठाऊक त्याने तो मोबाईल पुन्हा डीक्कीतून बाहेर काढला आणि त्या मोबाईलला ऑफ करुन त्या डिक्कीत टाकले.

'' गुड मुव्ह'' आता विवेकची म्हणायची पाळी होती.

अतूल त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात धूर्तपणे हसत म्हणाला, '' हं आता सर्व ठिक आहे''

'' हू विल ड्राईव्ह द व्हेईकल'' विवेक गाडीकडे जात म्हणाला.

'' ऑफ कोर्स मी'' अतूल म्हणाला आणि गाडीच्या ड्राईव्हींग सिटकडे जावू लागला.

मग अचानक अतूल मधेच थांबत म्हणाला, ''वेट'

विवेक जागच्या जागी थांबला. अतूल गालातल्या गालात हसत विवेकजवळ गेला आणि त्याने त्याची पुर्ण खालून वरपर्यंत चाचपडून तपासणी केली.

'' हं आता ठिक आहे'' अतूल ड्रायव्हींग सिटकडे जावू लागला तसा विवेक म्हणाला.

'' वेट... दॅट अप्लाईज टू यू टू''

विवेकही अतूलजवळ गेला आणि त्यानेही त्याची खालून वरपर्यंत चाचपडून तलाशी घेतली.

'' हं आता ठिक आहे'' विवेक म्हणाला आणि गाडीकडे जावू लागला तसा अतूल इन्स्पेक्टरकडे पाहत म्हणाला.

'' नाही अजुन सर्व ठिक नाही ... ''

इन्सपेक्टर काही न बोलता अतूलकडे पाहू लागला.

'' इन्स्पेक्टर जर मला कोणत्याही क्षणी लक्षात आले की आमचा पाठलाग होत आहे किंवा आमची माहिती दुसरीकडे पुरवली जात आहे... तर लक्षात ठेवा... मी पासवर्ड तर देईन ... पण तो चुकिचा असेल... आणि जो दिल्याबरोबर तुमच्या कंपनीचा संपुर्ण डाटा ताबडतोब नष्ट होईल... समजलं'' अतूल करड्या आवाजात म्हणाला.

'' डोन्ट वरी यू विल नॉटबी ... फालोड... प्रोव्हायडेड यू गिव्ह अस द करेक्ट पासवर्ड...'' इन्स्पेक्टर म्हणाला.

'' दट्स लाईक अ गुड बॉय'' अतूल गाडीच्या ड्रायव्हीग सिटवर बसत म्हणाला.

अतूलने गाडी सुरु करुन विवेककडे करड्या नजरेने बघितले. विवेक त्याच्या बाजुच्या सिटवर चुपचाप जावून बसला आणि अंजलीकडे पाहत त्याने दार ओढून घेतले.

अतूलने गाडी रेस केली आणि भन्नाट वेगाने कंपनीच्या आवाराच्या बाहेर घेवून रस्त्यावर दौडवली.


क्रमश:...  



Read agriculture ( Please Add Skeep ) .....................

No comments:

Post a Comment