Friday 15 March 2013

CH-29 यू आर जिनियस

जवळ जवळ मध्यरात्र उलटून गेली होती. अतूलच्या खोलीचा लाईट बंद होता. पण खोलीत सर्वत्र धूसरसा प्रकाश पसरला होता - खोलीत कोपऱ्यात सुरु असलेल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरचा. अतूल कॉम्प्यूटरवर बसून काहीतरी करण्यात अगदी मग्न होता. त्याच्या आजूबाजुला सगळीकडे जेवनाच्या, फराळाच्या प्लेटस, चहाचे रिकामे, अर्धे रिकामे कप्स, चिप्स, रिकामे झालेले व्हिस्किचे ग्लासेस आणि अर्धवट रिकामी झालेली व्हिस्किची बॉटल दिसत होती. त्याच्या मागे कॉटवर हातपाय पसरुन अलेक्स झोपलेला होता. त्या मध्यरात्रीच्या शांततेत अतूल भराभर कॉम्प्यूटरवर काहीतरी करीत होता आणि त्याच्या किबोर्डच्या बटनांच्या एक विचित्र आवाज त्या खोलीत येत होता. तिकडे अतूलच्या मागे झोपलेल्या अलेक्सची चूळबूळ सुरु होती.

शेवटी न राहवून अलेक्स उठून बसत अतूलला म्हणाला, '' यार तुझं हे काय चाललं आहे?... 8 दिवसांपासून पाहत आहे... दिवसा किचकिच... रात्रीही किचकिच... कधीतर शांततेने झोपू देशील... तुझ्या या किबोर्डच्या आवाजानं सालं डोकं वेडं व्हायची वेळ आली आहे...''

अतूल अगदी शांत होता. काहीही प्रतिक्रिया न व्यक्त करता त्याचं आपलं कॉम्प्यूटरवर काम करणं सुरुच होतं.

''बरं तू काय करतो आहेस हे तरी सांगशील? ... आठ दिवसांपासून तुझं असं कोणतं काम चाललं आहे?... मला तर काहिच समजत नाही आहे...'' अलेक्स उठून त्याच्या जवळ येत म्हणाला.

'' विवेक आणि अंजलीचा पासवर्ड ब्रेक करतो आहे.... अंजलीचा ब्रेक झाला आहे आता विवेकचा ब्रेक करण्याचा प्रयत्न करीत आहे'' अतूल त्याच्याकडे न पाहता कॉम्प्यूटरवर आपलं काम तसंच सुरु ठेवित म्हणाला.

'' तिकडे तु पासवर्ड ब्रेक करीत आहेस आणि इकडे तुझ्या या किबोर्डच्या किचकीच आवाजामुळे माझं डोकं ब्रेक व्हायची वेळ आली आहे त्याचं काय?'' अलेक्स पुन्हा बेडवर जावून झोपण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

कुणाचा पासवर्ड ब्रेक झाला आणि कुणाचा झाला नाही याच्याशी त्याला काहीएक सोयरसुतक दिसत नव्हतं. त्याला फक्त पैशाशी मतलब होता. अलेक्सने आपल्या डोक्यावर चादर ओढून घेतली, तरीही आवाज येतच होता, मग उशी कानावर ठेवून बघितली, तरीही आवाज येत होता, शेवटी त्याने उशी एका कोपऱ्यात फाडली आणि त्या उशीची थोडीशी रुई काढून आपल्या कानात कोंबली आणि तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करु लागला.

आता जवळजवळ सकाळचे तिन वाजले असतील तरीही अतूलचे कॉम्प्यूटरवर काम करणे सुरुच होते. त्याच्या मागे बेडवर पडलेला अलेक्स गाढ झोपलेला दिसत होता.

तेवढ्यात कॉम्प्यूटरवर काम करता करता अतूल आनंदाने एकदम उठून उभा राहत ओरडला, '' यस... या हू... आय हॅव डन इट''

तो एवढ्याने ओरडला की बेडवर झोपलेला अलेक्स काय झाले म्हणून एकदम जागा झाला आणि उठून बसत , '' काय झाले? काय झाले ? '' म्हणून घाबरुन अतूलला विचारायला लागला.

'' कम ऑन चियर्स अलेक्स... आपल्याला खजीन्याची चाबी मिळालेली आहे... बघ तर इकडे...'' अतूल अलेक्सचा हात धरुन त्याला कॉम्प्यूटरकडॆ ओढून आणीत म्हणाला.

अलेक्स अनिच्छेनेच त्याच्या सोबत आला. आणि मॉनिटरवर बघायला लागला.

'' हे बघ मी विवेकचाही पासवर्ड ब्रेक केला आहे आणि ही बघ तिने त्याला पाठवलेली मेल'' अतूल अलेक्सचे लक्ष मॉनिटरवर विवेकच्या मेलबॉक्समधील उघडलेल्या एका मेलकडे आकर्षीत करीत म्हणाला.

मॉनिटरवर उघडलेल्या मेलमधे लिहिलेले होते -

'' विवेक ... 25 तारखेला सकाळी बारा वाजता एका मिटींगसाठी मी मुंबईला येत आहे... 12.30 वाजता हॉटेल ओबेरायला पोहचेन... आणि मग फ्रेश वगैरे होवून 1.00 वाजता मिटींग अटेंड करेन... मिटींग 3-4 वाजेपर्यंत संपेल... तु मला बरोबर 5.00 वाजता वर्सोवा बिचवर भेट... बाय फॉर नॉऊ... टेक केअर''

'' चल आता आपल्याला आपला तळ चेन्नईवरुन मुंबईला हलवण्याची तयारी करावी लागेल'' अतूल अलेक्सला म्हणाला.

अलेक्स अविश्वासाने अतूलकडे पाहत होता. आता कुठे त्याला विवेक आठ दिवसापासून काय करीत आहे आणि कशासाठी करीत आहे हे उमगले होते.

'' यार अतूल ... यू आर जिनियस'' आता अलेक्सच्या अंगातही उत्साह संचारला होता.


क्रमश:... 




Read Samaj Stori ( Please Add Skeep ) .............

No comments:

Post a Comment