Friday 15 March 2013

ch-43 चल


सकाळी सकाळी अंजली आपल्या ऑफीसच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात शरवरी कॅबिनमधे आली.

'' प्रतियोगीता केव्हा उद्यापासून सुरु होणार आहे ना?'' अंजलीने शरवरीला विचारले.

'' हो'' शरवरीने एक फाईल शोधत उत्तर दिले.

'' किती लोकांचे अप्लीकेशन्स आले आहेत?'' अंजलीने विचारले.

'' जवळपास तिन हजार'' शरवरीने उत्तर दिले.

'' ओ माय गॉड ... इतक्या लोकांतून त्या ब्लॅकमेलरला शोधनं म्हणजे... डोंगर पोखरुन उंदीर काढण्यासारखे आहे... आणि तेही जर त्याने या प्रतियोगीतेत भाग घेतला तर?... नाही?'' अंजली म्हणाली.

'' हो कठिण तर आहेच'' शरवरी एक फाईल घेवून शरवरीच्या समोर येवून बसत म्हणाली.

तेवढ्यात अंजलीचा फोन वाजला. अंजलीने फोन उचलून आपल्या कानाला लावला,

'' अंजली... मी इन्स्पेक्टर कंवलजित बोलतोय..'' तिकडून आवाज आला.

'' मॉर्निंग अंकल....''

'' मॉर्निंग ... तुला माहित असेलच की प्रतियोगितेसाठी 3123 अप्लीकेशन्स आलेले आहेत... त्यात आम्ही जी लेफ्ट हॅन्डेड आणि राईट हॅन्डेड माहिती मागवली होती ... त्यानुसार जे डावखुरे आहेत असे 32 अप्लीकेशन्स वेगळे केले आहेत... त्यातल्या एका मुलाचं हॅन्डरायटींग हुबेहुब मॅच होत आहे... त्याचं नाव आहे अतूल विश्वास... '' तिकडून इन्स्पेक्टरने माहिती पुरवली.

'' गुड व्हेरी गुड... '' अंजली एकदम खुश होत न राहवून म्हणाली, '' थॅंक्यू अंकल... मी तुमच्या उपकाराची परतफेड कशी करु शकेन... मला तर काहीच समजत नाही आहे...'' अंजली आनंदाच्या भरात बोलत होती.

'' इतक्या लवकर इतकं खुश होऊन चालणार नाही ... आता तर फक्त सुरवात झाली आहे... त्याला कायद्याच्या कचाट्यात अटकविण्यासाठी अजुन आपल्याला बरीच कसरत करावी लागणार आहे...'' इन्स्पेक्टर म्हणाले.

'' का? ... आत्ता ताबडतोब आपण त्याला पकडू शकणार नाही?'' अंजलीने निराश होवून विचारले.

'' नाही आत्ताच नाही... पुढे तर ऐक... आम्ही आता सध्या त्याचा फोन टॅप करने सुरु केले आहे.. की जेणेकरुन जर त्याचे अजुन काही साथीदार असतील तर त्यांना आपण पकडू शकू... आणि सगळे पुरावे जमा होताच आपण त्याला अरेस्ट करुया.. '' इन्स्पेक्टर कंवलजित म्हणाले.

अंजलीचं तर रक्त जणू सळसळत होतं. त्या ब्लॅकमेलरला कधी एकदा पकडून त्याला धडा शिकवतो असं तिला झालं होतं. तिला सध्या आपण काहीही करु शकत नाही याचं दु:ख होत होतं.

पण नाही...

आपण काहीतरी करु शकतो...

आपण ही बातमी विवेकला देवू शकतो...

ही बातमी ऐकून तो किती खुश होईल...

तिने तिच्या फोनचा क्रेडल उचलला आणि ती एक फोन नंबर डायल करायला लागली.


पोलिस स्टेशनमधे इन्स्पेक्टर कंवलजितच्या समोर दुसरा एक पोलिस बसलेला होता.

'' सर आम्ही अतुल बिश्वासचे सगळे फोन कॉल्स टॅप केले आहेत... त्यातला हा एक महत्वाचा वाटला..'' तो पोलिस समोर ठेवलेला टेपरेकॉर्डर सुरु करीत इन्स्पेक्टर कंवलजितला म्हणाला.

टेपरेकॉर्डर सुरु झाला आणि त्यातून तो टेप केलेला फोन कॉल ऐकू येवू लागला.-

'' अलेक्स... मला तिथे यायला 7-8 दिवसाचा वेळ लागेल... पैसे सांभाळून ठेवशील... मी आल्यानंतर ते वाटून घेवूया.. '' अतुल म्हणाला.

'' ठिक आहे.. '' अलेक्स म्हणाला.

'' आणि हं... आपल्या कॉम्प्यूटरला पुर्णपणे फॉरमॅट कर... त्यात काहीच शिल्लक राहता कामा नये... ''

'' ठिक आहे... तू इकडची बिलकुल काळजी करु नकोस..''

'' ओके देन ... बाय''

'' बाय .. ''

इन्स्पेक्टर कंवलजितने तो संवाद रिवाईंड करुन पुन्हा पुन्हा ऐकला. आणि मग ते निश्चयाने उभे राहत त्या पुलिसाला म्हणाले,

''चल ''

इन्सपेक्टर जरी एकच शब्द बोलले होते तरी तो तेवढा इशारा त्या पोलीसाला पुरेसा होता. इन्स्पेक्टर पुढे पुढे चालू लागले आणि त्याच्या मागे मागे तो पोलीस.


क्रमश:..    



Read devotional ( Please Add Skeep ) .............

No comments:

Post a Comment