Friday 15 March 2013

ch-36 जग विश्वासावर चालतं


अतूल सायबर कॅफेत एका कॉम्प्यूटरच्या समोर बसला होता. त्याने चॅटींग सेशन उघडला आणि अंजलीही चाटींग रुममधे आहे हे पाहून तिच्याशी चॅटींग सुरु केली -

'' हाय मिस. अंजली''


तिकडे अतूलने पाठविलेला मेसेस अंजलीच्या मॉनिटरवर उमटला. आणि तेवढ्यात शरवरी अंजलीच्या कॅबिनमधे आली. शरवरीला पाहताच अंजलीने 'त्याचाच मेसेज आहे' असा तिला इशारा केला. इशारा मिळताच शरवरी ताबडतोब कॅबिनच्या बाहेर गेली. बाहेर जावून शरवरी अंजलीच्या ऑफीसच्या बाजुला असलेल्या एका रुममधे गेली. त्या रुममधे इन्स्पेक्टर कंवलजीत आणि अजून दोन लोक एका कॉम्प्यूटरसमोर बसलेले होते. शरवरी खोलीत प्रवेश करताच म्हणाली -

'' सर त्याचा मेसेज आला आहे''

ते तिघेही एकदम सतर्क होवून, ताठ बसून कॉम्प्यूटरकडे पाहू लागले.

'' कम ऑन सुरज ट्रेस द ब्लडी बास्टर्ड '' त्या दोघांचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने इन्सपेक्टर म्हणाले.

'' सर ही इज ट्रेस्ड ... द कॉल इज अगेन फ्रॉम मुंबई ... ऍन्ड सी द आय पी ऍड्रेस...''

इन्स्पेक्टरने मॉनिटरकडे बघितले आणि ताबडतोब मोबाईल लावला,

'' हॅलो राज... आम्ही त्या ब्लॅकमेलरला ट्रेस केलं आहे... त्याला अजूनही अंजलीने चॅटींगवर बिझी ठेवलं आहे... तू तिथे मुंबईला त्याची नेमकी जागा शोध... ऍन्ड सी दॅट द फेलो शुड नॉट एस्केप... हं हा घे ब्लॅकमेलरचा आय पी ऍड्रेस ....''


अजुनही अंजलीला ब्लॅकमेलरचा मेसेज ' हाय मिस अंजली ' तिच्या चॅटींग विंडोत दिसत होता. ती आता मनातल्या मनात त्याला जास्तीत जास्त वेळ चॅटींगवर कसं बिझी ठेवायचं की जेणेकरुन पुलिस त्याला ट्रेस करुन पकडू शकतील याचा विचार करु लागली. तेवढ्यात त्याचा पुढचा मेसेज आला,

' अंजली प्लीज ऍकनॉलेज युवर प्रेसेन्स '

आता अंजलीला काहीतरी मेसेज पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता नाहीतर तो डिस्कनेक्ट करायची भिती होती.

' हॅलो.. ' तिने मेसेज टाईप करुन पाठविला.


इकडे इन्स्पेक्टरने पुन्हा मुंबईला फोन लावला.

'' राज ... काही पता लागला?''

'' यस सर ... द एरीया वुई हॅड जस्ट फाईन्ड आऊट... इट्स ठाणे... बट द एक्सॅक्ट स्पॉट वुई आर ट्राईंग टू लोकेट...'' तिकडून राज बोलत होता.

'' कमॉन डू समथींग ऍन्ड फाईन्ड आऊट क्वीकली'' इन्स्पेक्टर म्हणाले..


तिकडे अंजलीला ब्लॅकमेलरचा पुढचा मेसेज आला -

' मी सध्या मेलमधे सगळ्या डिटेल्स पाठवित आहे... '

अंजलीला वाटले की त्याला सगळी डिटेल्स चॅटींगवरच मागवावीत... पण नको त्याला शंका यायची...

पण आता तो डिस्कनेक्ट करणार... त्याच्याशी संभाषण सुरु ठेवणे आवश्यक होते...

अचानक तिला सुचले आणि तिने मेसेज टाईप केला,

' पण 50 लाख रुपए दिल्यानंतरही पुन्हा तू ब्लॅकमेल करणार नाहीस याची काय शास्वती?'


तिकडे इन्सपेक्टरला चैन पडत नव्हता. त्यांनी पुन्हा मुंबईला राजला फोन लावला,

'' राज .. काही माहित पडलं?''

'' सर वुई हॅव फाऊंड आऊट द एक्सॅक्ट लोकेशन ऍन्ड दी एक्सॅट स्पॉट...'' तिकडून राज म्हणाला.

'' गुड व्हेरी गुड... नाऊ क्वीकली इन्स्ट्रक्ट द ठाणे पुलिस टू रेड द स्पॉट ... '' इन्स्पेक्टर उत्साहाने म्हणाले.

'' यस सर'' तिकडून प्रतिक्रीया आली...


अंजली आता विचार करु लागली ती त्याला संभाषणात गुंतविण्यात यशस्वी झाली की नाही कारण अजून त्याचा रिप्लाय आला नव्हता.

तेवढ्यात त्याचा रिप्लाय आला,

' हे बघ... जग विश्वासावर चालतं ... तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल... आणि तुझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा काय पर्याय आहे?'

तिच्या दु:खद चेहऱ्यावरही एक आनंदाची चूणूक दिसून गेली की ती त्याला संभाषणात गुंतविण्यात यशस्वी झाली होती.

आता पुढे त्याला अजून गुंतविण्यासाठी काय पाठवावे ती विचार करु लागली आणि तिने टाईप केलेही पण ब्लॅकमेलरचा पुढील मेसेज आला -

' ओके देन बाय... दिस इज अवर लास्ट कन्व्हरसेशन... टेक केअर... तुझा ... आणि फक्त तुझा विवेक...'

ती अजून काही टाईप करुन त्याला काहीतरी पाठविणार येवढ्यात तो चॅटींगवरुन नाहीसा झाला होता.

तो इतक्या लवकर चॅटींग संपवेल याची तिला अपेक्षा नव्हती. अंजली ताबडतोब आपल्या खुर्चीवरुन उठली आणि घाईघाईने आपल्या कॅबिनमधून बाहेर पडली. बाहेर येवून सरळ ती बाजुच्या रुममधे, जिथे इन्स्पेक्टर आणि दोन कॉम्प्यूटर एक्स्पर्टस बसले होते तिथे गेली. अंजली तिथे पोहोचताच ते अंजलीच्या भितीयूक्त चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

'' अंकल त्याने जस्ट आत्ताच चॅटींग शेशन क्लोज केला आहे... पण मला खात्री आहे की तो अजुनही इंटरनेटवर कनेक्टेड असावा आणि मेल लिहित असावा ..'' अंजली म्हणाली.

'' डोन्ट वरी... ठाणे पुलिस हॅव ऑलरेडी स्टार्टेड टू रेड द लोकेशन... '' इन्स्पेक्टर म्हणाले.


क्रमश:... 


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...

No comments:

Post a Comment