Friday 15 March 2013

CH-33 सेन्ड शरवरी इन ... इमिडीयटली

सकाळची वेळ होती. एका खोलीत अतूल कॉम्प्यूरवर बसला होता आणि अलेक्स त्याच्या शेजारीच बसला होता. '' आता बघ... आपली हमाली आता संपली आहे'' अतूल अलेक्सला म्हणाला आणि त्याने कॉम्प्यूटरवर विवेकच्या मेलबॉक्सचा ब्रेक केलेला पासवर्ड देवून विवेकचा मेलबॉक्स उघडला.

'' आता खरं काम सुरु झालं आहे...'' अतूल कॉम्प्यूटर ऑपरेट करता करता अलेक्सला म्हणाला.

अलेक्स चूपचाप बारकाईने तो काय करतो आहे ते पाहत होता.

अतूल आता विवेकच्या मेलबॉक्समधे मेल टाईप करायला लागला -

"" मिस अंजली... हाय... वुई हॅड अ नाईस टाईम ... आय रिअली ऍन्जॉइड इट.. आनंदाने ओथंबून भरलेले आणि तुझ्या आणि माझ्या प्रेमाने भिजलेले ते क्षण मी माझ्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कैद करुन ठेवलेले आहेत...''

अतूलने टाईप करता करता एकदा अलेक्सकडे अर्थपूर्ण नजरेने पाहाले. दोघंही एकमेकांकडे पाहून गुढतेने हसले. मग अतूल पुन्हा पुढे टाईप करायला लागला -

'' मी तुझी माफी मांगतो की ते क्षण मी तुझ्या परवानगी शिवाय कॅमेऱ्यात कैद केले... ते क्षण होतेच असे की मी माझा मोह आवरु शकलो नाही... तुला खोटं वाटतं... बघ... त्या क्षंणापैकी एका क्षणाचा फोटो मी या मेलसोबत पाठवित आहे... असे बरेच क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात आणि माझ्या हृदयात कैद करुन ठेवलेले आहेत... विचार आहे या क्षणांना .. या फोटोंना इंटरनेटवर पब्लीश करावं म्हणत होतो... काय कशी अफलातून आयडिया आहे? नाही? ... पण ते तुला आवडणार नाही... नाही तुझी जर तशी इच्छा नसेल तर त्या क्षणांना मी कायमचं माझ्या हृदयात डांबून ठेवू शकतो... पण त्यासाठी तुला त्याची एक किरकोळ किंमत मोजावी लागेल... काय करणार प्रत्येक गोष्टीची एक ठराविक निर्धारीत केलेली किंमत असते ... नाही?...''

पुन्हा अतूल टाईप करता करता थांबला, तो अलेक्सकडे वळून म्हणाला,

'' अलेक्स सांग किती किंमत पाहिजे आहे तूला?''

'' माग 20-25 लाख'' अलेक्स म्हणाला.

'' बस 25 लाखच... असं करुया 25 तुझे आणि 25 माझे ... 50 कसे राहतील'' अतूल म्हणाला.

'' 50 !'' अलेक्स विस्फारलेल्या डोळ्यांनी अतूलकडे पाहत म्हणाला.

अतूल पुन्हा राहालेली मेल टाईप करायला लागला -

'' काही नाही बस फक्त 50 लाख रुपए... तुझ्यासाठी अगदी किरकोळच आहेत... आणि हो... पैशाचा बंदोबस्त लवकरात लवकर कर... पैसे कुठे कसे पोहोचवायचे आहेत ... हे नंतरच्या मेलमधे कळविन...

मी या मेलसाठी तुझी हृदयापासून माफी मागू इच्छीतो... पण काय करणार काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं... पुढच्या मेलची प्रतिक्षा कर... आणि हो... मला पोलिसांची फार भिती वाटते बरंका... आणि जेव्हा मला भिती वाटते तेव्हा मी काहीही करु शकतो .... अगदी खुनसुद्धा...

--- तुझा ... फक्त तुझा ... विवेक ''

अतूलने संपूर्ण मेल टाईप केली. पुन्हा एकदा दोनदा वाचून बघितली आणि काही त्रूटी नाही याची खात्री होताच सेंड बटनवर क्लीक करुन अंजलीला पाठवलीसुध्दा.

जेव्हा स्क्रिनवर 'मेल सेंट' मेसेज अवतरला. दोघांनीही एकमेकांकडे पाहत एक टाळी घेतली.

तिकडे अंजलीने जेव्हा मेलबॉक्स उघडून ती मेल वाचली तिला तिच्या पायाखालची जमीन सरकली की काय असं वाटत होतं. तिने पटकन आपल्या समोर ठेवलेल्या इंटरकॉमवर दोन डीजीट दाबले,

'' मोना... सेन्ड शरवरी इन ... इमिडीयटली''


क्रमश:...


Read Kunadalli ( Plesae Add Skeep ) ........

No comments:

Post a Comment