Friday 15 March 2013

ch-45 शेवटचा डाव

... इन्स्पेक्टरची पुर्ण हकिकत सांगुन झाली होती. स्टेजवर इन्स्पेक्टर कंवलजित, अंजली, नेट सेक्यूराचे डायरेक्टर आणि ऍन्कर उभे होते. पुर्ण हकिकत सांगुन झाली तरीही लोक अजूनही स्तब्धच होते. हॉलमधे जणू श्मशानवत शांतता पसरलेली होती. तेवढ्यात अंजलीला हॉलच्या मागच्या बाजुला विवेक उभा असलेला दिसला. अंजलीने हात हलवून त्याला स्टेजवर बोलावून घेतले. विवेकही जवळ जवळ धावतच स्टेजवर गेला. अंजलीने त्याचा हात हातात घेवून त्याला आपल्या जवळ उभे केले. आतापर्यंत जे सर्व लोक शांत होते ते टाळ्या वाजवू लागले. आणि टाळ्याही इतक्या की ते थांबायला तयार नव्हते.

अजूनही विवेकचा हात अंजलीच्या हातात घट्ट पकडलेला होता. अंजलीने दुसरा हात दाखवून लोकांना शांत राहण्याचा इशारा केला आणि ती माईक हातात घेवून बोलू लागली -

'' आमचं प्रेम... किंवा इ - प्रेम म्हणायला काही हरकत नाही ... वाटलं होतं कमीत कमी यात तरी अडथळे येणार नाहीत.. पण असं दिसतं की प्रेमाच्या वाट्याला नेहमी अडथळे हे वाढून ठेवलेलेच असतात...''

अंजलीने हॉलमधे सभोवार आपली नजर फिरवली आणि ती विवेकचा हात अजून घट्ट पकडीत पुढे म्हणाली, '' ... पण काहीही असो ... शेवटी प्रेमाचाच विजय होतो हे मात्र खरं''

लोकांनी टाळ्या वाजवित पुन्हा सगळा हॉल जणू डोक्यावर घेतला होता.

आता विवेकने माईक हातात घेतला आणि लोकांना शांत राहण्याचा इशारा करीत तो म्हणाला,

"" आमच्या दोघांच्या प्रेमकहानीवरुन तुम्ही मात्र एक धडा नक्कीच घेवू शकता की... '' एक क्षण स्तब्ध राहून तो पुढे म्हणाला, '' की वाईटाचा अंत शेवटी वाईटातच होतो...''

पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवून त्याच्या म्हणण्याला जणू दूजोरा दिला. तेवढ्यात एक कंपनीचा माणूस स्टेजच्या मागच्या बाजूने स्टेजवर आला. त्याची शोधक नजर स्टेजवर कुणाला तरी शोधत होती. शेवटी त्याला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भाटीयाजी दिसताच तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगू लागला. तो जे काही सांगत होता ते ऐकून भाटीयाजींच्या चेहऱ्यावर अचानक गोंधळलेले, आश्चर्ययूक्त भितीचे भाव पसरले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून स्टेजवरील इतर लोकांच्या चेहऱ्यावरील भावही बदलले होते. स्टेजवरील आनंदी आणि हलके फुलके वातावरण एकदम तणावपुर्ण झाले होते. त्या कंपनीच्या मानसाचे भाटीयाजींना सगळे सांगून झाल्यानंतर भाटीयाजीने स्टेजवर इकडे तिकडे बघितले आणि ते इन्स्पेक्टर कंवलजितला हेरुन त्यांच्याकडे चालू लागले.

आता भाटीयाजी इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी सांगू लागले. इन्स्पेक्टरचीही तिच गत झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरही गोंधळलेले, भितीयुक्त आश्चर्याचे भाव पसरले होते. तो पर्यंत अंजली, विवेक आणि तो ऍन्करही इन्स्पेक्टर जवळ येवून उभे राहाले.

'' काय झालं?'' अंजलीने एकदा इन्स्पेक्टरकडे तर दुसऱ्यांदा भाटीयाजीकडे पाहत विचारले.

'' जाता जाता तो आपला शेवटचा डाव चालून गेला'' इन्सपेक्टर म्हणाले.

'' पण झालं तरी काय?'' विवेकने विचारले.

'' जरा स्पष्ट सांगता का?'' अंजलीने भाटीयाजीकडे पाहत विचारले.

'' स्पष्ट सांगायला आता वेळ नाही आहे... चला माझ्या सोबत चला'' भाटीयाजी आता घाई करीत म्हणाले. आणि तरातरा स्टेजच्या मागच्या बाजुने उतरुन त्या कंपनीच्या माणसासोबत आपल्या ऑफीसकडे जावू लागले.

इन्स्पेक्टर, अंजली, आणि विवेकही चुपचाप त्यांच्या मागे चालू लागले. तो ऍन्कर त्यांच्या मागे जावं की नाही ह्या संभ्रमात स्टेजवरच थांबला कारण आतापर्यंत हॉलमधल्या लोकांमधे कुजबुज आणि गोंधळ चालू झाला होता. नक्की काय झाले हे जसे त्या लोकांना माहित करुन घ्यायची उत्कंठा लागली होती. पण जेवढे ते लोक अनभिज्ञ होते तेवढाच तो ऍन्करही अनभिज्ञ होता. पण काय झालं हे माहित करुन घेण्यापेक्षा मोठी जबाबदारी आता त्या ऍन्करवर येवून पडली होती - कसंही करुन त्या लोकांना शांत करुन तिथून हॉलमधून सुखरुप बाहेर काढण्याची.


क्रमश:... 


Read vigyan ( Please Add Skeeep ) .....

No comments:

Post a Comment