Friday 15 March 2013

Ch-44 गुड न्यूज़


रात्रीची वेळ होती. एका अंधाऱ्या खोलीत अलेक्स कॉम्प्यूटर समोर बसून काहीतरी करीत होता. खोलीत जो काही उजेड होता तो त्या मॉनिटरचाच होता. त्या मॉनिटरच्या प्रकाशात अलेक्सचा राकट चमकता चेहरा अजुनच भयानक दिसत होता. तेवढ्यात दारावर थाप पडली. अलेक्स उठून उभा राहाला,

आले वाटतं बेवडे...

त्याने विचार केला. ही त्याच्या रात्रीच्या मित्रांची यायची वेळ होती. या वेळी ते आणि त्याचे मित्र मिळून मस्त पैकी पित बसत आणि गप्पा करीत बसत. आणि एवढ्यात त्याच्याजवळ पैसे आल्याने त्याच्याकडे येणाऱ्या मित्रांची संख्याही वाढलेली होती.

'' कोण आहे बे?'' असं मस्तीत म्हणत त्याने दार उघडलं.

आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच्या चेहऱ्यावरच्या मस्तीच्या छटा क्षणात नाहिशा झाल्या होत्या. त्याच्या समोर दारात इन्स्पेक्टर कंवलजीत आणि अजुन पाच सहा पोलिस उभे होते. त्यातले दोन जण ड्रेसमधे नव्हते. तो काही विचार करुन काही हालचाल करणार तेवढ्यात पोलिसांनी जणू त्याच्यावर झडप टाकून आधी त्याला अरेस्ट केले.

'' मी काय केले?'' अलेक्स चेहऱ्यावर निरागसतेचे भाव आणून म्हणाला.

कुणीच काहीही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून तो पुन्हा म्हणाला,

'' मला का अरेस्ट केलं आहे... काही सांगाल तर?''

तरीही कुणीच काही बोललं नाही.

'' असं तुम्ही काहीही गुन्हा नसतांना कुणाला अटक करु शकत नाही... हा कायद्याने गुन्हा आहे'' तो आवाज चढवून म्हणाला.

तरीही कुणीही काही बोलायला तयार नव्हतं हे पाहून तो चिडून ओरडला,

'' मला का अरेस्ट केल आहे?''

'' कळेल लवकरच कळेल'' इन्सपेक्टरचा एक साथीदार कुत्सीतपणे हळू आवाजात म्हणाला.

आता नुसता खांदा उडवून चेहऱ्यावर येतील तेवढे निरागस भाव आणून अलेक्स नुसता त्यांच्या हालचाली बघू लागला. एक बलदंड पोलीस त्याच्या हातातल्या बेड्यांना धरुन त्याला आत घेवून गेला आणि बाकीचे सर्व पोलीस खोलीची सगळीकडे पसरुन झडती घेवू लागले. त्यातले दोन जण जे ड्रेसमधे नव्हते ते कॉम्प्यूटर एक्सपर्ट होते. त्यांनी ताबडतोब कॉम्प्यूटरचा ताबा घेतला. कॉम्प्यूटर सुरुच असल्यामुळे गुन्हेगाराकडून पासवर्ड मिळविणे किंवा त्या कॉम्प्यूटरचा पासवर्ड ब्रेक करणे हा सगळा भाग टळला होता. पोलिसांची टीम पुर्ण घराची आणि आजुबाजूची झडती घेत जेव्हा कॉम्प्यूटर भोवती जमली, तेव्हा कॉम्प्यूटरवर बसलेलेल्या एक्सपर्टपैकी एकजण इन्स्पेक्टर कंवलजितला म्हणाला,

'' सर यात तर काहीच नाही आहे''

'' घरातही काहीच सापडत नाही आहे'' टीममधील एकजण कुरकुरल्यागत म्हणाला.

'' काही असेल तर सापडेल ना ... मला वाटतं तुम्ही चुकीच्या घरात आले आहात'' अलेक्स मधेच बोलला.

'' व्यवस्थित बघा.. त्याने हार्डडिस्क फॉरमॅट केली असेल तर आपले रिकव्हरी टूल्स रन करा '' इन्सपेक्टर म्हणाले.

'' यस सर'' त्यातला एक कॉम्प्यूटर एक्सपर्ट म्हणाला.


टिममधील काही पोलिस अजुनही घरातील सामान उलटून पुलटून पाहात होते. तेवढ्यात एक पोलिस तिथे इन्स्पेक्टरजवळ एक बॅग घेवून आला. त्याने बॅग उघडली तर आत कपडे होते. त्याने कपडेही बाहेर काढून पाहाले पण आत विषेश असं काहीच नव्हतं.

'' बघा ... घरातला कोपरानकोपरा पिंजून काढा...'' इन्स्पपेक्टर त्यांना निराश झालेलं पाहून त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने म्हणाले.

'' यस सर'' तो पोलिस म्हणाला आणि पुन्हा घरात धुंडाळायला लागला.

तेवढ्यात कॉम्प्यूटर एक्स्पर्टचा उत्साहीत स्वर गुंजला '' सर सापडलं ''

सगळेजण आपापली कामे अर्धवट सोडून कॉम्प्यूटर भोवती जमा झाले. आणि ते कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे आशेने पाहू लागले. त्यातल्या सिनियर कॉम्प्यूटर एक्सपर्टने कॉम्प्यूटरवरील एक फाईल ओपन केली. कदाचित त्याने ती रिकव्हरी टूल्स वापरुन रिकव्हर केलेली असावी. ती फाईल म्हणजे ब्लॅकमेलरने पहिल्या मेलमधे अंजलीला पाठविलेला अंजली आणि विवेकच्या प्रणयाचा फोटो होता. इन्सपेक्टरने एक अर्थपुर्ण रागीट नजर बाजुला उभ्या असलेल्या आणि अरेस्ट केलेल्या अलेक्सकडे टाकली. दोघांची नजरा नजर झाली. अलेक्सच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव केव्हाच उडून गेले होते. त्याने मान खाली घातली. इन्स्पेक्टरने त्याच्या साथीदाराला इशारा करताच तो पोलिस अरेस्ट केलेल्या अलेक्सला बाहेर घेवून गेला. अलेक्स मुकाट्याने काहीही प्रतिकार न करता त्या पोलिसाच्या मागे मागे चालायला लागला.

अलेक्सला त्या पोलिसाने तिथून बाहेर नेताच इन्स्पेक्टर कंवलजितने आपला मोबाईल लावला -

'' अंजली गुड न्यूज... ''


क्रमश:...  


Read Samaj Storis ( Please Add Skeep ) .............

No comments:

Post a Comment