Friday 15 March 2013

CH 26 पहिलं बक्षीस


अनघा जशी स्टेजवरुन खाली उतरुन आपल्या जागेवर परतली ऍन्करने पुन्हा माईकचा ताबा घेतला,

'' आता शेवटी आपण ज्या क्षणाची आतूरतेने वाट पाहत आहोत तो क्षण अगदी जवळ आलेला आहे... पहिलं बक्षीस जाहिर करण्याचा क्षण... इन फॅक्ट मी मला नशिबवान समजतो की पहिलं बक्षीस कुणाला जाणार आहे हे जाहिर करण्याचं भाग्य मला लाभलं आहे... कारण तो प्रतिस्पर्धी सपुर्ण भारतातला एक अव्वल दर्जाचा प्रतियोगी राहणार आहे... तर प्रथम आपण बघूया की पहिलं बक्षीस काय आहे... पहिलं बक्षीस आहे 3 लाख रुपए रोख, मोमेंटो ऍन्ड अ जॉब ऑफर इन नेट सेक्यूरा... ''

सगळेजण शांततेने ऐकत होते. जणू प्रत्येकाने त्या क्षणासाठी आपापले श्वास राखून ठेवून आता रोखले होते. कित्यनेकाने आपल्या माना उंचावल्या होत्या. हॉलमधे सर्वत्र पिनड्रॉप सायलेन्स होतं....

'' फर्स्ट प्राईज गोज टू ... द वन ऍन्ड ओन्ली वन... मि. अतूल बिश्वास फ्रॉम चेन्नई ...''

दुसऱ्या रांग विस्कळीत झाल्यासारखी जाणवली कारण दुसऱ्या रांगेतून कुणीतरी उठलं होतं. सगळ्याच्या माना त्या दिशेने वळल्या. यावेळी हॉलमधे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात दिर्घ टाळ्यांचा कडकडाट झाला. खरंच त्याचे यश त्याच्या नावाला साजेसे असे अतूल होते. तो उठून जवळ जवळ धावतच स्टेजवर गेला, यावरुन त्याचा अपूर्व उत्साह आणि दांडगा आत्मविश्वास जाणवत होता. गोरा, उंचपुरा, स्मार्ट, पिळदार शरीर असा तो सशक्त यूवक होता. अंजलीने त्या आपल्या दिशेने येणाऱ्या पहिल्या बक्षीसाच्या हकदाराकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर एक तेज होते. डोळे निळे आणि बोलके होते. त्याच्या डोळ्यात पाहून क्षणभर अंजलीला विवेकची आठवण झाली. पण आपल्या भटकत्या विचारांना झटकून ती त्याला सामोरी गेली. तो अंजलीसमोर जावून उभा राहाला आणि त्याने प्रेक्षंकाकडे पाहून प्रेक्षकांना अभिवादन केले. आधीचा टाळ्यांचा कडकडाट जो अजून पुरता ओसरलाही नव्हता त्याने पुन्हा जोर धरला. प्रेक्षकांना अभिवादन करुन त्याने अंजलीकडे पाहाले आणि त्याची नजर अंजलीवरुन हटण्यास तयार होईना, जणू तो तिच्या मदहोश करणाऱ्या पाणीदार डोळ्यांमधे अडकून पडला होता. टाळ्यांचा कडकडाट अजूनही सुरुच होता. पण अचानक एक विचित्र घटना घडली, अंजलीने जेवढ्या जोराने शक्य होईल तेवढ्या जोराने अतूलच्या कानशिलात एक लगावून दिली आणि तो भानावर आला. हॉलमधील टाळ्यांचा कडकडाट एकदम थांबला होता. त्याने आणि तेथील दुसऱ्या कुणीही अपेक्षा केली नसेल अशी ही विचित्र घटना होती. हो अंजलीने त्याच्या गालात एक जोरदार ठेवून दिली होती. त्याचाच काय संपूर्ण सभागृहाचा विश्वास बसत नव्हता. हॉलमधे एकदम श्मशानवत शांतता पसरली.. एकदम पिनड्रॉप सायलेन्स.

'' यस आय स्लॅप्ड हिम... ऍन्ड ही डीजर्व इट... कारण हा एक क्रॅकर आहे... नुसता क्रॅकरच नाही तर ही इज आल्सो अ ब्लॅकमेलर...'' सभागृहात शांतता भंग झाली ती अंजलीच्या या शब्दांनी.

अंजली भराभरा बोलत होती. तिच्या डोळ्यात आग होती. रागाने अंजलीचं सर्व अंग थरथरत होतं. तेवढ्यात इन्स्पेक्टर कंवलजीत, जे आधी तयारीतच होते, ते डायसवर दोन कॉन्स्टेबल सोबत आले. त्यांनी प्रथम अतूलची कॉलर पकडून दोन तिन त्याच्या कानशिलात लगावल्या

'' इन्स्पेक्टर '' अतूल गुरगुरला.

त्याच्या निरागस, लोभस चेहऱ्याने आता उग्र रुप धारण केले होते. त्याला मारलेल्या चपराकींमुळे लाल झालेला चेहरा त्याच्या उग्रतेत अजूनच भर टाकत होता. इन्स्पेक्टरने जास्त वेळ न दवडता त्याला हातकड्या घालून अरेस्ट केले आणि ते रागाने खेकसले, '' टेक दिस बास्टर्ड अवे...''

कॉन्स्टेबल त्याला घेवून जवळ जवळ ओढतच तिथून निघून गेले. त्याची गुर्मी अजूनही उतरलेली दिसत नव्हती. तो तिथून जातांना वळून रागाने कधी इन्स्पेक्टरकडे तर कधी अंजलीकडे पाहत म्हणत होता.

'' लक्षात ठेवा मला अरेस्ट करणं तुम्हाला महाग पडणार आहे '' जाता जाता तो कडाडला.


क्रमश:... 



Read Udan Stori ( Please Add Skeep ) .........................

No comments:

Post a Comment