Sunday 3 February 2013

एक हवाई सुंदरी होती,

एक हवाई सुंदरी होती,
ती दिसायला तर सुंदर होतीच
पण त्यापेक्षाही सुंदर
तिची आपल्या नवर्यावर प्रेम
करण्याची पद्धत
होती .............. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात
असे तेव्हा तेव्हा ती रोज एक
गुलाबाचे फुल
आपल्या नवर्याला पाठवत असे,
आणि जाणवून देत असे
कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच
आहे ....................
ती दुसरीकडे
असताना तिच्या रोज
येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद
सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे
सुंदर प्रेम देवालाही आवडले
असावे म्हणून कि काय पण देवाने
तिला आपल्याकडे बोलावून
घेतले, तिच्या विमानास
अपघात झाला आणि बिचारी आपले
प्राण गमावून
बसली .....................
हि बातमी ऐकून
तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात
तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके
कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते
तर आता सुरु झाले होते,
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील
रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य
चकित झाला व ह्या मागाचे
कारण शोधण्यासाठी त्याने
रोज फुल घेऊन येणार्या मुलास
विचारले तिचा नवरा :- तुला हे फुल कोण
देत नक्की, माझी बायको मरून
१५ दिवस झाले तरी तू रोज फुल
आणून देत आहेस, नक्की प्रकार
काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप
प्रेम करते,
तिची विचारशक्ती खूप
पुढची होती, म्हणून तिने आधीच
विचार करून ठेवला होता कि,
"जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण
प्रेमाला कधी संपवायचे नाही"
आणि ह्या विचाराने तिने
मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले
आहेत जेणे करून आयुष्यभर
ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....
आणि तिचे नसणे
सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव
करून देईल.

No comments:

Post a Comment