Friday 15 February 2013

स्टोरी facebook

एक माझी प्रेम कथा , मी काही लेखक नाही त्यामुळे काही चुका झाल्यास समजून घ्यावे हि विनंती ...
माझी आणि तिची ओळख facebook च्या माध्यमातून झाली , तिचा कॉम्पुटर चा cource झालेला आणि माझे MBBS चालू होते भारताच्या बाहेर , ती माझ्याच जातीची , आमचे बोलणे व्यायचे एका वर्षापूर्वी माझ्या काही घरातल्या भांडणामुळे मी झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आणि त्यातून वाचलो, हे तिला माहित होते तिने मला ख्युप समजाविले आणि तिची शप्पथ दिली कि पुढे असे काही करायचे नाही आणि काही प्रोब्लेम असेल तर निसंकोच मला सांगायचे , तिने असे सांगताच मला स्वताला खूप खूप चांगले वाटायचे , ती २३ वर्षाची सेल्फ confident आणि मनाने mature , सर्व condition समजणारी आणि कधी कधी माज्याशी लहान लहान गोष्टी मध्ये भांडताना रागवताना ४-५ वर्षाच्या मुली सारखी वागायची , म्हणायची कि मला जेव्वा जास्त राग येतो किव्वा हसू येते तेव्वा मला काटावे वाटते , आणि मी म्हणायचो जितके वाटले तितके काट मला , तिला मी विचारले कि जर आपल्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला तर माझ्याशी पळून लग्न करशील का ? तर ती म्हणायची कि जर आपल्या लग्नाने कुणी दुखी होत असेल तर आपण सुखी नाही राहू शकत , तिला एक लहान बहिण खूप चांगली मानाने पण स्वभावाने चंचल , ती म्हणायची कि मी जर काही जागा वेगळे केले तर
तिचे काय होईन , आणि आई वडिलांचे काय होईन !! माझ्या घरी सर्व जन चांगले पण आम्ही तिच्या इतके श्रीमंत नाही (वडिलांकडे property भक्कम पण बँक balance नाही ), माझे शिक्षण कशे तरी चालू होते , असेच काही कारणांनी ती मला भेटण्याच्या पहिले मी माझी kidney donate(sell ) करण्याचा निर्णय घेतलेला , मी असेच तिला सांगितले कि मी असे करणार होतो तर तिने मला तिची शपथ दिली आणि वाचन घेतले कि असे काही करायचे नाही, आम्ही इंटरनेट च्या माध्यमाने नेहमी संपर्कात असायचो पासून ते रात्री पर्यंत, तिने माझी नेहमी काळजी घेतली जेव्वा जेव्वा मी संद्याकाळी झोपायचो तर माझी सवय मोडली आणि म्हणायची कि संध्याकाळी झोपू नये, खूप प्रेम करायची माझ्यावर , जुन मध्ये मला सुट्ट्या लागल्या आणि मी भारतात आलो तिने खूप वाट पहिले होती माझी येण्याची , जशे प्रत्येक couple मध्ये लहान सहान तक्रार चालतातच तश्याच आमच्या मध्ये पण होयाय्च्या आणि आम्ही ते solve पण करायचो .. मी अखेर भारतात आलो आणि भेटलो आणि लग्नाच्या तयारीला लागलो , मी माझ्या भैय्या आणि वाहिनीला भेटविले त्यांना ती पसंद पण आली , आणि माझी ती पहिल्या पासून पसंद होती , परंतु काही कारणाने काही गैरसमजाने त्यांनी काही दिवसांनी थोडी नाराझी दर्शविली , मी खूप नाराज झालो खूप रडलो आणि bhandlo सुद्धा ,मी वडिलांना सांगू शकत होतो पण त्यांनी love marraige नाव दिले असते आणि तिच्या वडिलांना love marraige ला विरोध होता , आणि नंतर होणार्या problems मला माहित होत्या,मला वाटायचे कि मी कधी तिच्याशी लग्न केले तर आणि घरच्यांनी मला नंतर विरोध केला तर मी तिला कुठे घेऊन जाणार आणि तिची परेशानी कशाला करू मी .. तिनेच मला शांत केले आणि सांगितले कि मी तुझी आहे , आपण काही न काही तोडगा काढू आणि मी तुझी वाट बघू शकते तू तुझी study पूर्ण कर मी तुझीच आहे , आणि माझे घरचे म्हणायचे कि तुझे शिक्षण चालू आहे आणि कसे जमणार ,माझे नाईलाज होते कि माझ्या पायावर उभा नाही , माझे घरचे कि पहिली study पूर्ण कर मग तुझ्या मना प्रमाणे लग्न कर , आणि तिची व्यथा कि तिचे घरचे लग्ना करता तिला परेषण करत असत, ती म्हणायची कि जसा वेळ जातो तशी माणसे बदलतात तू पण बदलशील , मी म्हणायचो कि काही पण झाले तर मी नाही बदलणार मी जसा आज आहे तसाच उद्या राहणार , मी तिला सांगितले कि तुझ्या मानाकरता आपण मंदिरात किव्वा court मध्ये लग्न करूया , पण ती बोल लि कि काही नाही आपण चांगले लग्न करू मी आहे तुझ्या बरोबर .. मग असेच दिवस गेले , ति जन्म जात गर्भ श्रीमंत, पण ते हुंडा च्या विरोधात आणि मी माझा माझ्या प्रोब्लेम मध्ये , तिला वाटायचे कि तिला इतक्या मागणी येतात तर ते मनाने चांगले आहेत पण तिची चुकी कि ते सर्व पैश्यान कढे बघत होते, एक मुलगा होता ते तिच्या माघे पडले होते २ वर्षापासून कि लग्न कर होकार दे , तिने मला पहिलेच तिच्या बद्दल सांगितले होते , पण ती म्हणायची कि तो मुलगा इतका चांगला नाही , मी त्याच्याशी लग्न करण्या पेक्षा विहिरीत जीव देईन ,तिच्या घरात थोडे problem असायचे हिच्या लग्न मुले आई वडिलांमध्ये लहान भांडणे व्यायचे , हि मानाने चांगलो भोळी नाजूक परी हि स्वतालाच दोष द्यायची , मग काही दिवसाने तिने मला सांगितले कि माझे लग्न जुळल आणि काही दिवसाने साखरपुडा आहे , मी काय बोलावे आणि काय नाही मला काही समजलेच नाही , मी तिला नाव विचारले पण ती बोल लि कि समजेल , मी स्वतालाच दोष देत होतो आणि मनाला समजावत होतो कि तिला माझ्या पेक्षा चांगला मुलगा भेटला असेन म्हणून तिने होकार दिला , मग एका दिवशी मी तिला विचारले कि नावसांग पण नेहमी प्रमाणे तिने काहीच नाही सांगितले , मी सरळ तिच्या relative ला फोन केला आणि विचारले त्यांनी सांगितले त्या मुलाचे नाव आणि नाव ऐकताच माझी बोलती बंद झाली , कारण कि तो तोच होता ज्याला तिने पूर्वी नकार दिला होता, मी खूप रडलो पण मी काय करू शकत होतो !! मी तिला समजाविले कि नको असे करू तो चांगला मुलगा नाही , जर चांगला असता तर तू केव्वाच लग्न केले असते , पण ती मजबूर ती म्हणाली कि आता अशे होऊ शकत नाही , तिने मला राग येण्याकरता खूप काही बोल ले शिव्व्या दिल्या , पण मला माहित होते कि ती रागात आहे म्हणून मी काहीच नाही बोल लो आणि माझ्या मी तयारीला लागलो, मी तिच्याशी बोलत राहिलो ती रागावली मी तिला समजावत राहिलो , मी माझ्या घरी पप्पा ना सांगितले ते म्हणाले कि खूप उशीर झालाय आता , मी सतत रडत होतो पण मी एकटाच होतो , काय करावे आणि काय करू नये काही काळत नवते, ति मला राग रागात बोल लि कि तुझ्या कडे पैशे नाहीत आणि त्याच्याकडे पैसे आहेत, मी तिला सांगितले कि मी तुला पैसेआणून देईन आपण करू काही न काही , माझ्या मते कि मला तिचा राग यावा ह्या करता ती बोल लि मला अशी , मी १० दिवसात पैश्याचे बंदोबस्त करण्या करता भारताच्या बाहेर गेलो एकटाच, एक ४५ वर्षीय मुलगी आहे ती खूप आजारी होती तिची kidney खराब झाली hoti , मी तिथे गेलो आणि मी माझी स्वताची kidney तिला दिली सर्व चाचण्या केल्या आणि transplant झाले , कि तिथे एकटाच २ दिवस त्रासाने परेशन पण नाईलाज होता , operation नंतर ५ दिवस icu मध्ये राहावे लागते आणि १० दिवस general वार्ड मध्ये राहावे लागते मी फक्त ३ दिवस राहिलो आणि परत भारतात आलो तसाच , मी तिला सांगितले कि थोडेच दिवस बाकी आहेत तुझ्या लग्नाला मी सर्व manage करेन पण तिने काही पण नाही ऐकले , मी तिला माझ्या प्रेमाची भिक मागितली कि शोना असे नको करू , माझ्या कडे पैशे आहेत मी तुला कुठे पण घेऊन जाईन , मी तुझ्या आई वडिलांना समजून सांगेन त्यांच्या पाया पडेन माझे घरचे पण बरोबर येतील ते पण सांगतील requst करतील आणि कोणते पण आई वडिलांना वाट ते कि आपल्या मुलीला चांगला मुलगा भेटला पाहिजे, मी दारू सिगरेट पीत नाही जर तुझी साथ असेल तर एका kidney वरती संपूर्णजीवन जगेन नसता थोड्या दिवसात जाईन .. तिने काही ऐकले नाही फक्त बोल लि कि तुम्ही मारण्याच्या गोष्टी करू नका मला चांगले नाही वाटत , पण मी लग्न नाही करू शकत , मी माझ्या घरी माझ्या bandage दाखवल्या सगळे रडले आणि आता रडून काही उपयोग नवते कारण जे होण्याचे होते ते झाले .... त्यांनी त्यांना जे शक्य होते ते केले पण माझे घरचे तिचे नाव सर्वाना सांगून त्यांची बदनामी करू इच्छत नवते, मी ठरवले कि तिच्या आई वडिलांना भेटायचे पण आम्ही तिच्या काका न भेटलो आणि थोडे फार सांगितले त्यांनी सांगितले कि मी मुलीला विचारेन जर तिने होकार दर्शविला तर आपण काही करू , त्यांनी तिला बोलावले आणि त्यांच्या परीने विचारले तिने स्पष्ट नकार दिला कि माझे असे काहीच नवते आणि सर्व खोटे आहे, ती माझ्याशी फोने वरती बोललि पण राग राग ने , माझ्या बहिणीने तिला समजाविले माझ्या वडिलांनी तिला बोल ले लेकी असे ठीक नाही जे आहे तू संग आपण सर्व ठीक करू , पण तिने नकार दिला ..... ती मला बोल लि कि इतक्या दिवस झोपत होते का , मलाच प्रश्न पडतो कि मी हॉस्पिटल मध्ये होतो मी माझी life कमी केली , जिच्या करता सर्व काही केले तीच म्हणत आहे कि झोप काढत होता कि काय ?? मित्रांनो मी हरलो जगातून काय करावे जगावे किव्वा मरावे हेच सुचत नाही, आता माझी परिस्थिती अशी आहे कि न मी कुणा बरोबर लग्न करू इच्छितो न हि कुणी आई वडील मला मुलगी देतील , मी फक्त जगणे आहे म्हणून जगतोय आणि देव जवळ प्रार्थना कि जशी माझी गत झाली तशी कुणाची नको होऊ देऊ , देव तिला सुखी ठेव जिथे पण ठेवशील तिथे , कधी तुमच्यात हिम्मत नसेल तर कुणाला खोटे आश्वासने कधीच देऊ 
नका तुम्हाला कुणी भेटेन पण दुसरा समोरचा व्यक्ती जीवनातून जाईन , कधी पण कुणाच्या भावनाशी खेळू नका , मी आज आहे उद्या नाही , पण नेहमी एकाच मनामध्ये   

असेन कि तिने थोडीशी हिम्मत ठेवायला पाहिजे होती , पैसा खूप काही आहे पण सर्व काही नाही , आज तिचे लग्न आहे आणि नेहमी प्रमाणे माझ्या शुभेच्चा तिच्या बरोबर आहे , पण जर कधी आयुष्यात तुला गरज असेल तर निसंकोच सांग मी इथेच आहे जिथे तू मला सोडून गेली ..
आणि हे तुझ्या करता शोना

तुने मेरे जाना कभी नही जाना दर्द मेरा इश्क़ मेरा .......

- माझाच एक मित्र ♥

No comments:

Post a Comment