Sunday 17 February 2013

गमतीदार उखाणे - Funny Ukhane

                                  गमतीदार उखाणे - Funny Ukhane

 

आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..



आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार


सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

 

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.


मोठा मुलगा श्मभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी


सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा

 

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी


गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,


भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...च्या जीवावर करते मी मजा


झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला

 

सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?

डाळित डाळ तुरिचि डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात

5 + 4 इज इक्वल टु नाइन
..... इज माइन

गोव्याहून आणले काजू
गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु

 

उखाणे --- कुलवधू  (zee मराठी वरील मालिका)

देवयानी :
कधी सरळ चाले कधी उलटा वळॆ एकदम
काय म्हणू सांगा याला विक्रम की चक्रम

प्रिय दर्शिनी :
स्वतःला म्हणवून राजे, चालतात उंटासारखे तिरके
फ़ुटक्या माझ्या नशिबी आले रणवीर राजेशिर्के 

रागिणी :
तळ्यामधल्या चिखलात जणू उगवलय कमळ
राजेशिर्के असून देखील नील माझा निर्मळ

साक्षी :
काय सांगू तळोबा वाटे मला लाज
असा कसा अतिरेकी झाला माझा राज   
 
 

No comments:

Post a Comment