ही कथा आहे त्या काळातली ज्या काळात
मनोरंजनासाठी टी.व्ही.वगैरे नव्हता.त्यावेळी फक्त होता रेडीओ.रेडीओवर
लागणारे कार्यक्रम खुपच लोकप्रिय होत असत.त्या काळी एखाद्याच्या घरात रेडीओ
असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं.गौरी ही
अशाच मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी होती.जिचं वय 17च्या आसपास आहे.ती एक
खेड्यातील मुलगी आहे।हे साल होतं 1945.त्यांच्या घरात एक छोटासा रेडीओ
आहे.त्यावर लागणारे कार्यक्रम गौरीला आवडायचे.पण त्यापैकी सकाळी सात वाजता
लागणारा गाण्याचा कार्यक्रम तिला खुप आवडायचा.कारण सिनेमातली गाणी तर
त्यावर लावली जायचीच,पण कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाचा सुत्रधार
ज्याला पार्थ या टोपण नावाने सगळे ओळखायचे,तो गाणे म्हणायचा.त्याचा आवाज
इतका सुंदर होता की गौरी फक्त त्याचेच गाणे ऐकण्यासाठी तो कार्यक्रम
ऐकायची.तो कार्यक्रम लागला की सर्व कामं सोडुन ती तो ऐकायची.त्याचा तो गोड
आवाज ऐकल्याशिवाय तिला चैनच पडायचं नाही.तिची आई तर खुप ओरडायची तिच्या
नावाने.आणि एक दिवस याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोषणा झाली की,मित्रांनो
आज हा या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारीत होतोय.त्यामुळे आज मी गाणारं
गाणं हे कदाचित तुम्ही माझ्या तोँडुन ऐकणारं शेवटचं गाणं असेल.हे ऐकताच
गौरीची खुपच निराशा झाली,तिच्या डोळ्यातुन पाणी आलं.कारण त्याच्या आवाजा
पलीकडे जाऊन तिचं त्याच्यावर प्रेम जमलं होतं.जे तिला कधी कळलंच नाही.आणि
हेच प्रेम तिच्या डोळ्यातुन अश्रुरुपात वाहत होतं.त्याचा आवाज ऐकायला मिळत
नसल्याने ती खुपच उदास दुःखी व्हायची.एक दिवस न राहुन त्याला भेटण्यासाठी
ती पुण्याला निघुन गेली,त्या रेडीओच्या कार्यालयात गेली खरं पण त्या
लोकांना सुद्धा त्याच्या पार्थ या टोपण नावाशिवाय काहीही माहीती
नव्हतं.तीची निराशा झाली.ती जेव्हा घरी परत आली तेव्हा तिचे आईवडील खुपच
चिडले होते.आपली मुलगी दोन दिवस झाले हरवलीय अशी तक्रार त्यांनी पोलीस
स्टेशनमध्ये केली होती.ती परत आल्यावर तिच्या आईने तिला खुपच मारले.तिच्या
आईवडीलांनी पुण्यातल्याच एका चांगल्या कुटुंबात तिच्या मनाविरुद्ध तिचं
लग्न लावुन दिलं.त्या दोघांच्यात आठ वर्षांचं अंतर होतं.मुलगा एकदम साधा होता पण हुशार होता.लग्नानंतर ती त्याला कधीही स्वतःला हात लावु द्यायची नाही,आणि त्यानेही कधी तिच्यावर तश्या प्रकारची जबरदस्ती नाही केली.त्या एकमेकांचे संवाद फक्त जेवढ्यास तेवढेच असायचे.तु असं का करतेस असं एक शब्दानेही त्याने तिला कधीच विचारलं नाही.त्यांच नातं म्हणजे दोघांसाठी फक्त एक औपचारिकताच होती.कधी कधी तर ते बोलायचेच नाही.तो तिची खुप काळजी घ्यायचा,तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणुन विचारपुस करायचा ती जेवढ्यास तेवढीच उत्तरे द्यायची.एक दिवस तो काही कामानिमित्त मुंबईला गेला होता.पण दोनच दिवसांनी त्याचा अॅक्सिडँट झाल्याची बातमी तिच्या कानावर आली,तिचे सासु सासरे व आईवडील तडख मुंबईला निघाले.जेव्हा त्यांनी त्याला पाहीले तेव्हा त्याचे आईवडील खुपरडले,कारण त्याचा शव पाहण्यासाठी काही उरलंच नव्हतं.त्याने घेतलेल्या काळजीपोटी का होईना तिच्या डोळ्यातही दोन थेँब पाणी आलं....काही वर्षे अशीच निघुन जातात...गौरीला तिच्या नवर्याची जरासुद्धा आठवण येत नाही....पण पार्थच्या त्या गोड गाण्यांची आठवण अजुनहि तिच्या मनात भरलेली आहे.ती तीच्या भुतकाळातच गुरफटुनबसलीय... कदाचित तिलाच त्यातुन बाहेर यायचं नाहीये....पन्ना स वर्षानंतर...... ..
तीचे सासु सासरे मध्यंतरी नियतीच्या नियमानुसार वय झाल्यामुळे देवाघरी निघुन गेले.ती आपल्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी जेव्हा घराची सफाई करत असते...तेव्हा तिच्या नवर्याच्या वैयक्तिक कपाटाच्या तळाशी तिला काही कागदपत्रे सापडतात.ते पाहुन ती तर बेशुद्धच पडली...तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पीटलच्या बेडवर पडलेली होती तिला सलाईन लावण्यातआलं होतं.तिच्या शेजार्यांनी तिला तिथे आणलेलं असतं.त्या कागदपत्रातील एक कागद तिने तिच्या हातात तसाच घट्ट पकडलेला असतो.तो कागद दुसरं तिसरं काही नसुन पार्थला त्याचा शेवटच्या दिवशी रेडीओ ऑफिसमधुन मिळालेलं प्रमाणपत्र असतं.आणि त्यावर तिच्याच नवर्याचा black & white फोटो चिकटवलेला असतो.त्याकडे बघुन ती पुन्हा पुन्हा रडत असते.ज्याच्यावर आपण आयुष्यभर डोळे मिटुन प्रचंड प्रेम केले तो तिचा सख्खा नवरा होता.पण प्रत्यक्षात त्याला कधीही माझ्या प्रेमाचा वाटेकरी होऊ दिलं नाही... याचीच खंत तिला मरणापर्यँत राहील.....
मित्रांनो
माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे,प्रत्येकाचं प्रेमज्याच्या
त्याच्याजवळच असतं त्याला ओळखुन त्याच्यावरच प्रेम करा नाहीतर,आयुष्याच ्या
शेवटी हॉस्पीटलमधल्या पलंगावर पडलेले असताना तुम्ही,जगलेल्या आयुष्याची
जेव्हा गोळाबेरीज करत असाल,तेव्हाच तुम्हाला कळेल की सुख फक्त एका पावलावरच
होतं पण तेपाऊलही पुढे टाकण्याची हिँमत मी दाखवली नाही.आणि जन्मभर दुःखाला
कवटाळुन बसलो........... ...मित्रांनो या कथेतुन मला तुम्हाला काय
सांगायचंय ते काळजीपुर्वक समजुन घ्या.........कथालेखक अवि
No comments:
Post a Comment