Friday 8 February 2013

लग्नातील उखाणे

दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड…

दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड,
x x x रावांच्या गुणापुढं दागिन्यांचा काय पाड. 



कांचेचं घंगाळ, गुलाबाचं पाणी,…

कांचेचं घंगाळ, गुलाबाचं पाणी,
x x x रावांचं नांव घेतें मोहनराणी. 

करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी…

करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी
x x x रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी.



वाण घेतां घेतां माथ्यावर आलं ऊन…

वाण घेतां घेतां माथ्यावर आलं ऊन
x x x रावांना सांगतें राहावं जपून.



दारापुढें ओटा, ऒटयावर लावली तुळस…

दारापुढें ओटा, ऒटयावर लावली तुळस
x x x रावांच्या घरीं होईल संसार सुखाचा कळस.

No comments:

Post a Comment