Wednesday 30 January 2013

LOVE STORY:- तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...

आदि आणि शैलजा हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आदि हा शैलजावर खुप प्रेम करतो, हे शैलजाला माहीती आहे पण, शैलजाला आदिच्या मैत्रीमध्येसुद् धा काही interest नाहीये. पण एक दिवस आदिच्या या मैत्रीचा शेवट करण्यासाठी ती त्याला म्हणते, i m sorry aadi, मी तुझ्याशी मैत्री ठेवु शकणार नाही, cause u r so boaring person. मला तुझ्यासोबत खुपच बोअर होतं...

असं म्हणु नको शैलजा मला तुझी मैत्री हवीय,त


ी मी कशीतोडु. कसं सिद्ध करु की मी इतकाही बोअर नाहीये. ठीकेय एक संधी देते तुला, तु मला पुढची दहा मिनिटे तुझ्यासोबत कशाही प्रकारे रमवु शकलास तर मी मैत्री नाही तोडणार. तिची ही अट तो स्वीकारतो, आणि म्हणतो, ठीकेय मी तुला एक lovestory सांगतोः
विशाल नावाचा एक मुलगा होता. आजपर्यँत त्याने किती प्रेमप्रकरणे केलीत, त्याचेकिती breakups झाले हे त्याचं त्यालाच ठावुक नव्हतं. एक दिवस, तो सध्या ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा, तिला विशालच्या या स्वभावाची जेव्हा माहीती झाली. तेव्हा ती फारचदुःखी झाली. आणि तिने विशालशी breakup केला. प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने breakup केला होता. याआधी तर विशालच मुलींबरोबर breakup करायचा. तो न राहवुन आतुन खुपच हादरला गेला होता. कितीतरी मुलीँचे हार्ट आपण तोडलेत पण एखाद्या मुलीने आपलं हार्ट तोडल्यावर जे feel झालं ती feeling त्याच्यासाठी खुपच नवी होती. विशालला जाणीव झाली कि आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे केलं तेफारच चुकीचं होतं. पण आता माझं खरंप्रेम आहे आशा. आशाला मी हातची जाउदेणार नाही.
तो पुन्हा आशाच्या मागेमागे जाऊ लागतो, तिला सॉरी म्हणत असतो. पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो, त्यामुळे ती त्यालाभाव देत नाही. पण एक दिवस विशाल आशाला आडवुन विचारतो, आशा काय चाललंय तुझं? मी कितीदिवस झालं तुझ्याकडुन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागतोय, पणतु देत नाहीस. अगं तुच माझं खरं प्रेमआहेस, तुच माझं नशिब आहेस...बाकी कोणी नाही.
आशाः मीच तुझं नशीब आहे ना, ठीकेय देते तुला एक संधी, आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे, एक गार्डन, दोनकॉफीब ार आणि तीन समुद्रकिनारा यापैकी एका ठीकाणी मी आज संध्याकाळी सहा वाजता तुझी वाट पहात असेन. जर तुझ्या नशीबात मी असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तु मला भेटशील. by
असं म्हणुन आशा तिथुन निघुन जाते.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात.तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो.आण डोळे झाकुन एक ठीकाण निवडतो. जे त्याच्या मनाला भावणारं असतं.तो वेळेत घरातुन बाहेर पडतो।सहा वाजता आशा"समुद्रकिनार ी"त ्याची वाट पहात असते.भरधाव वेगानेतो गाडी मारत असतो.पण पुढे एका ठीकाणी ट्रॅफीक जाम झालेलं असतं.तो तिथेच गाडी लावुन धावत धावत जाऊ लागतो.शेवटी ठरवल्याप्रमाणे तो समुद्रकिनारीपोह ोचतो.पण ती तिथे नसते.कारण तो पोहोचेपर्यँत सात वाजलेले असतात.आणि ती निघुन गेलेली असते.पण विशालला वाटतं कि,कदाचित ती माझ्या नशिबातनाहीये.ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठीकाणावर माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिची वाट पाहतोय.थोड्यावेळानंतर तो दुःखी मनाने नशीबालादोष देत निघुन जातो. चार वर्षानंतर......
आज विशालचं लग्न आहे.त्यालाचांगली नोकरी ,चांगला पगार आहे.तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानेसिद्ध केलंय,कारण आईवडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशीच तो लग्न करतोय, आणि ते ही त्या मुलीला एकदाही न पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंचदुर्मिळ बाब आहे. काही वेळानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात.नवरा बायकोँसमोरचा आंतरपाट काढला जातो.तर काय आश्चर्य! ते दोघे दुसरेतिसरे कोणी नसुन, आशा आणि विशालच असतात. एकमेकांना चार वर्षांनी, आणि तेही अशा रुपात बघुन त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात.....पण स्वतःला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात.आणि पुन्हा एकदा नशीबाने घडवलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खुप खुप आभार मानतात...
.
आदिने सांगितलेल्या या lovestory मुळे शैलजा पुरती मोहुन जाते.तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात.थोडावेळ ती स्वतःला या कथेमध्ये पुर्णतः विसरुन गेलेली असते.ती डोळेपुसत म्हणते,खरंच आदि एका वेगळ्या जगात तु मला नेलं होतंस,मी खरंच खुप भावुक झाले.मला त्यां विशाल आणि आशाला भेटायचंय,कुठे मिळतील ते?कधी नेशील मला....आदिःते तुला माझ्या घरी मिळतील.कारण मी त्यांचाएकुलता एक मुलगा आहे,ते माझेच आई वडील आहेत.
हे ऐकुन शैलजाला काय बोलावेकाही कळतंच नव्हतं.मन अगदी सुन्न झालं होतं,ती म्हणते,खरंच तु खुप lucky आहेस.या गोष्टीनंतर तर तुझ्याबद्दल माझं मत पुर्णपणे बदललंय.तुझे ते आईवडील मला त्यांची सुन म्हणुन स्वीकारतील?काय तु मला तुझी solemate म्हणुन accept करशील? पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी,
तो होकारार्थी मान हालवित तिला आपल्या मिठीत घेतो.आणि थोडा वेळ तसंच ते एकमेकांची साथ अनुभवत राहतात....


मित्रांनो असं म्हटलं जातं की, ज्योड्या स्वर्गात बनतात. आपण त्या फक्त जुळवण्याचं काम करत असतो. जर तुमच्या आयुष्याचा दोर एखाद्याशी बांधला गेला असेल.तर तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...

No comments:

Post a Comment