Tuesday 7 April 2015

लक्ष्मी

वेळात वेळ काढून नक्की वाचलेच पाहिजे खूप शिकायला मिळेल
माझ्या ऑफिस जवळ एक
मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश,
भाषा कन्नडी, अनवाणी पायाने चालणारी !
तिला विचारले मी , काय करतेस तू ?
ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे .. झेड
पीच्या मराठी शाळेत ! मग म्हटल तू
डेली शाळा सूटल्यावर इथे काय करतेस ?
तर ती म्हणे ,
आई वडिलांची वाट पाहातेय् ! काय करतात आई
वडील ? मोठ मोठ्या बिल्डिंगा बनवतात !
तेव्हा मी ओळखले की हिचे आई वडील बिगारी आहेत
संध्याकाळी ते आई बाप आले तिला घेऊन गेले..
दुसरया दिवशी तोच सीन....बरेच दिवस
मी त्या मुलीशी बोलतेय....
तिच्या बोलण्यातुन एकच समजलय
मला ....की
तिच्या मते शाळा शिकल्यावर ....आपले
आई वडील जे बिल्डिंगा बांधतात ना ,
तश्या बांधाव्या नाही लागणार.....तर त्यात
राहणार्या मानसांसारखेच आपणही त्यात
रहायला जाऊ .....
ओह !!! केवढा दुर्दम्य आत्मविश्वास
आलाय शिक्षणाने त्या चिमुकलीच्या जीवनात !
वाह ! मान गये उसको !
तिच्याकडे शाळेत
पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक
बाटली दिली ....एक चप्पल जोड दिला फार आनंद झाला तीला .
परवा ती मला रडताना दिसली... मी म्हटलं काय
झाले ग लक्ष्मी ?
तर ती म्हणे तुंम्ही दिलेली बाटली हरवली/
चोरीला गेली..... मी म्हटले अग मग त्यात रडायचं
कशाला ? दूसरी देते तुला ! ती थोड़ी सुखावली ...
तिला पुन्हा एक बाटली दिली.. तिने मुकाट्याने
घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..
आज ती पुन्हा आली माझ्याकडे , आता म्हटले काय
झाले ? तर ती म्हणे काही नाही ,
बाटली द्यायला आलेय..!
मी म्हटले का ग ? काय झाले ? तर
ती म्हटली की माझी पहीली बाटली सापडली....
तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी ...
मी म्हटले राहुदे ग... पहिली खराब झाली की येईल
तुला उपयोगाला !
पण तिला नाही समजले माझे बोलणे........
बाटली माघारी दिलीच तिनी...माझे डोळे नकळत
ओले झाले अन तिला एक वही दिली ,
ती पण नाही घेतली तिने......
मी म्हटले का ग ? तर
ती म्हटली ह्या वर्षाला लागणार्या वह्या आहेत
माझ्याकडे !!!!
ओह !!!
काय समज आणि काय संस्कार
आहेत !! ग्रेट वाह !!
असो ... धरण भरले की त्यातून पाणी सोडून
देतात...जनावरे पण एका वेळी हवं तेवढच खातात....
पण
शिकली सवरलेली माणसे मात्र
अधाश्यासारखी साठवत जातात...
किती टेम्पो नोटा कमावल्या म्हणजे आपण शांत अन
सुखी होणार आहोत ??
स्वता: ला बंधने घालणार आहोत की नाही ?
लक्षात ठेवा
माणसांपेक्षा मला ती लक्ष्मी अन तिचे अडाणी पण
संतुष्ट आई वडील खरे सुशिक्षित वाटतात,
सुखी वाटतात .
सलाम ! त्यांना मनापासून !!
                                                                                                          - वैष्णवी लोखंडे

No comments:

Post a Comment