Tuesday 7 April 2015

आठवणीतले प्रेम !

आपली ही गोष्ट दोन अशा व्यक्तींची आहे ज्यांनी आपले प्रेम कधीही व्यक्त केले नाही पण त्यांचे प्रेम अमर आहे हे जगाने मात्र मान्य केले. आपला नायक हा फक्त नावाने नायक आहे बाकी त्याच्या अंगी असा कोणताही गूण नाही कि ज्यामुळे त्याला नायक ही पदवी बहाल करता येईल. याउलट आपली नायिका ही अगदी एखाद्या हिंदी पिच्चर मधील हिरोईन दिसते तितकी किंवा त्याहूनही अजून सूंदर व सोजळ आहे. अशा या दोन अगदी उलट विश्ववृत्तांची भेट होते ती ऐका काॅलेज मध्ये जेथे हे दोघेही पदवी संपादन करत होते. एकाच क्लासमध्ये असून सूध्दा अजून नायक आणि नायिकेची भेट झाली न्हवति पण लवकरच हा क्षण येणार होता आणि अगदी तसेच झाले काही दिवसांनी नायकाला काॅलेजच्या आवारात एक आयकार्ड सापडले. नायकाला सापडलेले आयकार्ड हे योगा-योगाने नायिकेचेच होते. नायकाने ते आयकार्ड नायिकेला दिले आणि त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि मग काय जस एखादा भुंगा फूलाच्या मागे फिरतो तसा तो क्लासरूम , कॅनटिन व लायब्ररी जेथे त्याने परिक्षेच्या काळात देखील पाय टाकलेला नसतो अशा ठिकानी देखील तो तिचा अगदी सावली सारखा पाटलाग करत असतो. त्याला असा आपला पाटलाग करताना पाहून तिला देखील त्याच्या मनातील भावना जाणवलेली असते व तिची देखील काही अशीच भावना असते. पण दोघेही आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात. आपला नायक हा मूलींशी बोलण्याच्या बाबतीत थोडा घाबरट असतो आणि त्यामुळे तो एखाद्या टिपीकल मूलासारखा त्याचे प्रेम तिच्याजवळ व्यक्त करू शकत नव्हता. अखेर काॅलेजच्या शेवटच्या वर्षी त्याने ठरवले कि आपले प्रेम तिच्या समोर जाहीर करायचे व रोज साकाळी उठताना तो हाच निश्चय करतो की आज तरी मी माझे प्रेम तिच्या जवळ व्यक्त करीन पण तिच्यासमोर जाताच ती नाही बोलली तर मग काय या भितीने शब्द कधी त्याच्या तोंडातून बाहेर पडतच नाहीत.असे हे त्याचे अथक प्रयत्न चालू असताना अचानक एके दिवशी नायिका काॅलेज सोडून निघून गेली. नायकाने तिला सोधन्याचा खूप प्रयत्न केला पण आखेर त्याच्या हाती निराशाच लागली. पुढे तो त्याच्या करियर मध्ये व्यस्त झाला असला तरी तो त्याचे पहिले प्रेम कधी विसरू शकला नाही. तो तिची आठवण स्वतःच्या मनातून कधी पुसू शकला नाही. अशाप्रकारे तीन वर्षांचा काळखंड उलटला. पुढे त्याला काही कारणास्तव कोलकत्त्याला जायला लागले जेथे एक सेमिनार अटेंड करत असताना त्याची नजर एका मूलीकडे गेली व तिला पाहताच त्याच्या भूवया उंचावल्या आणि नकळतच तोंडावर एक स्मित हास्य उमटले कारण ती आणखी कोणी नसून आपली नायिकाच होती. तिने देखील त्याला पाहीले होते पण तरीही ती त्याच्याकडे दूर्लक्ष करत होती कारण तिला अस वाटत होत की तो तिला विसरला असेल. अखेर आपला नायक तिच्या जवळ जातो व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती मात्र त्याला टाळतच असते कारण तिला त्या जून्या आठवणी पून्हा खणवून काढायच्या नसतात. आपला नायक आत्ता मूलींशी बोलायला तितका घाबरत नसल्यामूळे किंवा काॅरपोरेट सेक्टर मध्ये काम करताना शिकलेल्या निलाजरेपणा मूळे कि कास पण तो स्वतःच तिच्या जवळ जाऊन बसतो व तिला विचारतो "आेळखलेस का मला ? आपण दोघेही एकाच काॅलेमध्ये होते." अखेर ती देखील त्याच्या प्रश्नाला उत्तर देते " हो आठवल , तूम्ही तेच ना ज्यानी माझा हरवलेला आयकार्ड परत केला होता , तूम्हाला कशी विसरू शकते." हा होता त्याच्या दोघांतील  पहिला संवाद. पूढे दोघे काही वेळ एकमेकांशी असेच बोलत होते. नायकाने तिला अचानक मूंबई सोडण्याचे कारण विचारले असता तिच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून नायकाला आश्चर्य झाले व तो तिला म्हणाला जर तूला या आठवनींची त्रास होणार असेल तर तू मला नको सांगूस. त्यावर ती बोलते अस काही नाही मी सांगते तूला, "मी काॅलेजच्या लास्ट ईयर मध्ये असताना बाबांनी एका कार अॅक्सिडन्ट मध्ये त्यांचा प्राण गमावला व बाबांच्या शिवाय मला व आईला मूंबईसारख्या ठिकाणी सरवाईव करण कठीण होत होत म्हणून मी व आई कोलकत्त्याला शीफ्ट झालो. नायकाला हे एैकून खूप वाईट वाटले. पुढे त्याने तीच्या आईबद्दल विचारले तेव्हा त्याला कळले की तिची आईदेखील तिच्या वडिलांच्या दूखःमध्ये अचानक म्रूत्यू पावली व ती आता येथे एकटीच राहते. तिची ही परिस्थिती बघून नायकाला खूप वाईट वाटले व त्याने मनातल्या मनात तिची आयूष्यभर साथ देण्याचा निश्चय केला. खूप वेळ बोलल्यानंतर नायिकेने माझे काहीतरी अर्जंट काम आहे असे सांगून त्याचा निरोप घेतला पण जाता-जाता  ती तिची पर्स तेथेच विसरून गेली. नायकाला मात्र याचा खूप आनंद झाला होता कारण यामुळे त्याला पून्हा तिला भेटता येणार होते. त्याने ती पर्स उघडून बघितली असता त्याला त्यामध्ये तिचा पत्ता व काही पत्र सापडली त्यातील एक पत्र नायकाच्सा नावाचे होते जे नायिकेने काॅलेजमध्ये असताना त्याला लिहीले होते पण भीतीने त्याला कधी दिलेच नाही.नायकाने ते पत्र तसेच तिच्या पर्स मध्ये ठेवले व दूसर्या दिवशी तो तिच्या घरी ती पर्स देण्याच्या निमित्ताने गेला, नायिकेचे आपल्यावर प्रेम आहे हे नायकाला कलले होते पण त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचे होते व म्हणून तो पुढे काही न काही कारण काढून तिच्या घरी येत राहायचा. नायिकेला मात्र नायकाचे आपल्यावर प्रेम आहे की नाही याबाबत क्षंका होती कारण त्याने कधीही त्याचे प्रेम तिच्या समोर जाहीर केले नव्हते. नायकाला कोलकत्त्यात येऊन दोन आठवडे झालेले असतात व त्याला आत्ता मूंबईला परत यायला लागणार होते पण अजूनही दोघांनीही त्यांचे प्रेम एकमेकांशी व्यक्त केले नव्हते. नायक मूंबईकड्ये जाण्यास निघाला आहे असे नायिकेला समजते व ती त्याला रोखण्यासाठी तो राहत असलेल्या हॉटेलकडे धाव घेते. तेथे तिला समजते की नायक आधीच एयरपोर्टकडे निघाला होता, हे ऐकून ती खूप निराश झाली पण तिला ही वेळ जाऊन द्यायची नव्हती व एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती सूद्धा एयरपोर्टच्या दिशेने गेली. पण तिला खूप उशीर झाला होता कारण नायकाची फ्लाईट निघून गेली होती, हे पाहून तिला तिचे आश्रू अनावर झाले व ती रडू लागली. अखेर आपल्या मनाला समजूत घालून ती घरी परत निघाली. आपण आपले प्रेम व्यक्त करू शकलो नाही व यापूढे नायकाशी पून्हा कधीच भेट होणार नाही या विचाराने ती खूप दूःखी झाली होती.पण नियतीला काही वेगळेच अपेक्षीत होते कारण नायक हा एयरपोर्टच्या ऐवजी नायिकेच्या घरी गेला होता. नायकाला आपल्या घराजवळ पाहून नायिका भाउक झाली व त्याच्या दिशेने धावत जावूण त्याला घट्ट मिठी मारली. अखेर दोघांनी आपले प्रेम न सांगताच व्यक्त केले आणि यावरून प्रेमाला शब्दांची गरज नसते हे साध्य झाले. प्रेम हे तूम्हाला कोणत्याही रूपात मिळू शकते, तूम्हाला फक्त ते आेळखता आले पाहीजे.

No comments:

Post a Comment