Tuesday 7 April 2015

माझ्या राजाचा मावळा

एका मशिदीजवळ एक
पाणीपुरी वाला पाणीपुरी विकत
उभा होता चार काँलेज तरुणी पाणीपुरी खात
होत्या ....
मशिदीतून एक मुसलमान म्हतारा बाहेर आला.
रस्ता ओलांडायचा होता त्याला ......पण
गडबडीत
रिक्षा च्या आडून आलेला दुचाकीस्वार
लक्षात
आला नसावा...मोटारसायकलच्या धक्क्याने
म्हतारा कोलमडून पडला , मोटारसायकलच्याच
मागे
वीस बाविस वयाचा एक मुलगा सायकलवर येत
होता.....
सायकल वर पार्सल
ची पिशवी बहुधा डिलिव्हरी बाँय
असावा..अंगात जर्किन ..त्यावर
छातीच्या डावीकडे ..छत्रपतींचा देखणा ,
रुबाबदार
फोटो.
त्याने
त्या वृध्दाला पडताना पाहिले...आणि क्षणार्धात
त्याने पिशवीसहीत सायकल रोडवर सोडून
दिली..सायकल , पिशवी रोडवर पडली ...
धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला उठवले ,
त्याचे कपडे
झटकले..त्याला रोड पार करुन दिला. मग परत
येऊन
पिशवी , सायकल उचलली व
आपल्या रस्त्याने निघून
गेला....
.
हे सर्व पाहून त्या चौघींपैकी एक जी बहुतेक
मराठा असावी...तीच्या तोंडून आपसूक बाहेर
पडलं...."हा खरा माझ्या राजांचा मावळा "....हे
ऐकून
तिघी हसल्या आणि एक म्हणाली ," लग्न
करशील
त्याच्याशी "
हे ऐकून पहिली मुलीने सुरेख उत्तर
दिलं...म्हणाली , "
का ? काय वाईट आहे...बापकमाईची
गाडी फिरवत
नाही..कष्ट करुन पोट
भरतो...माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून
मुसलमान
वृध्दाला मदत केली इतकी माणुसकी..,
१४ फेब्रुवारी ला गुलाब हातात घेऊन
दरवर्षी नवीन
मुलगी शोधत फिरणार्
या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही चांगलाच !!"
कौतुक वाटलं ....मुलीचं नाही तिच्या आईबाबांचे
ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली..
मित्रांनो आपण आपल्या गाडीवर ,
जर्किन्सवर
छत्रपतींचा फोटो घेतो पण
महाराजांना शोभणारे
वर्तन...., ते जमत नसेल तर महाराजांना गाडीवर
अंगावर मिरवू नका....
महाराजांची इज्जत कमी करु नका.

No comments:

Post a Comment