स्वरुप हे अंजलीचे शिक्षक होते.दोघांच्या वयामध्ये जास्त काही अंतर नव्हतंच मुळी.स्वरुपचंअंजलीवर खुप प्रेम होतं.एक दिवस योग्य वेळ बघुन त्याने ते व्यक्त केलं.अंजलीनेही आपल्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळतोय म्हणुन त्याला होकार दिला.त्यांचं लग्नही झालं.पण लग्नाच्या काही दिवसानंतर अंजलीला कळु लागलं की,स्वरुप आपल्यामध्ये पुरेसं अंतर बाळगतोय जे न
वरा बायकोमध्ये कधीचअसत नाही.तिला हेच समजत नव्हतं कीतो असं का करतोय?प्रेमामध् ये त्यानेच पुढाकार घेतला असतानासुद्धा, मनाविरुद्ध लग्न लावुन दिलेल्या माणसासारखा तिला स्पर्शही करत नव्हता.ही बाब तिने त्याच्या काकांना सांगितली.
त्याचे काका एक मनोवैज्ञानिक तज्ञ असल्याने ते त्याची मानसिक स्थिती योग्य पद्धतीने समजु शकतील असं तिला वाटत होतं.काकांनी एक दिवस हवापालटचा बहाणा करुन माझ्याकडे स्वरुपला घेउन यायला सांगितलं.ठरल्या प्रमाणे ती घेऊन आली.योग्य ती वेळबघुन काकांनी स्वरुपला संमोहीत केलं.आणि त्या अवस्थेत काकांनी त्याला काही प्रश्ने विचारली.विचारले ल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली.नंतर त्याला नॉर्मल स्थितीतआणलं गेलं.
काका अंजलीला,स्वरुपक डुन मिळालेली सर्व माहीती एकांतात सांगु लागले....
स्वरुपचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.त्याच्या जन्माच्या दोन वर्षानंतरच त्याचे वडील वारले.त्यामुळे त्याला आपल्या आईजवळच झोपायची सवय लागली.तो कधीही त्याच्या आईला सोडुन दुर झोपलाच नव्हता.आईचं प्रेम म्हणजेजवळजवळ त्याच्यासाठी व्यसनच झालं होतं.पण त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आईचा मृत्यु झाला.त्याचा जबर आघात त्याच्या मनावर झाला.अचानक बदललेली ही परिस्थीती त्याचं मन,त्याचा मेंदु स्वीकारु शकत नव्हता.पण त्यावेळी त्याच्या मनाजवळ/ मेंदुजवळ ही परिस्थिती स्वीकारण्याशिवा य दुसरा पर्यायचनव्हता.त्यामुळे त्यावेळची मानसिक स्थिती त्याला दाबावी लागली.दहा वर्षाँनंतर जेव्हा तो शिक्षक होता तेव्हा तु कॉलेजमध्ये नवीन अॅडमिशन घेतलंस.आणि इतकी वर्षे पर्याय नसलेल्या त्याच्या मनाला आई मिळवण्याचा एक पर्याय मिळाला.कारण तुझ्या आणि त्याच्याआईच्या चेहर्यात जवळजवळ 70%साम्य आहे.त्याची वास्तविक स्थिती आणि त्याचं बालपण अशा दोन वेगळ्या स्थितींचं त्याच्या मेंदुत एक प्रकारचं जबर एकत्रीकरण झालंय.जे एकमेकांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळेच त्याच्या बालपणातली आई मिळवण्यासाठी त्याच्या तरुणपणाने तुझ्याशी लग्न केलंय.....
मनोवैज्ञानिक असणार्या काकांचं हे बोलणं ऐकुन तिच्या पायाखालची जमिन सरकली.तिच्या मेँदुतल्या सगळ्या तारा तुटल्यासारखं तिला वाटु लागतं.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असंही घडु शकतं याचा तिला विश्वासच बसत नव्हता.अंजली काकांना विचारते,मग स्वरुप बरा कसा होऊ शकतो हे सांगाल का?
सांगतो....हे बघ नवरा बायकोच्या बाबतीत स्त्रियांना नॉर्मली असं वाटत असतं की,शरीरसुखाच्या बाबतीत त्यांच्या नवर्याने प्रामुख्याने पुढाकार घ्यावा.पण तुझ्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे.इथे शरीरसुखामध्ये पुढाकार तुला घ्यायचाय.जर तु शरीरसुखामध्ये स्वतःहुन पुढाकारघेतलास आणि त्याच्या मनातल्या तारुण्याच्या भावना जागृत करु शकलीस.तरच तुझा स्वरुप तुला मिळु शकेल.कारण त्याचं तरुणपणच त्याच्या बालपणावर मात करु शकतं..समजलं...ह ो समजलं काका.पुर्ण समजलं,मी तुमची खुप खुप आभारी आहे.मी असंच करेन.
सहा महीन्यानंतर मिठाईचा बॉक्स घेऊन अंजली आणि स्वरुप काकांकडे येतात.अंजली काकांना म्हणते,ही मिठाई कशासाठी माहीतीये का काका?आज मी दोन महीन्यांची गर्भवती आहे.त्यासाठीची आहे ही मिठाई.हे ऐकुन काका दोघांना शुभेच्छा देतात.आणि स्वरुपला ही मिठाई काकुंना देऊन येण्यास सांगतात.स्वरुप आतमध्ये जाताच,अंजली बोलु लागते,काका तुमचे आभार कसे मानावे हेच कळंत नाहीये मला,मी तसंच केलं जसं तुम्ही सांगितलं होतं.त्याने खरंच खुप फायदा झाला आणि आतातर खुपवेळा स्वरुपच अशा गोष्टीँसाठी पुढाकार घेतो.तो प्रचंड रोमँटीक आहे जे मला खुपच आवडतं.
अगं हेच तर हवं होतं मला तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगताय याशिवाय मला आणखी काय हवं...
No comments:
Post a Comment