
"राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे
, तू इथे असतास तर मदत झाली असती"
दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,
" बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"
दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.
लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.
तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.
No comments:
Post a Comment