तिचा ब्लॉग..
मुलांना
सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं
नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची माझ्यावर
वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही….
ह्याचा
अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल
तर बिनडोक आहात.. किंवा असाही नाही की तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर
नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात…….
सुन्दर
आणि हुशार पण असाल तर मुली मुलांना आवडणार नाही,असही नाही… !कुठेतरी
वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. नक्की आठवत नाही,
तुम्ही म्हणाल, काय माणुस आहे , अगदी एम ऍंड बी वाचतो आणि ते पण ओपनली कबुल
पण करतो.. पण मी खरंच एंजॉय करायचॊ एम ऍंड बी.. अगदी लपुन छपुन पुस्तकं
वाचायचो.. लग्नाच्या पुर्वी… म्हणजेच .. कोणे एके काळी……. :)
द
ओनली वे टु विन हिम इज ऍक्ट डंब- असा सल्ला एका पुस्तकात त्या
पुस्तकाच्या नायिकेला त्या टीडीएच मुलाची आई देते… तर ब्लॉंड्स ऍंड
ब्युटीफुल हे कॉम्बो फार लोकप्रिय आहे.असाही समज/गैरसमज आहे की ब्लॉंड्स या
बिनडोक असतात… ( बिनडॊक हा खास नागपुरी शब्द आहे.. याचा समानार्थी शब्द
आहे निर्बुध्द!! अर्थात हा सगळा जोक्सचा भाग आहे .
आपल्या
कडे जसे सरदारजीचे जोक्स असतात, ( जरी आपले पंतप्रधान हार्वर्ड चे
ग्रॅजुएट असले तरिही) तसेच माझे अमेरिकेतिल मित्र ब्लॉंड्स चे जोक्स इमेल
ने पाठवतात. ..असो…हे जे काही इथे लिहिलंय ते पुरुषी दृष्टीकोनातुन.. नथिंग
पर्सनल अबाउट इट..
मी
रहातो एका हारम मधे, घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियाच आहेत,(
बायको+मुली) त्यामुळे जर कोणी हे वाचले तर मात्र नुसती बोंब आहे, अर्थात
घरी मी जे काही लिहितो ते कधिच वाचत नाहित म्हणुन तर इतक्या बिनधास्त पणे
लिहितोय नां. अहो नाही तर .. घरी जेवायला पण मिळणार नाही, हे असं काही
लिहिलं म्हणुन..
आज
मला काय झालंय असं वाटतं कां? हे काय लिहितोय मी.. खरंच सांगतो मलाही कळत
नाही की मी काय लिहितोय ते.. कारण हा लेख सुरु केला तेंव्हा बॅक ऑफ द माइंड
एक सौंदर्यवती होती. तिच्या बद्दल बातमी वाचली की तिला एक रेअर बोन मॅरो
शी रिलेटेड कॅन्सर झालाय म्हणुन… तेंव्हाच ठरवलं की तिच्या बद्दल लिहायचं..
तुम्ही
आजचा पेपर वाचला असेलच.. लिसा रे या सौंदर्यवती ला झालेल्या कॅन्सर बद्दल
पण सगळं वाचलं असेलंच . .मी इथे तिला झालेल्या कॅन्सरची माहिती देणार नाही-
आजचा कुठलाही पेपर उघडा .. दिसेल तिसऱ्या पानावर!!
एके
ठिकाणी वाचलं की लिसा रे ला न दुरुस्त होणारा कॅन्सर झालाय आणि तिने
तिच्या ब्लॉग वर या बद्दल लिहिलंय ! सर्च केला आणि तिची साईट आणि ब्लॉग
शोधुन काढला. ती अतिशय ब्रेव्ह ,सुंदर आणि बुद्धिमान आहे हे तिचा ब्लॉग
वाचल्यावर लक्षात आलं.
लिसाचे
स्वतःवरचे कॅन्सर झाल्या बद्दलचे पोस्ट वाचले . इतक्या तटस्थ पणे कोणी
स्वतःबद्दल लिहुच कसं शकतं?? तिच्या धैर्याची कमाल वाटते. सौंदर्य आणि
बुध्दिमत्ता दोन्ही असलेली एक तरुणी म्हणजे लिसा रे, हे तिचा ब्लॉग
वाचल्यावर जाणवते. इतका मोठा जीवघेणा रोग झाला तरी पण तिचा ब्लॉग म्हणजे एक
बॅलन्स्ड पोस्ट असलेला आहे.कुठेही तिने स्वतःबद्दल कणव यावी असे लिहिलेले
नाही. जे कांही आहे ते.. प्राक्तनात आहे .. असा सुर वाटला त्या पोस्टचा.
तिला
झालेल्या रोगाबद्दल इतक्या साधी सर्दी ताप आणि फ्लु झाल्याप्रमाणे सरळ आणि
सहजपणे लिहिलंय . तिचे पोस्ट वाचतांना तिच्या धैर्याबद्दल खरंच आदर
वाटला.. सुर्य प्रकाशाइतकं स्पष्ट असतांना, की हा रोग बरा होऊ शकत नाही,
लिसाचा मानसिक तोल कुठेही ढासळलेला दिसत नाही. तिने लिइलय, तिच्च्या मधे
पुर्ण आत्मविश्वास आहे की ती बरी होणार म्हणुन!
एकच प्रार्थना कराविशी वाटते.. गेट वेल सुन..
ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल तर बिनडोक आहात.. किंवा असाही नाही की तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात!
सुन्दर आणि हुशार पण असाल तर मुली मुलांना आवडणार नाही,असही नाही!! छे!! छे!! किती कन्फ्युज करतोय ना मी? मी स्वतः पण कन्फ्युज झालोय माझ्या स्वतःच्या या लिखाणाबद्दल.
!कुठेतरी वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. नक्की आठवत नाही- तुम्ही म्हणाल, काय माणुस आहे , अगदी एम ऍंड बी पण वाचतो आणि ते पण ओपनली कबुल पण करतो.. पण मी खरंच एंजॉय करायचॊ एम ऍंड बी.. अगदी लपुन छपुन पुस्तकं वाचायचो.. लग्नाच्या पुर्वी… म्हणजेच .. कोणे एके काळी……. :)
“द ओनली वे टु विन हिम इज ऍक्ट डंब”- असा सल्ला एका पुस्तकात त्या पुस्तकाच्या नायिकेला त्या टीडीएच मुलाची आई देते… तर ब्लॉंड्स ऍंड ब्युटीफुल हे कॉम्बो फार लोकप्रिय आहे.असाही समज/गैरसमज आहे की ब्लॉंड्स या बिनडोक असतात… बिनडॊक हा खास नागपुरी शब्द आहे, याचा समानार्थी शब्द आहे निर्बुध्द!! अर्थात हा सगळा विनोदाचा एक भाग आहे .
आपल्या कडे जसे सरदारजीचे जोक्स असतात, ( जरी आपले पंतप्रधान हार्वर्ड चे ग्रॅजुएट असले तरिही) तसेच माझे अमेरिकेतिल मित्र ब्लॉंड्स चे जोक्स इमेल ने पाठवतात. ..असो. .
मी रहातो एका हारम मधे, घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियाच आहेत,( बायको+मुली) त्यामुळे घरी जर कोणी हे वाचले तर मात्र नुसती बोंब आहे, अर्थात घरी मी जे काही लिहितो ते कधिच वाचत नाहित म्हणुन तर इतक्या बिनधास्त पणे लिहितोय नां. अहो नाही तर .. घरी जेवायला पण मिळणार नाही, हे असं काही लिहिलं म्हणुन..
आज मला काय झालंय असं वाटतं कां? हे काय लिहितोय मी.. ? हा लेख सुरु केला तेंव्हा बॅक ऑफ द माइंड एक सौंदर्यवती होती. तिच्या बद्दल बातमी वाचली की तिला एक रेअर बोन मॅरो शी रिलेटेड कॅन्सर झालाय म्हणुन… तेंव्हाच ठरवलं की तिच्या बद्दल लिहायच,पण लेखाची सुरुवात ही अशी झाली.
तुम्ही आजचा पेपर वाचला असेलच.. लिसा रे या मॉडेल, अभिनेत्रीला झालेल्या कॅन्सर बद्दल पण सगळं वाचलं असेलंच . .मी इथे तिला झालेल्या कॅन्सरची माहिती देणार नाही- आजचा कुठलाही पेपर उघडा .. दिसेल तिसऱ्या पानावर!!भारतामधे जरी ती एक अभिनेत्री म्हणुन फारसी प्रसिध्द झाली नसली तरिही तिचा वॉटर मधला अभिनय वाखाणण्यासारखा आहे. अवश्य पहा .. टाइम्स ऑफ इंडीयाच्या “टॉप टेन ब्युटीफुल इंडीयन वुमन” मधे तिचं नावं आहे.
एके ठिकाणी वाचलं की लिसा रे ला न बरा होऊ शकणारा कॅन्सर झालाय आणि तिने तिच्या ब्लॉग वर या बद्दल लिहिलंय ! सर्च केला आणि तिची साईट आणि ब्लॉग शोधुन काढला. लिसाचे स्वतःवरचे कॅन्सर झाल्या बद्दलचे पोस्ट वाचले . इतक्या तटस्थ पणे कोणी स्वतःबद्दल लिहुच कसं शकतं?? तिच्या धैर्याची कमाल वाटते. सौंदर्य आणि बुध्दिमत्ता दोन्ही असलेली एक तरुणी म्हणजे लिसा रे, हे तिचा ब्लॉग वाचल्यावर जाणवते.
इतका मोठा जीवघेणा रोग झाला तरी पण तिचा ब्लॉग म्हणजे एक बॅलन्स्ड पोस्ट आहे.कुठेही तिने स्वतःबद्दल कणव यावी असे लिहिलेले नाही. जे कांही आहे ते.. प्राक्तनात आहे .. असा सुर वाटला त्या पोस्टचा. तिला झालेल्या रोगाबद्दल इतक्या साधी सर्दी ताप आणि फ्लु झाल्याप्रमाणे सरळ आणि सहजपणे लिहिलंय . तिचे पोस्ट वाचतांना तिच्या धैर्याबद्दल खरंच आदर वाटला.
सुर्य प्रकाशाइतकं स्पष्ट असतांना, की हा रोग बरा होऊ शकत नाही, लिसाचा मानसिक तोल कुठेही ढासळलेला दिसत नाही. तिने लिहिलंय, पुर्ण आत्मविश्वास आहे की ती बरी होणार म्हणुन!तिच्या पोस्टवरच्या इतरांच्या कॉमेंट्स पण वाचण्यासारख्या आहेत. लोकं तिला रेकी पासुन तर ऍक्युप्रेशर ते योगा प्रॅक्टिस चा सल्ला देताहेत.
ती अतिशय ब्रेव्ह ,सुंदर आणि बुद्धिमान आहे हे तिचा ब्लॉग वाचल्यावर लक्षात आलं.इतक्या सगळ्या क्वॉलिटीज एकाच स्त्री मधे?? मी हे पोस्ट केवळ ती खुप सुंदर आहे किंवा ती एक अभिनेत्री आहे म्हणुन लिहायला घेतलं नाही, तर तीचा ब्लॉग वाचल्यावर इम्प्रेस झाल्यामुळे हे पोस्ट लिहिलंय.या लेखाच्या सुरुवातिला लिहिलेलं पहिलं स्टेटमेंट हे अगदी खोटं ठरवलेलं दिसलं या अभिनेत्रीने.
एकच प्रार्थना कराविशी वाटते.. गेट वेल सुन..
No comments:
Post a Comment